4. मी देवाकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने माझे ऐकले. मला ज्या सर्व गोष्टींची भीती वाटत होती त्यापासून त्याने मला वाचवले.
|
6. या गरीब माणसाने परमेश्वराकडे मदत मागितली आणि परमेश्वराने माझे ऐकले. त्याने माझी सर्व संकटांतून मुक्तता केली.
|
7. परमेश्वराचा दूत त्याच्या भक्तांभोवती छावणी बांधतो. परमेश्वराचा दूत त्यांचे रक्षण करतो व त्यांना संकट मुक्त करतो.
|
8. परमेश्वराचा अनुभव घ्या आणि तो किती चांगला आहे ते शिका जो परमेश्वरावर अवलंबून असतो तो खरोखरच सुखी होईल.
|
9. परमेश्वराच्या पवित्र लोकांनी त्याची भक्ती केली पाहिजे. परमेश्वराच्या भक्तांसाठी सुराक्षित अशी दुसरी जागा नाही.
|
10. शक्तिशाली माणसे दुबळी आणि भुकेली बनतील. परंतु जे लोक देवाकडे मदतीसाठी जातात त्यांना चांगल्या गोष्टी मिळतील.
|
14. वाईट कृत्ये करणे सोडून द्या. चांगली कृत्ये करा. शांतीसाठी काम करा. शांती मिळे पर्यंत तिच्या मागे धावा.
|
18. काही लोकांवर खूप संकटे येतात आणि ते गर्व करायचे थांबवतात. परमेश्वर अशा लोकांच्या जवळ असतो. तो त्या विनम्र लोकांचे रक्षण करतो.
|
22. परमेश्वर त्याच्या सेवकांच्या आत्म्यांना वाचवतो. ते लोक त्याच्यावर अवलंबून असतात तो त्यांचा विनाश होऊ देणार नाही.
|