2. 2 परमेश्वर माझा खडक माझा किल्ला माझी संरक्षक जागा आहे. माझा देव माझा खडक आहे. मी माझ्या रक्षणासाठी त्याच्याकडे धाव घेतो. देव माझी ढाल आहे. त्याची शक्ती नेहमी माझे रक्षण करते.परमेश्वर माझी उंच डोंगरावरची लपण्याची जागा आहे.
|
3. 3 त्यांनी माझी चेष्टा केली. परंतु मी ज्याची स्तुती केली जावी अशा परमेश्वराचा धावा केला आणि शत्रूंपासून माझे रक्षण झाले.
|
4. 4 माझे शत्रू मला मारण्याचा प्रयत्न करीत होते. मृत्यूच्या दोऱ्या माझ्या भोवती होत्या मृत्युलोकात नेणाऱ्या पुरात मी सापडलो होतो.
|
6. 6 सापळ्यात अडकल्यावर मी परमेश्वराचा धावा केला. होय, मी देवाला माझ्या मदतीसाठी बोलावले. देव त्याच्या मंदिरात होता. त्याने माझा आवाज ऐकला. त्याने माझी मदतीची हाक ऐकली.
|
8. 8 देवाच्या नाकातून धूर आला देवाच्या तोंडातून अग्रीच्या ज्वाळा निघाल्या. त्याच्या अंगातून ठिणग्या उडाल्या.
|
11. 11 परमेश्वर त्याच्या सभोवती तंबूसारख्या पसरलेल्या काळ्या ढगात लपला होता. तो गडगडणाऱ्या दाट ढगात लपला होता.
|
13. 13 परमेश्वराने ढगामधून गडगडाट केला, त्या सर्वशक्तिमान देवाने आपला आवाज ऐकवला तेथे गारा पडल्या आणि विजांचा कडकडाट झाला.
|
14. 14 परमेश्वराने त्याचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली परमेश्वराने विजेचे लोळ फेकून लोकांची त्रेधा उडवली.
|
15. 15 परमेश्वरा, तू धमकावून बोललास आणि सोसाट्याचा वारा तुझ्या मुखातून बाहेर पडला पाणी हटवले गेले आणि आम्हाला समुद्राचा तळ दिसू शकला. आम्हाला पृथ्वीचा पाया बघता आला.
|
16. 16 परमेश्वर वरुन खाली आला आणि त्याने माझे रक्षण केले. परमेश्वराने मला धरले आणि खोल पाण्यातून (संकटांतून) बाहेर काढले.
|
17. 17 माझे शत्रू माझ्यापेक्षा शक्तिमान होते. ते लोक माझा तिरस्कार करीत होते माझे शत्रू मला खूप भारी होते म्हणून देवाने माझे रक्षण केले.
|
20. 20 मी निरपराध असल्यामुळे परमेश्वर मला माझे बक्षीस देईल मी काही चूक केली नाही म्हणून तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करेल.
|
24. 24 म्हणून परमेश्वर मला माझे फळ देईल. का? कारण मी निरपराध आहे. देव पाहातो की मी काहीच चूक करीत नाही म्हणून तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करील.
|
25. 25 परमेश्वरा, जर एखादा माणूस तुझ्यावर खरोखरच प्रेम करत असेल तर तू त्याला तुझे खरे प्रेम दाखवशील. जर एखादा माणूस तुझ्याशी खरा वागला तर तू देखील त्याच्याशी खरा वागशील.
|
26. 26 परमेश्वर, जे लोक चांगले आणि शुध्द असतात त्यांच्याशी तू चांगला आणि शुध्द असतोस परंतु अगदी नीच आणि कुटिल असणान्यांना तू नामोहरण करतोस.
|
29. 29 परमेश्वरा, तुझ्या मदतीने मी सैनिकांबरोबर पळू शकतो. देवाच्या मदतीने मी शत्रूच्या भिंतीवर चढू शकतो.
|
30. 30 देवाची शक्ती परिपूर्ण आहे. परमेश्वराच्या शब्दांची परीक्षा घेतली गेली आहे. जे त्याच्यावर विश्वास टाकतात त्यांचे तो रक्षण करतो.
|
35. 35 देवा, तू माझे रक्षण केलेस आणि मला जिंकायला मदत केलीस तू मला तुझ्या उजव्या हाताने आधार दिलास माझ्या शत्रूचा पराभव करण्यासाठी तू मला मदत केलीस.
|
37. 37 नंतर मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करु शकतो आणि त्यांना पकडू शकतो त्यांचा नायनाट झाल्याशिवाय मी परत येणार नाही.
|
38. 38 मी माझ्या शत्रूंचा पराभव करीन. ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत. माझे सगळे शत्रू माझ्या पायाखाली असतील.
|
41. 41 माझ्या शत्रूंनी मदतीसाठी हाका मारल्या परंतु तेथे त्यांचे रक्षण करायला कोणीच नव्हते. त्यांनी परमेश्वराला सुध्दा बोलावले पण त्याने उत्तर दिले नाही.
|
42. 42 मी माझ्या शत्रूचे मारुन तुकडे केले. त्यांची अवस्था वाऱ्यावर उडणाऱ्या धुळीप्रमाणे झाली मी त्यांचे लहान लहान तुकडे केले.
|
43. 43 माझ्याशी लढणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला त्या राष्ट्रांचा प्रमुख कर जे लोक मला माहीत देखील नाहीत ते लोक माझी सेवा करतील.
|
47. 47 देवाने माझ्यासाठी माझ्या शत्रूंना शिक्षा केली, त्याने त्या राष्ट्रांना माझ्या सत्ते खाली आणले.
|
48. 48 परमेश्वरा, तू माझी माझ्या शत्रूंपासून सुटका केलीस जे लोक माझ्याविरुध्द उभे राहिले त्यांचा पराभव करण्यासाठी तू मला मदत केलीस. तू मला क्रूर माणसांपासून वाचवलेस.
|
50. 50 परमेश्वर त्याच्या राजाला अनेक युध्द जिंकायला मदत करतो तो त्याने निवडलेल्या राजाला आपले खरे प्रेम देतो. तो दावीदाशी आणि त्याच्या वंशजांशी कायमचा प्रामाणिक राहील.
|