6. लक्ष द्या! ज्या गोष्टी शिकवतो त्या महत्वाच्या आहेत. मी तुम्हाला फक्त योग्य असलेल्या गोष्टीच सांगतो.
|
10. माझ्या शिस्तीचा स्वीकार करा. ती रुप्यापेक्षाही मौल्यवान आहे. ती शुध्द सोन्यापेक्षाही मौल्यावान आहे.
|
11. ज्ञान मोत्यापेक्षा, अधिक मौल्यवान आहे. ते माणसाला हव्या असलेल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा मौल्यवान आहे.”
|
12. “मी ज्ञान आहे. मी चांगल्या न्यायाने जगते. तुम्ही मला ज्ञानाबरोबर आणि चांगल्या योजनांबरोबर पाहू शकता.
|
13. जर एखादा माणूस परमेश्वराला मान देत असला तर तो वाईटाचा तिरस्कार करेल. मी (ज्ञान) गर्वाचा आणि जे लोक इतरांपेक्षा स्वत:ला मोठे समजतात अशा लोकांचा तिरस्कार करते. मी वाईट मार्ग आणि खोटे बोलणाऱ्या तोंडांचा तिरस्कार करते.
|
14. परंतु मी लोकांना योग्य निर्णय घेण्याचे सामर्थ्य देते आणि योग्य चांगला न्याय देते. मी समजूतदारपणा आणि शक्ती देते.
|
16. प्रत्येक चांगला राज्यकर्ता त्याच्या अंमलाखाली असलेल्या लोकांवर राज्य करण्यासाठी माझा उपयोग करुन घेतो.
|
17. मी (ज्ञान), माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करते. आणि जे लोक मला शोधायचा खूप प्रयत्न करतात त्यांना मी हटकून सापडते.
|
19. मी ज्या गोष्टी देते त्या शुध्द सोन्यापेक्षा चांगल्या असतात. आणि माझे नजराणे शुद्ध चांदीपेक्षा चांगले असतात.
|
26. परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्याआधीच मी जन्मले. शेतांच्या आधी माझा जन्म झाला. देवाने पृथ्वीवरची पहिली धूळ निर्माण करण्याआधीच माझा जन्म झाला होता.
|
27. परमेश्वराने आकाशाची निर्मिती केली तेव्हा मी तिथे होते. परमेश्वराने कोरड्या भूमीभोवती सीमा आखण्यासाठी वर्तूळ काढले तेव्हा मी तिथे होते. त्याने सागराला सीमित केले तेव्हा मी तिथे होते.
|
28. परमेश्वराने आकाशात ढग ठेवण्याआधी माझा जन्म झाला. आणि परमेश्वराने समुद्रात पाणी ठेवले तेव्हाही मी तिथे होते.
|
29. परमेश्वराने सागराच्या पाण्याला सीमाबध्द केले तेव्हा ही मी होते. पाणी परमेश्वराच्या संमती शिवाय चढू शकत नाही. परमेश्वराने पृथ्वीचा पाया घातला तेव्हा मी तिथे होते.
|
30. एखाद्या कसलेल्या कामगारासारखी मी त्याच्या बाजूला होते. माझ्यामुळे परमेश्वर रोज आनंदी असे. मी त्याचा आनंद होते.
|
31. त्याने निर्माण केलेल्या जगाविषयी परमेश्वर उत्सुक होता. तो तिथे निर्माण केलेल्या लोकांबद्दल आनंदी होता.
|
36. पण जो माझ्याविरुध्द पाप करतो तो स्वत:लाच इजा करुन घेतो. जे लोक माझा तिरस्कार करतात ते मरणाला कवटाळतात.”
|