2. 2 परमेश्वरा, तुझे प्रेम सार्वकालिक आहे यावर माझा विश्वास आहे. तुझी इमानदारी आकाशा इतकी अथांग आहे.
|
5. 5 परमेश्वरा, तू अद्भुत गोष्टी करतोस याबद्दल स्वर्ग तुझी स्तुती करतात. लोक तुझ्यावर अवलंबून राहू शकतात. पवित्र लोकांची सभा याबद्दलचे गाणे गाते.
|
7. 7 देव पवित्र लोकांना भोटतो. ते देवदूत त्याच्या सभोवती असतात. ते देवाला घाबरतात आणि त्याला मान देतात. ते भयग्रस्त होऊन त्याच्या भोवती उभे राहातात.
|
8. 8 सर्वशाक्तिमान परमेश्वरा, देवा, तुझ्यासारखा कुणीही इथे नाही. आम्ही तुझ्यावर संपूर्ण विश्वास टाकू शकतो.
|
11. 11 देवा, स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वगोष्टी तुझ्या आहेत, तूच जग आणि त्यातल्या सर्वगोष्टी निर्माण केल्यास.
|
12. 12 उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या सर्व गोष्टी तूच निर्माण केल्यास ताबोर पर्वत आणि हार्मोन पर्वत तुझ्या नावाचा जयजयकार करतात.
|
19. 19 तू तुझ्या भक्तांशी दृष्टांतात बोललास आणि म्हणालास, “मी गर्दीतला एक माणूस निवडला आणि त्या माणसाला महत्व दिले. मी त्या तरुण सैनिकाला बलवान केले.
|
23. 23 मी त्याच्या शत्रूंना संपवले, जे लोक माझ्या निवडलेल्या राजाचा तिरस्कार करीत होते त्यांचा मी पराभव केला.
|
24. 24 माझ्या निवडलेल्या राजावर मी नेहमी प्रेम करीन आणि त्याला मदत करीन. मी त्याला नेहमी सामर्थ्यवान बनवेन.
|
30. 30 जर त्याचे वंशज माझा कायदा पाळायचे थांबवतील आणि माझ्या आज्ञा पाळणे बंद करतील तर मी त्यांना शिक्षा करेन.
|
33. 33 परंतु त्या लोकांवरचे माझे प्रेम मी कधीच बाजूला करणार नाही. मी त्यांच्याशी नेहमी निष्ठावान राहीन.
|
37. 37 ते चंद्राप्रमाणे सदैव राहील. आकाश या कराराचा पुरावा आहे त्या करारावर तुम्ही विश्वास ठेवू शकता.”
|
43. 43 देवा, तू त्यांना स्व:तचे रक्षण करायला मदत केलीस. तू तुझ्या राजाला युध्द जिंकायला मदत केली नाहीस.
|
46. 46 परमेश्वरा, हे किती काळ चालणार आहे? तू आमच्याकडे सदैव दुर्लक्ष करणार आहेस का? तुझा राग अग्रीसारखा सदैव धुमसत राहाणार आहे का?
|
47. 47 माझे आयुष्य किती लहान आहे ते लक्षात ठेव तू आम्हाला छोटे आयुष्य जगण्यासाठी व नंतर मरुन जाण्यासाठी निर्माण केलेस.
|
49. 49 देवा, तू पूर्वी दाखवलेले प्रेम कुठे आहे? तू दावीदला त्याच्या कुटुंबाशी इमान राखण्याचे वचन दिले होतेस.
|
50. 50 प्रभु, तुमच्या सेवकाचा लोकांनी कसा अपमान केला होता ते लक्षात ठेवा. परमेश्वरा, तुझ्या शत्रूंनी केलेल्या सर्व अपमानांना मला तोंड द्यावे लागले. त्या लोकांनी तू निवडलेल्या राजाचा अपमान केला.
|