मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
प्रकटीकरण
1. मग मी आणखी एक शक्तीशाली देवदूत स्वर्गातून येताना पाहिला. तो ढगांनी आच्छादलेला होता. त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. त्याचा चेहरा सूर्यासारखा होता, त्याचे पाय जणू काय अग्नीचे खांब होते.
2. त्याने लहान गुंडाळी धरली होती, जी त्याच्या हातात उघडी होती. त्याने त्याचा उजवा पाय समुद्रात ठेवला होता व डावा पाय जमिनीवर ठेवला होता.
3. आणि त्याने सिंहाच्या गर्जनेसारखी मोठ्याने गर्जना कली. जेव्हा तो ओरडला, तेव्हा त्या सात मेघगर्जनांनी आपापले शब्द उच्चारले.
4. जेव्हा त्या सात मेघगर्जना बोलल्या, त्यावेळी मी लिहिणार एवढ्यात मला आकाशातून वाणी आली, ती म्हणाली, “सात मेघगर्जनांनी काढलेले शब्द बंद करुन ठेव. ते लिहू नको.”
5. मग ज्या देवदूताला मी समुद्रात व जमिनीवर पाहिले होते त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे उचलला.
6. जो अनंतकाळ जगतो, ज्याने आकाश व त्यातील सर्व काही बनविले, पृथ्वी व तीवरील, त्याच्या नावाने शपथ वाहिली. आणि म्हणाला, “आता आणाखी विलंब होणार नाही!
7. पण जेव्हा सातवा देवदूत कर्णा वाजविण्याच्या तयारीत असेल त्या दिवसात देवाची गुप्त योजना पूर्ण होईल. त्याचे सेवक जे संदेष्टे (भविष्यवदी) त्यांना दिलेल्या वचनानुसार घडून येईल.”
8. तेव्हा आकाशातून झालेली वाणी जी मी ऐकली होती ती पुन्हा मला बोलली, “जा, गुंडाळी घे, जी गुंडाळी समुद्र व जमीन यावर उभ्या असलेल्या देवदूताच्या हातात उघडी आहे ती घे.”
9. म्हणून मी त्या देवदूताकडे गेलो व मला ती लहान गुंडाळी दे असे म्हणालो. तो मला म्हणला, “ही घे, आणि ही खा. ती खाल्ल्याने तुझे पोट कडू होईल. पण तुझ्या तोंडाला मात्र ते मधासारखे गोड लागेल.”
10. मी ती लहान गुंडाळी देवदूताच्या हातून घेतली व खाऊन टाकली. माझ्या तोंडात मला ती मदासारखी गोड वाटली, पण जेव्हा ती मी खाल्ली, तेव्हा माझे पोट कडवट झाले.
11. तेव्हा माल सांगण्यात आले, “तू पुन्हा पुष्कळ लोकांना, राष्ट्रांना, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांना व राजांना संदेश सांगितले पाहिजेत.”
Total 22 अध्याय, Selected धडा 10 / 22
1 मग मी आणखी एक शक्तीशाली देवदूत स्वर्गातून येताना पाहिला. तो ढगांनी आच्छादलेला होता. त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. त्याचा चेहरा सूर्यासारखा होता, त्याचे पाय जणू काय अग्नीचे खांब होते. 2 त्याने लहान गुंडाळी धरली होती, जी त्याच्या हातात उघडी होती. त्याने त्याचा उजवा पाय समुद्रात ठेवला होता व डावा पाय जमिनीवर ठेवला होता. 3 आणि त्याने सिंहाच्या गर्जनेसारखी मोठ्याने गर्जना कली. जेव्हा तो ओरडला, तेव्हा त्या सात मेघगर्जनांनी आपापले शब्द उच्चारले. 4 जेव्हा त्या सात मेघगर्जना बोलल्या, त्यावेळी मी लिहिणार एवढ्यात मला आकाशातून वाणी आली, ती म्हणाली, “सात मेघगर्जनांनी काढलेले शब्द बंद करुन ठेव. ते लिहू नको.” 5 मग ज्या देवदूताला मी समुद्रात व जमिनीवर पाहिले होते त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे उचलला. 6 जो अनंतकाळ जगतो, ज्याने आकाश व त्यातील सर्व काही बनविले, पृथ्वी व तीवरील, त्याच्या नावाने शपथ वाहिली. आणि म्हणाला, “आता आणाखी विलंब होणार नाही! 7 पण जेव्हा सातवा देवदूत कर्णा वाजविण्याच्या तयारीत असेल त्या दिवसात देवाची गुप्त योजना पूर्ण होईल. त्याचे सेवक जे संदेष्टे (भविष्यवदी) त्यांना दिलेल्या वचनानुसार घडून येईल.” 8 तेव्हा आकाशातून झालेली वाणी जी मी ऐकली होती ती पुन्हा मला बोलली, “जा, गुंडाळी घे, जी गुंडाळी समुद्र व जमीन यावर उभ्या असलेल्या देवदूताच्या हातात उघडी आहे ती घे.” 9 म्हणून मी त्या देवदूताकडे गेलो व मला ती लहान गुंडाळी दे असे म्हणालो. तो मला म्हणला, “ही घे, आणि ही खा. ती खाल्ल्याने तुझे पोट कडू होईल. पण तुझ्या तोंडाला मात्र ते मधासारखे गोड लागेल.” 10 मी ती लहान गुंडाळी देवदूताच्या हातून घेतली व खाऊन टाकली. माझ्या तोंडात मला ती मदासारखी गोड वाटली, पण जेव्हा ती मी खाल्ली, तेव्हा माझे पोट कडवट झाले. 11 तेव्हा माल सांगण्यात आले, “तू पुन्हा पुष्कळ लोकांना, राष्ट्रांना, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांना व राजांना संदेश सांगितले पाहिजेत.”
Total 22 अध्याय, Selected धडा 10 / 22
×

Alert

×

Marathi Letters Keypad References