3. 3 त्याने छावणीच्या बाहेर जाऊन त्या महारोग्याला तपासावे व त्याचा महारोग बरा झाला आहे किंवा नाही ते पाहावे.
|
4. 4 तो बरा झाला असल्यास त्याने त्याला शुद्ध होण्यासाठी दोन जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब घेऊन येण्यास सांगावे.
|
6. 6 याजकाने जिवंत पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही सामग्री घेऊन जिवंत पक्षासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात बुडवावी;
|
7. 7 आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवावयाच्या माणसावर सात वेळा शिंपडावे; मग तो शुद्ध झाला आहे असे सांगावे व त्यानंतर याजकाने माळरानात जाऊन त्या जिवंत पक्ष्याला सोडून द्यावे;
|
8. 8 “मग शुद्ध ठरवावयाच्या माणसाने आपले कपडे धुवावे, आपले मुंडन करुन घ्यावे आणि पाण्याने स्नान करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने छावणीत यावे; तरी त्याने सात दिवस आपल्या तंबूबाहेर राहावे;
|
9. 9 सातव्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावे; आपले कपडे धुवावे व पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध होईल.
|
10. 10 “आठव्या दिवशी त्या माणसाने दोन निर्दोष कोकरे, एक वर्षाची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला चोवीसवाट्या-तीन दशांश एफा-मैदा, व दोन तृतीय अंश पिंट-एक लोगभर तेल ही सामग्री याजकाकडे आणावी;
|
11. 11 आणि शुद्ध ठरविणाऱ्या याजकाने शुद्ध ठरवावयाच्या माणसाला, त्या अर्पण करावयाच्या सामग्रीसह परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी उभे करावे.
|
13. 13 मग याजकाने पवित्र स्थानात जेथे पापबली व होमबली ह्यांचा वध करतात तेथे ते कोकरु वधावे कारण पापबली प्रमाणेच दोषबलीवरही याजकाचा हक्क आहे; हे अर्पण परमपवित्र आहे.
|
14. 14 “मग याजकाने दोषबलीचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे.
|
16. 16 मग त्याने आपल्या उजव्या हाताचे बोट आपल्या डाव्या तळहातावरील तेलात बुडवून त्यातले काही परमेश्वरासमोर सात वेळा बोटाने शिपडावे.
|
17. 17 त्याच्या तळहातावर जे तेल उरेल त्यातले काही घेऊन याजकाने शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीवरील, उजव्या हाताच्या अंगठ्यावरिल दोषार्पणाच्या रक्तावर लवावे.
|
18. 18 तळहातावर उरलेले तेल याजकाने शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या डोक्याला लावावे आणि अशा प्रकारे त्या माणसासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे.
|
19. 19 “मग याजकाने पापबली अर्पावा आणि शुद्ध ठरवावयाच्या माणसासाठी प्रायश्चित करावे; त्यानंतर त्याने होमबलीचा वध करावा;
|
20. 20 मग याजकाने होमबली व अन्नबली वेदीवर अर्पून त्या माणसासाठी प्रायश्चित करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.
|
21. 21 “परंतु तो माणूस गरीब असून एवढे आणण्याची त्याला ऐपत नसेल तर त्याने आपल्या प्रायश्चितासाठी ओवळणीचे एक कोंकरु दोषार्पण म्हणून आणावे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेला, आठ वाट्या-एक दशांश एफा-मैदा आणि दोन तृतीय अंश पिंटभर-एक लोगभर-तेल आणावे;
|
22. 22 आणि ऐपतीप्रमाणे दोन होले किंवा पारव्याची दोन पिले त्याने आणावी; त्यातील एक पापबली व एक होमबली व्हावा.
|
23. 23 “आठव्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्याने ही सामग्री घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर जावे.
|
24. 24 मग याजकाने ते दोषार्पणाचे कोंकरु व लोगभर तेल घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे.
|
25. 25 त्यानंतर याजकाने दोषार्पणाच्या कोंकराचा वध करावा आणि त्याने त्याचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या उजव्या पायाच्या अंगठ्यांना लावावे.
|
28. 28 मग याजकाने आपल्या तळहातावरील काही तेल घेऊन शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीवर, उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्यांवर, दोषबलीचे रक्त लावलेल्या जागेवर लावावे;
|
29. 29 याजकाने तळहातावर उरलेले तेल शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या डोक्याला परमेश्वरासमोर त्या माणसासाठी प्रायश्चित म्हणून लावावे.
|
30. 30 “मग त्याच्या ऐपतीप्रमाणे त्याला मिळालेले होले किंवा पारव्याची पिले ह्यांच्यापैकी एकाचे त्याने अर्पण करावे;
|
31. 31 त्यांच्यापैकी एकाचे पापार्पण करावे व दुसऱ्याचे होमार्पण करावे; पक्ष्यांची ही अर्पणे त्याने अन्नार्पणासहित करावी; ह्या प्रकारे याजकाने शुद्ध ठरवावयाच्या माणसाकरिता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे; मग तो माणूस शुद्ध होईल.”
|
32. 32 अंगावरील महारोगाचा चट्ठा बरा झालेल्या माणसाला आपल्या शुद्धीकरणासाठी साहित्य मिळण्याची ऐपत नसलेल्या माणसाच्या शुद्धीकरणासंबंधी हे नियम आहेत.
|
34. 34 “कनान देश मी तुम्हाला वतन म्हणून देत आहे. तुमचे लोक त्यात जाऊन पोहोंचतील त्यावेळी तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्ठा पाडला,
|
36. 36 “मग याजकाने लोकांना घर रिकामे करण्याची आज्ञा द्यावी; लोकांनीही घरातील सर्व वस्तू याजक, चट्ठा तपासण्यासाठी घरात जाण्याच्या अगोदर बाहेर काढाव्या नाही तर घरातील सर्व वस्तू अशुद्ध ठरावयाच्या. मग याजकाने रिकाम्या घरात जाऊन ते तपासावे.
|
37. 37 तो चट्ठा त्याने तपासावा, आणि घराच्या भिंतीवर हिरवट किंवा तांबूस रंगाची छिद्रे किंवा खळगे असतील व ती भिंतीच्या पृष्ठभागाच्या आत गेली असतील.
|
39. 39 “मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा जाऊन ते घर तपासावे आणि तो चट्ठा घराच्या भिंतीवर पसरला असल्यास,
|
40. 40 चट्ठा असलेले दगड काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध जागी टाकून देण्याची त्याने लोकांना आज्ञा द्यावी.
|
41. 41 मग त्याने घर लोकांकडून आतून खरडवून घ्यावे आणि खरडवून काढलेला चुना नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी लोकांनी टाकून द्यावा.
|
42. 42 त्या माणसाने त्या दगडांच्या ऐवजी भिंतीत दुसरे दगड बसवावे आणि त्या घराला नव्या चुन्याचा गिलावा करावा.
|
43. 43 “जुने दगड काढून नवीन दगड बसविल्यावर व घर खरडवून नवीन गिलावा केल्यावर जर तो चट्ठा घरात पुन्हा उद्भवला.
|
44. 44 तर याजकाने आत जाऊन तो तपासावा; घरात तो चट्ठा पसरला असल्यास तो घरात चरत जाणारा महारोगाचा चट्ठा होय; ते घर अशुद्ध आहे.
|
45. 45 मग त्या माणसाने ते घर खणून पाडावे; त्याचे दगड, लाकूड व सगळा चुना त्याने तेथून काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध ठिकाणी फेकून द्यावा.
|
48. 48 “घराला नवीन दगड बसविल्यावर व नवीन गिलावा केल्यावर याजकाने आत जाऊन ते घर तपासावे आणि घरात चट्ठा परत उद्भवला नसेल तर त्या घरातला चट्ठा गेल्यामुळे त्याने ते शुद्ध ठरवावे.
|
49. 49 “त्या घराच्या शुद्धीकरणासाठी दोन पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही त्याने आणावी;
|
51. 51 मग त्याने गंधसरुचे लाकूड, एजोब, किरमिजी रंगाचे कापड व जिवंत पक्षी घेऊन त्या मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात व वाहात्या पाण्यात बुडवून त्या घरावर सात वेळा शिंपडावे;
|
53. 53 मग त्याने तो जिंवत पक्षी नगराबाहेर जाऊन माळरानात सोडून द्यावा; ह्या प्रकारे त्याने घरासाठी केले म्हणजे ते शुद्ध होईल.”
|