मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
इब्री लोकांस
1. ज्याअर्थी देवापासून मिळालेले अभिवचन जे त्याच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठीचे आहे, ते अजून तसेच आहे. म्हणून तुमच्यापैकी कोणीही ते चुकवू नये म्हणून काळजी घ्या.
2. कारम आम्हालासुद्धा सुवार्ता सांगितली गेली आहे ज्याप्रमाणे ती इस्राएल लोकांना सांगण्यात आली होती. परंतु जो संदेश त्यांनी ऐकला त्यापासून त्यांना फायदा झाला नाही कारण तो संदेश त्यांनी ऐकला पण त्यांनी विश्वासाने स्वीकारला नाही.
3. ज्या आम्ही विश्वास ठेवला ते पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार आहोत. जसे देवाने म्हटले आहे.“म्हणून मी माझ्या रागाच्या भरात अशी शपथ वाहून म्हणालो, ‘ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत’
4. कारण पवित्र शास्त्रात तो सातव्या दिवसा बद्दल असे बोलला आहे की: “आणि सातव्या दिवशी देवाने त्याच्या सर्व कामापासून विश्राति घेतली.”
5. आणि पुन्हा या वचनांमध्ये तो म्हणतो, “ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीही प्रवेश करणार नाहीत”
6. ज्यांना अगोदर सुवार्ता सांगण्यात आली होती त्यांचा त्यांच्या अविश्वासमुळे त्यात प्रवेश झाला नाही, तरी हे खरे आहे की, काही जणांचा त्या विसाव्यात प्रवेश होणार आहे.
7. त्यांच्यासाठी देवाने पुन्हा एक वेळ निश्र्च्ति केली असून त्याला तो “आज” असे म्हणतो, अगोदरच उदधृत केलेल्या उताऱ्यामध्ये म्हटल्याप्रमाणे देव त्या दिवसाविषयी पुष्कळ वर्षांनी दाविदाद्वारे बोलला:“आज, जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर आपली अंत:करणे कठीण करु नका.”
8. कारण जर यहोशवा त्यांना देवाने दिलेल्या विसाव्याच्या ठिकाणी घेऊन गेला, तर देव दुसऱ्या दिवसाबद्दल पुन्हा बोलला नसता.
9. म्हणून देवाच्या लोकांसाठी अजूनही सातवा म्हणजे विसाव्याच्या दिवस आहे.
10. कारण जो कोणी देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करतो, तो त्याच्या स्वत:च्या कामापासून विसावा घेतो. ज्याप्रमाणे देवाने त्याच्या कामापासून विसावा घेतला होता.
11. म्हणून त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु या. यासाठी की, कोणीही इस्राएल लोकांनी आज्ञाभंग केल्याप्रमाणे त्यांचे अनुकरण करू नये.
12. कारण देवाचे वचन जिवंत आणि कार्य करणारे आहे आणि कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा अधिक धारदार आहे. ते आपला आत्मा, जीव, सांधे, आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आहे. ते अंत:करणाचे विचार व कल्पना यांचे परीक्षक असे आहे.
13. आणि कोणतीही अशी निर्मित गोष्ट नाही की जी त्याच्यापासून लपलेली आहे आणि ज्याच्यापाशी आम्हांला सर्व गोष्टींचा हिशेब द्यावयाचा आहे. त्याच्यासमोर सर्व गोष्टी उघड व स्वष्ट अशा आहेत.
14. म्हणून, ज्याअर्थी आम्हाला येशू देवाचा पुत्र हा महान मुख्य याजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्क म धरू या.
15. कारण आपल्याला लाभलेला माहन याजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूति दर्शविण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे निष्पाप राहिला.
16. म्हणून आपण त्याच्या कृपेच्या सिंहासनाजवळ ठाम निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हाला दया व कृपा प्राप्त व्हावी.

Notes

No Verse Added

Total 13 अध्याय, Selected धडा 4 / 13
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13
इब्री लोकांस 4
1 ज्याअर्थी देवापासून मिळालेले अभिवचन जे त्याच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठीचे आहे, ते अजून तसेच आहे. म्हणून तुमच्यापैकी कोणीही ते चुकवू नये म्हणून काळजी घ्या. 2 कारम आम्हालासुद्धा सुवार्ता सांगितली गेली आहे ज्याप्रमाणे ती इस्राएल लोकांना सांगण्यात आली होती. परंतु जो संदेश त्यांनी ऐकला त्यापासून त्यांना फायदा झाला नाही कारण तो संदेश त्यांनी ऐकला पण त्यांनी विश्वासाने स्वीकारला नाही. 3 ज्या आम्ही विश्वास ठेवला ते पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार आहोत. जसे देवाने म्हटले आहे.“म्हणून मी माझ्या रागाच्या भरात अशी शपथ वाहून म्हणालो, ‘ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत’ 4 कारण पवित्र शास्त्रात तो सातव्या दिवसा बद्दल असे बोलला आहे की: “आणि सातव्या दिवशी देवाने त्याच्या सर्व कामापासून विश्राति घेतली.” 5 आणि पुन्हा या वचनांमध्ये तो म्हणतो, “ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीही प्रवेश करणार नाहीत” 6 ज्यांना अगोदर सुवार्ता सांगण्यात आली होती त्यांचा त्यांच्या अविश्वासमुळे त्यात प्रवेश झाला नाही, तरी हे खरे आहे की, काही जणांचा त्या विसाव्यात प्रवेश होणार आहे. 7 त्यांच्यासाठी देवाने पुन्हा एक वेळ निश्र्च्ति केली असून त्याला तो “आज” असे म्हणतो, अगोदरच उदधृत केलेल्या उताऱ्यामध्ये म्हटल्याप्रमाणे देव त्या दिवसाविषयी पुष्कळ वर्षांनी दाविदाद्वारे बोलला:“आज, जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर आपली अंत:करणे कठीण करु नका.” 8 कारण जर यहोशवा त्यांना देवाने दिलेल्या विसाव्याच्या ठिकाणी घेऊन गेला, तर देव दुसऱ्या दिवसाबद्दल पुन्हा बोलला नसता. 9 म्हणून देवाच्या लोकांसाठी अजूनही सातवा म्हणजे विसाव्याच्या दिवस आहे. 10 कारण जो कोणी देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करतो, तो त्याच्या स्वत:च्या कामापासून विसावा घेतो. ज्याप्रमाणे देवाने त्याच्या कामापासून विसावा घेतला होता. 11 म्हणून त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु या. यासाठी की, कोणीही इस्राएल लोकांनी आज्ञाभंग केल्याप्रमाणे त्यांचे अनुकरण करू नये. 12 कारण देवाचे वचन जिवंत आणि कार्य करणारे आहे आणि कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा अधिक धारदार आहे. ते आपला आत्मा, जीव, सांधे, आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आहे. ते अंत:करणाचे विचार व कल्पना यांचे परीक्षक असे आहे. 13 आणि कोणतीही अशी निर्मित गोष्ट नाही की जी त्याच्यापासून लपलेली आहे आणि ज्याच्यापाशी आम्हांला सर्व गोष्टींचा हिशेब द्यावयाचा आहे. त्याच्यासमोर सर्व गोष्टी उघड व स्वष्ट अशा आहेत. 14 म्हणून, ज्याअर्थी आम्हाला येशू देवाचा पुत्र हा महान मुख्य याजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्क म धरू या. 15 कारण आपल्याला लाभलेला माहन याजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूति दर्शविण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे निष्पाप राहिला. 16 म्हणून आपण त्याच्या कृपेच्या सिंहासनाजवळ ठाम निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हाला दया व कृपा प्राप्त व्हावी.
Total 13 अध्याय, Selected धडा 4 / 13
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References