1. 1 परमेश्वरा, तू माझ्यावर टीका करतोस तेव्हा रागावू नकोस तू मला वळण लावतोस तेव्हा क्रोधित होऊ नकोस.
|
3. 3 तू मला शिक्षा केलीस. आता माझे सर्व शरीर दुखत आहे. मी पाप केले आणि तू मला शिक्षा केलीस. त्यामुळे माझी सर्व हाडे दुखत आहेत.
|
4. 4 मी दुष्कृत्य करण्याचा अपराध केला आहे आणि तो अपराध माझ्या खांद्यावर खूप मोठे ओझे असल्यासारखा आहे.
|
11. 11 माझ्या आजारपणामुळे माझे मित्र आणि शेजारी मला भेटायला येत नाहीत. माझे मित्र आप्तही माझ्याजवळ येत नाहीत.
|
12. 12 माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते असत्य आणि अफवा पसरवीत आहेत. ते सदैव माझ्याबद्दलच बोलत असतात.
|
13. 13 परंतु मी काहीही ऐकू न येणाऱ्या बहिऱ्यामाणसासारखा आहे. मी बोलू न शकणाऱ्या मुक्यामाणसासारखा आहे.
|
14. 14 लोक ज्याच्याबद्दल वाईल बोलतात परंतु त्याला मात्र ते ऐकू येत नाही अशा माणसासारखा मी आहे. मी वादविवाद करुन माझे शत्रू चूक आहेत हे सिध्द करु शकत नाही.
|
16. 16 मी जर काही बोललो तर माझे शत्रू मला हसतील. मी आजारी आहे हे ते बघतील आणि मला चुकाकेल्याची शिक्षा मिळत आहे असे म्हणतील.
|
18. 18 परमेश्वरा, मी ज्या वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल तुला सांगितले. मला माझ्या दुष्कर्माबद्दल दु:ख होत आहे.
|
20. 20 माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट गोष्टी करतात आणि मी मात्र त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या. मी केवळ सत्कर्म करण्याचा प्रयत्न केला परंतु ते लोक माझ्यावर उलटले.
|