1. 1 मग मी करुब दूतांवर असलेल्या वाडग्याकडे पाहिले. तो इंद्रनीलाप्रमाणे नितळ निळा दिसत होता. आणि त्यावर सिंहासनासारखे काहीतरी होते.
|
2. 2 नंतर सिंहासनावर जो बसलेला होता तो तागाचे कपडे घातलेल्याला देव म्हणाला, “करुब दूताच्या खाली असलेल्या चाकांच्या मधल्या जागेतपाऊल टाक. त्यांच्या मधून थोडे निखारे घे. व ते यरुशलेमवर भिरकावून दे.”तो माणूस माझ्या जवळून पुढे गेला.
|
4. 4 मग करुब दूतांवरुन परमेश्वराची प्रभा फाकली आणि मंदिराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली. मग ढगाने मंदिरच व्यापले आणि परमेश्वराच्या प्रभेतून निघालेल्या तेजस्वी प्रकाशाने सर्व अंगणच व्यापले.
|
5. 5 मग करुबांच्या पंखाचा आवाज ऐकला. सर्वशक्तिमान देव बोलू लागताच होणाऱ्या गडगडाटी आवाजासारखा तोही आवाज प्रचंड होता. बाहेरच्या अंगणापर्यंत तो सहज ऐकू येऊ शकत होता.
|
6. 6 करुबांच्या मध्ये असलेल्या चाकातल्या दरम्यान जाऊन निखारे आणण्याची आज्ञा देवाने तागाचे कपडे घातलेल्या माणसाला दिली. मग तो त्या ढगात शिरला व एका चाकाजवळ उभा राहिला.
|
7. 7 मग एका करुबाने हात लांब करुन, त्यांच्यामधील काही धगधगते निखारे उचलले आणि त्या माणसाच्या हाती दिले. मग तो माणूस निघून गेला.
|
9. 9 मग तेथे चार चाके असल्याचे माझ्या लक्षात आले. प्रत्येक करुबाजवळ एक चाक होते. ती चाके नितळ तृणमण्याप्रमाणे दिसत होती.
|
11. 11 ती चालताना कोठत्याही दिशेने जात. पण करुब चालताना कोणत्याही बाजूला वळत नसत. ज्या बाजूस त्यांचे डोके होते, त्या बाजूसच ते जात. ते इकडे तिकडे वळत नसत.
|
12. 12 त्यांच्या सर्वांगावर म्हणजेच पाठींवर, हातांवर, पंखांवर डोळे होतेच पण त्याशिवाय चाकांवरही डोळे होते.
|
14. 14 प्रत्येक करुब दूताला चार तोंडे होती. पहिले करुबाचे तोंड, दुसरे माणसाचे तोंड, तिसरे सिंहाचे तोंड व चवथे गरुडाचे तोंड खबार कालव्याजवळच्या दृष्टान्तात मी पाहिलेले प्राणी म्हणजे करुब दूतच होते.मग करुब हवेत उडाले.
|
16. 16 आणि चाकेही त्यांच्याबरोबर वर गेली. जेव्हा करुब पंख पसरुन हवेत उडत, तेव्हा चाके दिशा बदलत नसत.
|
17. 17 करुब हवेत उडाले, तर चाकेही उडत. ते स्थिर उभे राहिले, तर चाकेही स्थिर राहात. का? कारण प्राण्यांचा वारा (शक्ती) त्यांच्यात होता.
|
19. 19 मग करुबांनी पंख पसरले व ते हवेत उडाले. मी त्यांना मंदिर सोडून जाताना पाहिले. चाकेही त्यांच्याबरोबर गेली मग ते देवाच्या मंदिराच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वाराशी थांबले. इस्राएलच्या देवाची प्रभा त्यांच्या वरच्या बाजूला होती.
|
20. 20 मग मी खबार कालव्याजवळ इस्राएलच्या देवाच्या प्रभेखाली पाहिलेल्या प्राण्याला ओळखले आणि माझ्या लक्षात आले की ते प्राणी म्हणजे करुब दूतच होते.
|
22. 22 खबार कालव्याजवळ पाहिलेल्या चार तोंडाप्रमाणेच करुब दूतांची तोंडे होती. ते जात असलेल्या दिशेकडेच सरळ पाहात होते.
|