1. 1 मी राजासाठी या गोष्टी लिहितो तेव्हा माझे मन सुंदर शब्दांनी भरुन जाते. एखाद्या कसबी लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत त्याप्रमाणे माझ्या जिभेतून शब्द येतात.
|
4. 4 तू खूप अद्भूत दिसतोस जा आणि चांगल्यासाठी व न्यायासाठी होत असलेली लढाई जिंकून ये. तुझा बलवान उजवा हात विस्मयजनक गोष्टी करण्यासाठी वापर.
|
7. 7 तुला चांगुलपणा आवडतो आणि तू वाईटाचा तिरस्कार करतो म्हणून देवा, तुझ्या देवाने तुलाच तुझ्या मित्रांचाराजा निवडले.
|
8. 8 तुझ्या वस्त्रांना बोळ, अगरु, ऊद आणि दालचिनी यांचा सुगंध येतो. हस्तिदंताने अच्छादलेल्या महालातून तुला आनंदीत करण्यासाठी संगित ऐकू येते.
|
9. 9 राजांच्या मुली करवल्या आहेत. तुझी वधू तुझ्या उजव्या हाताला शुध्द सोन्याचा मुगुट धारण करुन उभी आहे.
|
10. 10 मुली, माझे ऐक, लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुला कळेल. तुझी माणसे आणि तुझ्या वडिलांचे कुटुंबयांना विसरुन जा.
|