1. माझ्या आत्म्या परमेश्वराचा जयजयकार कर. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करु दे.
|
6. परमेश्वर न्यायी आहे. जे लोक इतरांकडून दु:खी झाले आहेत त्यांना देव न्याय देतो, त्यांच्यासाठी देव न्याय आणतो.
|
12. आणि देवाने आमची पापे पूर्व आणि पश्चिम एकमेकींपासून जितक्या अंतरावर आहेत तितक्या अंतरावर नेऊन ठेवली.
|
16. आम्ही एखाद्या छोट्या रानफुलासारखे आहोत हे देवाला माहीत आहे. ते फूल लवकर वाढते. गरम वारा वाहायला लागला की ते मरते आणि थोड्याच वेळात ते फूल कुठे वाढत होते ते देखील कुणी सांगू शकत नाही.
|
17. परंतु परमेश्वराने त्याच्या भक्तांवर नेहमीच प्रेम केले आणि तो सदैव त्याच्या भक्तांवर प्रेम करीत राहाणार आहे. देव त्यांच्या मुलांशी आणि मुलांच्या मुलांशीदेखील चांगला वागणार आहे.
|
18. जे लोक देवाचा करार पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो.
|
20. देवदूतांनो, परमेश्वराची स्तुती करा. देवदूतांनो, तुम्ही देवाची आज्ञा पाळणारे सामर्थ्यवान सैनिक आहात. तुम्ही देवाचे ऐकता आणि त्याची आज्ञा पाळता.
|
21. परमेश्वराच्या सगळ्या सैन्यांनो देवाची स्तुती करा. तुम्ही त्याचे सेवक आहात. देवाला जे हवे ते तुम्ही करा.
|
22. परमेश्वराने सगळीकडच्या सर्व वस्तू केल्या. देव चराचरावर राज्य करतो आणि त्या सगळ्यांनी परमेश्वराची स्तुती केली पाहिजे. माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.
|