मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. पृथ्वीवरील सारे काही आनंदाने देवाचा जय जयकार करीत आहे.
2. देवाच्या गौरवी नावाचा जय जयकार करा. स्तुतिगीतांनी त्याचा सन्मान करा.
3. त्याचे काम किती आश्चर्यजनक आहे, चांगले आहे ते त्याला सांगा. देवा, तुझी शक्ती महान आहे तुझे शत्रू तुझ्या पुढे नतमस्तक होतात. ते तुला घाबरतात.
4. सगळ्या जगाला तुझी उपासना करु दे प्रत्येकाला तुझ्या नावाचा महिमा गाऊ दे.
5. देवाने केलेल्या गोष्टी बघा त्या गोष्टी आम्हाला आश्चर्यचकित करतात.
6. देवाने समुद्राचे कोरडे वाळवंट बनवले त्याची आनंदी माणसे चालत नदीच्या पलिकडे गेली.
7. देव त्याच्या महान शक्तिमुळे जगावर राज्य करतो देव सगळीकडच्या लोकांवर लक्ष ठेवतो, त्याच्याविरुध्द कुणीही बंड करु शकत नाही.
8. लोकहो! आमच्या देवाची स्तुती करा. त्याची स्तुती करणारी गीते मोठ्याने गा.
9. देवाने आम्हाला जीवन दिले. देव आम्हाला संरक्षण देतो.
10. लोक चांदीची अग्रि परीक्षा करतात तशी देवाने आमची परीक्षा पाहिली.
11. देवा, तू आम्हाला सापळ्यात अडकू दिलेस. तू आमच्यावर जड ओझी लादलीस.
12. तू आमच्या शत्रूंना आमच्यावरुन चालू दिलेस. तू आम्हाला पाण्यातून आणि आगीतून फरफटत नेलेस. परंतु तू आम्हाला सुरक्षित ठिकाणी आणलेस.
13. (13-14) म्हणून मी तुझ्या मंदिरात तुला होमबली अर्पण करण्यासाठी बळी घेऊन येईन. मी संकटात होतो तेव्हा तुझ्याकडे मदत मागितली. मी तुला अनेक वचने दिली, आता मी वचन दिल्याप्रमाणे तुला त्या गोष्टी देत आहे.
14.
15. मी तुला पापार्पण करीत आहे. मी तुला धुपासहित मेंढ्या अर्पण करीत आहे. मी तुला बैल आणि बोकड अर्पण करीत आहे.
16. देवाची उपासना करणाऱ्या सर्वांनो, इकडे या. देवाने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हाला सांगतो.
17. मी त्याची प्रार्थना केली, मी त्याची स्तुती केली.
18. माझे मन शुध्द होते म्हणून माझ्या प्रभुने माझे ऐकले.
19. देवाने माझे ऐकले. त्याने माझी प्रार्थना ऐकली.
20. देवाची स्तुती करा देव माझ्यापासून दूर गेला नाही. त्याने माझी प्रार्थना ऐकली. देवाने मला त्याचे प्रेम दाखवले.

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 66 / 150
स्तोत्रसंहिता 66:77
1 पृथ्वीवरील सारे काही आनंदाने देवाचा जय जयकार करीत आहे. 2 देवाच्या गौरवी नावाचा जय जयकार करा. स्तुतिगीतांनी त्याचा सन्मान करा. 3 त्याचे काम किती आश्चर्यजनक आहे, चांगले आहे ते त्याला सांगा. देवा, तुझी शक्ती महान आहे तुझे शत्रू तुझ्या पुढे नतमस्तक होतात. ते तुला घाबरतात. 4 सगळ्या जगाला तुझी उपासना करु दे प्रत्येकाला तुझ्या नावाचा महिमा गाऊ दे. 5 देवाने केलेल्या गोष्टी बघा त्या गोष्टी आम्हाला आश्चर्यचकित करतात. 6 देवाने समुद्राचे कोरडे वाळवंट बनवले त्याची आनंदी माणसे चालत नदीच्या पलिकडे गेली. 7 देव त्याच्या महान शक्तिमुळे जगावर राज्य करतो देव सगळीकडच्या लोकांवर लक्ष ठेवतो, त्याच्याविरुध्द कुणीही बंड करु शकत नाही. 8 लोकहो! आमच्या देवाची स्तुती करा. त्याची स्तुती करणारी गीते मोठ्याने गा. 9 देवाने आम्हाला जीवन दिले. देव आम्हाला संरक्षण देतो. 10 लोक चांदीची अग्रि परीक्षा करतात तशी देवाने आमची परीक्षा पाहिली. 11 देवा, तू आम्हाला सापळ्यात अडकू दिलेस. तू आमच्यावर जड ओझी लादलीस. 12 तू आमच्या शत्रूंना आमच्यावरुन चालू दिलेस. तू आम्हाला पाण्यातून आणि आगीतून फरफटत नेलेस. परंतु तू आम्हाला सुरक्षित ठिकाणी आणलेस. 13 (13-14) म्हणून मी तुझ्या मंदिरात तुला होमबली अर्पण करण्यासाठी बळी घेऊन येईन. मी संकटात होतो तेव्हा तुझ्याकडे मदत मागितली. मी तुला अनेक वचने दिली, आता मी वचन दिल्याप्रमाणे तुला त्या गोष्टी देत आहे. 14 15 मी तुला पापार्पण करीत आहे. मी तुला धुपासहित मेंढ्या अर्पण करीत आहे. मी तुला बैल आणि बोकड अर्पण करीत आहे. 16 देवाची उपासना करणाऱ्या सर्वांनो, इकडे या. देवाने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हाला सांगतो. 17 मी त्याची प्रार्थना केली, मी त्याची स्तुती केली. 18 माझे मन शुध्द होते म्हणून माझ्या प्रभुने माझे ऐकले. 19 देवाने माझे ऐकले. त्याने माझी प्रार्थना ऐकली. 20 देवाची स्तुती करा देव माझ्यापासून दूर गेला नाही. त्याने माझी प्रार्थना ऐकली. देवाने मला त्याचे प्रेम दाखवले.
Total 150 अध्याय, Selected धडा 66 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References