1. 1 यहूदाला मिळालेल्या प्रदेशाच्या, त्या वंशातील कुळांप्रमाणे वाटण्या झाल्या. हा प्रदेश अदोमाच्या सीमेपर्यंत आणि तेमानलगतच्या सीन वाळवंटापर्यंत पार दक्षिणेपर्यंत पसरला होता.
|
3. 3 ती तशीच पुढे अक्राब्बीमच्या चढणीकडून सीन वाळवंटावरुन कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस जाऊन मग हेस्रोन वरुन अद्दार पर्यंत जाते. तिथे एक वळण घेऊन ककर्ाकडे जाते.
|
4. 4 तेथून ती सीमा असमोनास जाऊन मिसरच्या ओढ्यापर्यंत निघते. तिचा शेवट भूमध्यसमुद्रापाशी होती. ही झाली दक्षिण सीमा.
|
5. 5 यार्देन नदी समुद्राला मिळते तेथून क्षारसमुद्राच्या संपूर्ण(पश्चिम) किनाऱ्यापर्यंत पूर्वेकडील हद्द.यार्देन क्षार समुद्राला मिळते तेथे या प्रदेशाची उत्तरेकडील हद्द सुरु होते.
|
7. 7 तेथून ती सीमा आखोर खोऱ्यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेला गिलगालकडे वळते. हे गिलगाल अदुम्मीमाच्या चढणीसमोर नदीच्या दक्षिणेला आहे. एन-शेमेश नावाच्या झऱ्याजवळून गेल्यावर या सीमेचा शेवट एन रोगेल येथे होतो.
|
8. 8 तेथून ती सीमा हिन्नोम पुत्राच्या खोऱ्यातून यबूसी म्हणजेच यरुशलेमच्चा दक्षिणेकडून पश्चिमेकडे हिन्नोमाच्या खोऱ्यासमोर आणि रेफाईम खोऱ्याच्या उत्तर टोकाला असलेल्या, पहाडाच्या माथ्यावर गेली आहे.
|
9. 9 तेथून ती सीमा नफ्तोहाच्या झऱ्यापर्यंत जाते आणि एफ्रोन डोंगरातील नगरांरुन निघून बाला म्हणजेच किर्याथ-यारीम येथपर्यंत पोचते.
|
10. 10 मग बालापासून ही सीमा पश्चिमेला सेईर डोंगराकडे वळून यारीम डोंगर (म्हणजेच कसालोन) याच्या उत्तरेकडल्या भागाजवळून जाते आणि बेथ-शेमेशकडे उत्तरून तिम्नाकडे जाते.
|
11. 11 मग एक्रोनच्या उत्तरेकडे असलेल्या टेकडीकडे आणि तेथून शिक्रोनापर्यंत पुढे जाऊन बाला डोंगराजवळून यबनेलास पर्यंत जाऊन भूमध्यसमुद्रापाशी तिचा शेवट होतो.
|
12. 12 भूमध्यसमुद्र ही यहूदाच्या भूमीची पश्चिमेकडील हद्द. तेव्हा या चतु:सीमेच्या आतील प्रदेशात यहूदाचे यहूदाचे वंशज राहिले.
|
13. 13 यकुन्नेचा मुलगा कालेब याला यहूदाच्या प्रदेशातील काही भूमी द्यायची परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केली होती. त्या आज्ञेप्रमाणे यहोशवाने कालेबला किर्याथ-आर्बा (हेब्रोन) हे नगर दिले. (आर्बा हा अनाकचा पिता)
|
14. 14 शेशय, अहीमान आणि तलमय या हेब्रोन मध्ये राहणाऱ्या तीन अनाकी कुटुंबांना कालेबने तेथून घालवून दिले.
|
16. 16 कालेब म्हणाला, “किर्याथ-सेफरचा मला पाडाव करायचा आहे. जो कोणी या शहरावर चढाई करुन त्याचा पराभकरील त्याला मी माझी मुलगी अखसा देईन. त्यांचे लग्न लावून देईन.
|
18. 18 अखसा अथनिएलकडे आली. तेव्हा अथनिएलने अखसाला आपल्या वडीलांजवळ आणखी जमीन मागायला सांगितले. अखसा वडीलांकडे निघाली. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबने तिला विचारले “तुला काय हवे?”
|
19. 19 अखसा म्हणाली, “मला एक भेट द्या. तुम्ही मला नेगेव मधील रखरखीत वाळवंटी जमीन दिलीत. आता पाणी असलेली जमीन द्या” तेव्हा कालेबने तिच्या मनाप्रमाणे केले. त्याने तिला त्या प्रदेशातील वरच्या व खालच्या बाजूचे झरे दिले.
|
20. 20 यहूदाच्या वंशातील लोकांना परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे भूमी मिळाली. त्यांच्यातील प्रत्येक कुळाला वतन मिळाले.
|
21. 21 नेगेवच्या दक्षीणभागातील, अदोमच्या सीमेजवळची सर्व नगरे त्यांना मिळाली. त्यांची यादी खालीलप्रमाणे; कबसेल, एदेर, यागूर,
|
32. 32 लवावोथ, शिलहीम, अईन, रिम्मोन. सर्व मिळून ही एकोणतीस नगरे व त्या भोवतालची शेतजमीन. पश्चिमेकडील डोंगरपायथावरची नगरेही यहूदाच्या कुळातील लोकांना मिळाली. ती नगरे अशी.
|
45. 45 एक्रोन, त्या भोवतालची खेडी व जमीन तसेच एक्रोनच्या परिचमेकडील भाग आणि आश्दोद जवळची सर्व गावे व जमीन यहूदाच्या वंशजांना मिळाली.
|
47. 47 आश्दोदच्या भोवतालचा प्रदेश व गावे याबरोबरच त्यांना गज्जा भोवतालचा प्रदेश व त्याच्या जवळची गावे ही मिळाली. मिसरची नदी व भूमध्य समुद्र किनाऱ्यालगतचा प्रदेश येथपर्यंत त्यांचा भूभाग पसरला होता.
|
54. 54 हुमटा, किर्याथ-अर्बा (म्हणजेच हेब्रोन) व सियोर ही नऊ नगरे व त्या भोवतालची खेडी त्यांना मिळाली.
|
63. 63 तथापि, यरुशलेममधील यबूसी लोकांना यहूदाचे सैन्य बाहेर काढू शकले नाही. म्हणून यरुशलेम मध्ये आजही यहूदांबरोबर यबूसी लोक राहतात.
|