मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
यहेज्केल
1. मला मग परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला,
2. “मानवपुत्रा, यरुशलेमच्या लोकांना त्यांनी केलेल्या भयंकर कृत्यांबद्दल सांग.
3. ‘परमेश्वर, माझा प्रभू, यरुशलेमला पुढील गोष्टी सांगतो, असे तू त्याना सांगितले पाहिजे. तुझ्या इतिहासावर नजर टाक. कनानमध्ये तुझा जन्म झाला. तुझे वडील अमोरी व आई हित्ती होती.
4. यरुशलेम, तू जन्मलीस तेव्हा तुझी नाळ कापायला कोणीही नव्हते. कोणीही मीठ टाकून तुला आंघोळ घातली नाही वा तुला दुपट्यात गुंडाळले नाही.
5. यरुशलेम, तू अगदी एकटी होतीस. कोणाला तुझ्यासाठी वाईट वाटले नाही वा कोणीही तुझी काळजी घेतली नाही. तू जन्मताच, तुझ्या आईवडिलानी तुला शेतात टाकून दिले. त्यावेळी तू रक्ताने माखलेली होतीस, तुझ्या अंगावर वारही तशीच होती.
6. “त्याच वेळी मी तुझ्याजवळून गेलो. मी तुला रक्तात लोळताना व हातपाय हालविताना पाहिले. तू रक्ताने माखली होतीस. पण मी तुला म्हणालो, “जिवंत राहा” खरेच, तू रक्ताने माखलेली असूनसुद्धा मी म्हणालो “जिवंत राहा.”
7. शेतातल्या रोप्याला जगवावे, तसे तुला जगवायला मी मदत केली. तू वाढत गेलीस आणि तरुणी झालीस. तू वयात आलीस, तुझ्यात तारुण्याची लक्षणे दिसू लागली. तुझे केसही वाढू लागले, पण तरीसुद्धा तू विवस्त्रच होतीस, उघडीच होतीस.
8. मी तुला पाखरले. तू प्रणयोत्सुक झाली होतीस. म्हणून माझे वस्त्र तुला लपेटूनमी तुझी नग्नता झाकली. मी तुला लग्नाचे वचन दिले. मी तुझ्याबरोबर करार केला आणि तू माझी झालीस.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
9. “मी तुला आंघोळ घातली. तुझ्या अंगावरचे रक्त धुवून काढले. तुझ्या अंगाला तेल चोळले.
10. मीतुला उत्तम वस्त्रे व मऊ चामड्याचे जोडे दिले. तुझ्या डोक्याला तागाचा पट्टा गुंडाळला व तुला रेशमी ओढणी पांघरली.
11. मग मी तुला काही दागिने दिले. तुझ्या हातात बांगड्या व गळ्यात हार घातला.
12. मी तुला नथ, कर्णभूषणे आणि सुंदर मुकुट देऊन सजविले.
13. तू तुझ्या सोन्या-चांदीच्या अलंकारात व ताग, रेशीम यांच्या कशिदा काढलेल्या वस्त्रांत फारच सुंदर दिसत होतीस. तू चांगल्यातले चांगले अन्न खाल्लेस. तुझे सौंदर्य अप्रतिम होते. तू राणी झालीस!
14. तुझ्या सौंदर्याने तुला प्रसिद्धी मिळाली. पण माझ्यामुळे तू सुंदर झालीस!” परमेश्वराने, माझ्या प्रभूने ह्या गोष्टी सांगितल्या.
15. देव म्हणाला, “पण तू आपल्या सौंदर्यावरच विश्वास ठेवायला सुरवात केलीस. तू तुझ्या चांगल्या नावाचा उपयोग करुन माझा विश्वासघात केलास. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाबरोबर तू वेश्येप्रमाणे वागलीस. त्या सर्वांच्या तू स्वाधीन झालीस.
16. तुझ्या सुंदर वस्त्रांचा उपयोग तू तुझी पूजास्थाने सजविण्यासाठी केलास. आणि तेथे तू वेश्येसारखे वर्तन केलेस. तुझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाच्या तू स्वाधीन झालीस.
17. मग मी तुला दिलेल्या सोन्या चांदीच्या अलंकाराचा उपयोग तू पुरुषांचे पुतळे बनविण्यासाठी केलास आणि त्या पुतळ्यांशीही व्यभिचार केलास.
18. सुंदर कापड आणून तू त्या मूर्तींना कपडे शिवलेस. मी तुला दिलेले अत्तर आणि धूप तू त्या मूर्तींपुढे ठेवलास.
19. मी तुला भाकरी, मध व तेल दिले. तेही तू त्या मूर्तींना दिलेस. तू खोट्या देवांनी प्रसन्न व्हावे म्हणून सुगांधित द्रव्ये म्हणून ह्या सर्व गोष्टी त्यांना अर्पण केल्यास. त्या खोट्या देवांबरोबर तू वेश्येप्रमाणे वागलीस.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
20. देव म्हणाला, “आपल्याला मुले झाली. पण तू आपली मुले घेतलीस व त्यांना ठार करुन खोट्या देवांना अर्पण केलेस. मला फसवून त्या खोट्या देवांकडे जाताना तू जी दुष्कृत्ये केलीस त्यातील ही फक्त काहीच होत.
21. “तू माझ्या मुलांचा वध केलास आणि अग्निद्वारा त्यांना त्या खोट्या देवापर्यंत पोहोचविलेस.
22. तू माझा त्याग केलास आणि अशी दुष्कृत्ये केलीस. तुला तुझ्या बालपणाचे विस्मरण झाले. मला तू सापडलीस तेव्हा तू नग्नावस्थेत रक्तात लोळत होतीस हे तुला आठवले नाही.
23. “ह्या सर्व दुष्कृत्यानंतर हे यरुशलेम, तुझे भले होणार नाही.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो.
24. “ह्या सर्व गोष्टीनंतर, तू त्या खोट्या देवांना पूजण्यासाठी मातीचा ढिगारा रचलास. प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर तू अशी पूजास्थाने बांधलीस.
25. प्रत्येक रस्त्याच्या सुरवातीला तू मातीचे ढिगारे रचलेस. तू तुझ्या सौंदर्याला कमीपणा आणलास, तुझ्या सौंदर्याचा उपयोग तू तुझ्या जवळून जाणाऱ्या प्रत्येकाला पकडण्यासाठी केलास. त्यांना तुझे पाय दिसावे म्हणून तू तुझी वस्त्रे वर उचललीस आणि त्यांच्याबरोबर वेश्येसारखी वागलीस.
26. मग मोठे लिंग असलेल्या शेजाऱ्याकडे, मिसरकडे तू गेलीस व मला संतापविण्यासाठी त्याच्याबरोबर अनेकदा व्यभिचार केलास.
27. म्हणून मी तुला शिक्षा केली. तुझ्या भत्तयातील काही भाग (जमीन) मी काढून घेतला. तुझ्या शत्रूंना म्हणजेच पलिष्ट्यांच्या मुलींना (शहरांना) त्यांना पाहिजे तसे तुझ्याशी वागू दिले. तुझी दुष्कृत्ये पाहून त्यांनासुध्दा धक्काबसला.
28. मग तू अश्शूरकडे व्यभिचार करण्यासाठी गेलीस. पण तुझे समाधान होऊ शकले नाही. तुझी कधीच तृप्ती झाली नाही.
29. म्हणून मग तू कनानकडे वळलीस व तेथून खास्द्यांकडे गेलीस. पण अजूनही तू तृप्त नाहीस.
30. तू खूपच दुर्बल आहेस. म्हणूनच सर्व पुरुषांनी (देशांनी) तुला पापे करायला लावले. तू निर्दयपणे हुकमत चालवणाऱ्या वेश्येप्रमाणे वागलीस.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
31. देव म्हणाला, “पण तू पूर्णपणे वेश्यावृत्ती पत्करली नाहीस. तू प्रत्येक रस्त्याच्या टोकाला मातीचे ढिगारे रचलेस व प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर पूजास्थाने बांधलीस. तू सर्व पुरुषांबरोबर व्यभिचार केलास.पण तू, वेश्येप्रमाणे, त्यांच्याजवळ मोबदला मागितला नाहीस.
32. “व्यभिचारिणी, तुला स्वत:च्या पतीऐवजी परक्यांबरोबर व्यभिचार करायला आवडतो.
33. बहुतेक वेश्या पुरुषांना पैसे देण्यास भाग पाडतात. पण तूच सर्व प्रियकरांना पैसे दिलेस. तू व्यभिचारासाठी तुझ्याकडे बोलविलेल्या सर्व पुरुषांना पैसे दिलेस.
34. तू बहुतेक वेश्यांच्या अगदी उलट वागलीस. त्या पुरुषांकडून सक्तीने पैसे घेतात, तर तू तुझ्याबरोबर व्यभिचार करण्यासाठी उलट पुरुषांनाच पैसे देतेस.”
35. वारांगने, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐक.
36. परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो, “तू पैसा खर्च केलास आणि तुझ्या प्रियकरांना आणि घाणेरड्या देवांना तुझे नग्न शरीर पाहू दिलेस, तुझ्याबरोबर व्याभिचार करु दिलास. तुझ्या मुलाना ठार मारुन त्यांचे रक्त खोट्या देवांना भेट म्हणून दिलेस.
37. म्हणून मी तू ज्यांच्यावर प्रेम केलेस, त्या तुझ्या सर्व प्रियकरांना आणि ज्यांचा तू तिरस्कार करतेस त्यांना, एकत्र आणीन आणि तुझे नग्न शरीर पाहू देईन.तुझे संपूर्ण नग्न शरीर ते पाहतील.
38. मग मी तुला शिक्षा करीन. खुनी व व्यभिचाराचे पाप केलेल्या स्त्रीप्रमाणे मी तुला शिक्षा करीन. क्रोधाविष्ट व मत्सरी पतीकडून व्हावी, तशी शिक्षा तुला होईल.
39. मी त्या तुझ्या प्रियकरांच्या हाती तुला देईन. ते तुझे मातीचे ढिगारे उद्ध्वस्त करतील. तुझी पूजास्थाने जाळतील. तुझी वस्त्रे फाडतील आणि तुझे सुंदर अलंकार घेतील. मला तू ज्या अवस्थेत सापडलीस, त्याच अवस्थेत (उघडी व नग्न) तुला ते सोडतील.
40. तुला ठार करण्यासाठी लोकांना जमवून ते तुझ्यावर दगड फेकतील. मग तलवारीने तुझे तुकडे तुकडे करतील.
41. ते तुझे घर (मंदिर) जाळतील. इतर स्त्रियांना कळावे म्हणून ते तुला शिक्षा करतील. मी तुला वेश्येप्रमाणे वागू देणार नाही. तुझ्या प्रियकरांना पैसे देऊ देणार नाही.
42. मग माझा राग व मत्सर निवळेल मी शांत होईन. पुन्हा कधीही रागावणार नाही.
43. हे सर्व का घडलं? कारण बालपणी काय घडले ह्याचे तुला विस्मरण झाले. तू वाईट गोष्टीबद्दल मला तुला शिक्षा करावी लागली. पण तू त्याहून भयंकर गोष्टी करण्याचा बेत केलास.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
44. “तुझ्याबद्दल बोलणाऱ्या सर्व लोकांना आता आणखी एक गोष्ट सांगायला मिळेल. ‘ती म्हणजे, खाण तशी माती (जशी आई, तशी लेक)’
45. तू तुझ्या आईची मुलगी शोभतेस खरी! पतीची किंवा मुलांची तुला पर्वा नाही. तू अगदी तुझ्या बहिणीप्रमाणे आहेस. तुम्ही दोघीनी ही तुमच्या पतींचा व मुलांचा तिरस्कार केला. तू तुझ्या आईवडिलांसारखी आहेस. तुझी आई हित्ती तर वडील अमोरी होते.
46. तुझी मोठी बहीण शोमरोन होय. ती तुझ्या उत्तरेला तिच्या मुलींबरोबर (गावांसह) राहत होती. तुझी धाकटी बहीण सदोमही तुझ्या दक्षिणेला तिच्या मुलींसह (गावांसह) राहत होती.
47. त्यांनी केलेली भयंकर कृत्ये तू केलीसच पण त्यांच्यापेक्षाही वाईट कृत्ये केलीस.
48. मी परमेश्वर व प्रभू आहे. मी जिवंत आहे. माझ्या प्रतिज्ञेवर सांगतो की सदोम व तिच्या मुलींनी, तुझ्याइतकी व तुझ्या मुलींइतकी दुष्कृत्ये कधीच केली नाहीत.”
49. देव म्हणाला, “तुझी बहीण सदोम आणि तिच्या मुली गर्विष्ठ होत्या. त्यांना अन्नधान्याची विपुलता होती आणि त्यांच्याजवळ भरपूर वेळ होता. पण त्यांनी गरिबांना असहाय्य लोकांना मदत केली नाही.
50. सदोम व तिच्या मुली अती गर्विष्ट झाल्या, आणि त्यांनी माझ्या समोर भयानक गोष्टी करण्यास सुरवात केली. मी ते पाहताच त्यांना शिक्षा केली.”
51. देव म्हणाला, “शोमरोनने तुझ्याहून अर्धीसुद्धा दुष्कृत्ये केली नाहीत. तू तिच्यापेक्षा खूपच जास्त भयानक कृत्ये केलीस. तू तुझ्या बहिणीपेक्षा खूपच जास्त पाप केलेस. तुझ्या तुलनेत सदोम व शोमरोन बऱ्याच म्हणायच्या.
52. “तेव्हा आता तुला अपमान सहन केलाच पाहिजे. तुझ्या बहिणींना तुझ्या तुलनेत, तूच चांगले ठरविले आहेस. तू भयंकर गोष्टी केल्या आहेस, तेव्हा तुला लज्जित व्हावेच लागेल.”
53. देव म्हणाला, “मी सदोम आणि तिच्या भोवतीच्या गावांचा नाश केला. मी शोमरोनचा आणि त्याच्या भोवतालच्या गावांचाही नाश केला, आणि आता, यरुशलेम, मी तुझा नाश करीन. मी ती शहरे पुन्हा वसवीन. यरुशलेम, तुलासुध्दा मी पुन्हा वसवीन.
54. मी तुझे सांत्वन करीन. मग तू स्वत: केलेली दुष्कृत्ये आठवून लज्जित होशील.
55. तेव्हा तुझी आणि तुझ्या बहिणींची पुन्हा उभारणी होईल. सदोम व तिच्याभोवतालची गावे, शोमरोन व तिच्या आजुबाजूची गावे आणि तू व तुझ्या सभोवतीची गावेही पुन्हा वसविली जातील.”
56. देव म्हणाला, “पूर्वी तू गर्विष्ठ होतीस. तेव्हा तू आपल्या बहिणीची सदोमची, चेष्टा केलीस. पण आता तू पुन्हा तसे करणार नाहीस.
57. तुला शिक्षा होण्याआधी, तुझे शेजारी तुझी थट्टा करण्याआधी, तू अशी वागलीस. अरामच्या आणि पलिष्ट्यांच्या मुली आता तुझी चेष्टा करीत आहेत.
58. तू केलेल्या दुष्कृत्यांबद्दल तुला दु:ख भोगलेच पाहिजे.” परमेश्वर असे म्हणाला.
59. परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “तू मला जसे वागवलेस, तसेच मी तुला वागवीन. तू आपल्या लग्नाचे वचन मोडलेस. आपल्यातील कराराचा मान राखला नाहीस.
60. पण आपण केलेल्या कराराची मला आठवण असेल. मी तुझ्याबरोबर करार केला होता. आणि तो कायम चालू राहणार आहे.
61. मी तुझ्या बहिणींना तुझ्याकडे आणीन आणि त्यांना तुझ्या मुली करीन. हे आपल्या करारात नव्हते, पण मी हे तुझ्यासाठी करीन. मग तुला तुझ्या दुष्कृत्यांचे स्मरण होऊन लाज वाटेल.
62. मग मी तुझ्याबरोबर माझा करार करीन. मग तुला कळेल की मीच परमेश्वर आहे.
63. मी तुझ्याशी चांगले वागीन. मग तू माझे स्मरण ठेवशील आणि तू केलेल्या वाईट कृत्यांची तुला लाज वाटेल. तू जे काय केलेस, त्याबद्दल मी तुला क्षमा करीन. मग तुला पुन्हा लज्जित व्हावे लागणार नाही.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
Total 48 अध्याय, Selected धडा 16 / 48
1 मला मग परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, यरुशलेमच्या लोकांना त्यांनी केलेल्या भयंकर कृत्यांबद्दल सांग. 3 ‘परमेश्वर, माझा प्रभू, यरुशलेमला पुढील गोष्टी सांगतो, असे तू त्याना सांगितले पाहिजे. तुझ्या इतिहासावर नजर टाक. कनानमध्ये तुझा जन्म झाला. तुझे वडील अमोरी व आई हित्ती होती. 4 यरुशलेम, तू जन्मलीस तेव्हा तुझी नाळ कापायला कोणीही नव्हते. कोणीही मीठ टाकून तुला आंघोळ घातली नाही वा तुला दुपट्यात गुंडाळले नाही. 5 यरुशलेम, तू अगदी एकटी होतीस. कोणाला तुझ्यासाठी वाईट वाटले नाही वा कोणीही तुझी काळजी घेतली नाही. तू जन्मताच, तुझ्या आईवडिलानी तुला शेतात टाकून दिले. त्यावेळी तू रक्ताने माखलेली होतीस, तुझ्या अंगावर वारही तशीच होती. 6 “त्याच वेळी मी तुझ्याजवळून गेलो. मी तुला रक्तात लोळताना व हातपाय हालविताना पाहिले. तू रक्ताने माखली होतीस. पण मी तुला म्हणालो, “जिवंत राहा” खरेच, तू रक्ताने माखलेली असूनसुद्धा मी म्हणालो “जिवंत राहा.” 7 शेतातल्या रोप्याला जगवावे, तसे तुला जगवायला मी मदत केली. तू वाढत गेलीस आणि तरुणी झालीस. तू वयात आलीस, तुझ्यात तारुण्याची लक्षणे दिसू लागली. तुझे केसही वाढू लागले, पण तरीसुद्धा तू विवस्त्रच होतीस, उघडीच होतीस. 8 मी तुला पाखरले. तू प्रणयोत्सुक झाली होतीस. म्हणून माझे वस्त्र तुला लपेटूनमी तुझी नग्नता झाकली. मी तुला लग्नाचे वचन दिले. मी तुझ्याबरोबर करार केला आणि तू माझी झालीस.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला. 9 “मी तुला आंघोळ घातली. तुझ्या अंगावरचे रक्त धुवून काढले. तुझ्या अंगाला तेल चोळले. 10 मीतुला उत्तम वस्त्रे व मऊ चामड्याचे जोडे दिले. तुझ्या डोक्याला तागाचा पट्टा गुंडाळला व तुला रेशमी ओढणी पांघरली. 11 मग मी तुला काही दागिने दिले. तुझ्या हातात बांगड्या व गळ्यात हार घातला. 12 मी तुला नथ, कर्णभूषणे आणि सुंदर मुकुट देऊन सजविले. 13 तू तुझ्या सोन्या-चांदीच्या अलंकारात व ताग, रेशीम यांच्या कशिदा काढलेल्या वस्त्रांत फारच सुंदर दिसत होतीस. तू चांगल्यातले चांगले अन्न खाल्लेस. तुझे सौंदर्य अप्रतिम होते. तू राणी झालीस! 14 तुझ्या सौंदर्याने तुला प्रसिद्धी मिळाली. पण माझ्यामुळे तू सुंदर झालीस!” परमेश्वराने, माझ्या प्रभूने ह्या गोष्टी सांगितल्या. 15 देव म्हणाला, “पण तू आपल्या सौंदर्यावरच विश्वास ठेवायला सुरवात केलीस. तू तुझ्या चांगल्या नावाचा उपयोग करुन माझा विश्वासघात केलास. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाबरोबर तू वेश्येप्रमाणे वागलीस. त्या सर्वांच्या तू स्वाधीन झालीस. 16 तुझ्या सुंदर वस्त्रांचा उपयोग तू तुझी पूजास्थाने सजविण्यासाठी केलास. आणि तेथे तू वेश्येसारखे वर्तन केलेस. तुझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाच्या तू स्वाधीन झालीस. 17 मग मी तुला दिलेल्या सोन्या चांदीच्या अलंकाराचा उपयोग तू पुरुषांचे पुतळे बनविण्यासाठी केलास आणि त्या पुतळ्यांशीही व्यभिचार केलास. 18 सुंदर कापड आणून तू त्या मूर्तींना कपडे शिवलेस. मी तुला दिलेले अत्तर आणि धूप तू त्या मूर्तींपुढे ठेवलास. 19 मी तुला भाकरी, मध व तेल दिले. तेही तू त्या मूर्तींना दिलेस. तू खोट्या देवांनी प्रसन्न व्हावे म्हणून सुगांधित द्रव्ये म्हणून ह्या सर्व गोष्टी त्यांना अर्पण केल्यास. त्या खोट्या देवांबरोबर तू वेश्येप्रमाणे वागलीस.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला. 20 देव म्हणाला, “आपल्याला मुले झाली. पण तू आपली मुले घेतलीस व त्यांना ठार करुन खोट्या देवांना अर्पण केलेस. मला फसवून त्या खोट्या देवांकडे जाताना तू जी दुष्कृत्ये केलीस त्यातील ही फक्त काहीच होत. 21 “तू माझ्या मुलांचा वध केलास आणि अग्निद्वारा त्यांना त्या खोट्या देवापर्यंत पोहोचविलेस. 22 तू माझा त्याग केलास आणि अशी दुष्कृत्ये केलीस. तुला तुझ्या बालपणाचे विस्मरण झाले. मला तू सापडलीस तेव्हा तू नग्नावस्थेत रक्तात लोळत होतीस हे तुला आठवले नाही. 23 “ह्या सर्व दुष्कृत्यानंतर हे यरुशलेम, तुझे भले होणार नाही.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो. 24 “ह्या सर्व गोष्टीनंतर, तू त्या खोट्या देवांना पूजण्यासाठी मातीचा ढिगारा रचलास. प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर तू अशी पूजास्थाने बांधलीस. 25 प्रत्येक रस्त्याच्या सुरवातीला तू मातीचे ढिगारे रचलेस. तू तुझ्या सौंदर्याला कमीपणा आणलास, तुझ्या सौंदर्याचा उपयोग तू तुझ्या जवळून जाणाऱ्या प्रत्येकाला पकडण्यासाठी केलास. त्यांना तुझे पाय दिसावे म्हणून तू तुझी वस्त्रे वर उचललीस आणि त्यांच्याबरोबर वेश्येसारखी वागलीस. 26 मग मोठे लिंग असलेल्या शेजाऱ्याकडे, मिसरकडे तू गेलीस व मला संतापविण्यासाठी त्याच्याबरोबर अनेकदा व्यभिचार केलास. 27 म्हणून मी तुला शिक्षा केली. तुझ्या भत्तयातील काही भाग (जमीन) मी काढून घेतला. तुझ्या शत्रूंना म्हणजेच पलिष्ट्यांच्या मुलींना (शहरांना) त्यांना पाहिजे तसे तुझ्याशी वागू दिले. तुझी दुष्कृत्ये पाहून त्यांनासुध्दा धक्काबसला. 28 मग तू अश्शूरकडे व्यभिचार करण्यासाठी गेलीस. पण तुझे समाधान होऊ शकले नाही. तुझी कधीच तृप्ती झाली नाही. 29 म्हणून मग तू कनानकडे वळलीस व तेथून खास्द्यांकडे गेलीस. पण अजूनही तू तृप्त नाहीस. 30 तू खूपच दुर्बल आहेस. म्हणूनच सर्व पुरुषांनी (देशांनी) तुला पापे करायला लावले. तू निर्दयपणे हुकमत चालवणाऱ्या वेश्येप्रमाणे वागलीस.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला. 31 देव म्हणाला, “पण तू पूर्णपणे वेश्यावृत्ती पत्करली नाहीस. तू प्रत्येक रस्त्याच्या टोकाला मातीचे ढिगारे रचलेस व प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर पूजास्थाने बांधलीस. तू सर्व पुरुषांबरोबर व्यभिचार केलास.पण तू, वेश्येप्रमाणे, त्यांच्याजवळ मोबदला मागितला नाहीस. 32 “व्यभिचारिणी, तुला स्वत:च्या पतीऐवजी परक्यांबरोबर व्यभिचार करायला आवडतो. 33 बहुतेक वेश्या पुरुषांना पैसे देण्यास भाग पाडतात. पण तूच सर्व प्रियकरांना पैसे दिलेस. तू व्यभिचारासाठी तुझ्याकडे बोलविलेल्या सर्व पुरुषांना पैसे दिलेस. 34 तू बहुतेक वेश्यांच्या अगदी उलट वागलीस. त्या पुरुषांकडून सक्तीने पैसे घेतात, तर तू तुझ्याबरोबर व्यभिचार करण्यासाठी उलट पुरुषांनाच पैसे देतेस.” 35 वारांगने, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐक. 36 परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो, “तू पैसा खर्च केलास आणि तुझ्या प्रियकरांना आणि घाणेरड्या देवांना तुझे नग्न शरीर पाहू दिलेस, तुझ्याबरोबर व्याभिचार करु दिलास. तुझ्या मुलाना ठार मारुन त्यांचे रक्त खोट्या देवांना भेट म्हणून दिलेस. 37 म्हणून मी तू ज्यांच्यावर प्रेम केलेस, त्या तुझ्या सर्व प्रियकरांना आणि ज्यांचा तू तिरस्कार करतेस त्यांना, एकत्र आणीन आणि तुझे नग्न शरीर पाहू देईन.तुझे संपूर्ण नग्न शरीर ते पाहतील. 38 मग मी तुला शिक्षा करीन. खुनी व व्यभिचाराचे पाप केलेल्या स्त्रीप्रमाणे मी तुला शिक्षा करीन. क्रोधाविष्ट व मत्सरी पतीकडून व्हावी, तशी शिक्षा तुला होईल. 39 मी त्या तुझ्या प्रियकरांच्या हाती तुला देईन. ते तुझे मातीचे ढिगारे उद्ध्वस्त करतील. तुझी पूजास्थाने जाळतील. तुझी वस्त्रे फाडतील आणि तुझे सुंदर अलंकार घेतील. मला तू ज्या अवस्थेत सापडलीस, त्याच अवस्थेत (उघडी व नग्न) तुला ते सोडतील. 40 तुला ठार करण्यासाठी लोकांना जमवून ते तुझ्यावर दगड फेकतील. मग तलवारीने तुझे तुकडे तुकडे करतील. 41 ते तुझे घर (मंदिर) जाळतील. इतर स्त्रियांना कळावे म्हणून ते तुला शिक्षा करतील. मी तुला वेश्येप्रमाणे वागू देणार नाही. तुझ्या प्रियकरांना पैसे देऊ देणार नाही. 42 मग माझा राग व मत्सर निवळेल मी शांत होईन. पुन्हा कधीही रागावणार नाही. 43 हे सर्व का घडलं? कारण बालपणी काय घडले ह्याचे तुला विस्मरण झाले. तू वाईट गोष्टीबद्दल मला तुला शिक्षा करावी लागली. पण तू त्याहून भयंकर गोष्टी करण्याचा बेत केलास.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला. 44 “तुझ्याबद्दल बोलणाऱ्या सर्व लोकांना आता आणखी एक गोष्ट सांगायला मिळेल. ‘ती म्हणजे, खाण तशी माती (जशी आई, तशी लेक)’ 45 तू तुझ्या आईची मुलगी शोभतेस खरी! पतीची किंवा मुलांची तुला पर्वा नाही. तू अगदी तुझ्या बहिणीप्रमाणे आहेस. तुम्ही दोघीनी ही तुमच्या पतींचा व मुलांचा तिरस्कार केला. तू तुझ्या आईवडिलांसारखी आहेस. तुझी आई हित्ती तर वडील अमोरी होते. 46 तुझी मोठी बहीण शोमरोन होय. ती तुझ्या उत्तरेला तिच्या मुलींबरोबर (गावांसह) राहत होती. तुझी धाकटी बहीण सदोमही तुझ्या दक्षिणेला तिच्या मुलींसह (गावांसह) राहत होती. 47 त्यांनी केलेली भयंकर कृत्ये तू केलीसच पण त्यांच्यापेक्षाही वाईट कृत्ये केलीस. 48 मी परमेश्वर व प्रभू आहे. मी जिवंत आहे. माझ्या प्रतिज्ञेवर सांगतो की सदोम व तिच्या मुलींनी, तुझ्याइतकी व तुझ्या मुलींइतकी दुष्कृत्ये कधीच केली नाहीत.” 49 देव म्हणाला, “तुझी बहीण सदोम आणि तिच्या मुली गर्विष्ठ होत्या. त्यांना अन्नधान्याची विपुलता होती आणि त्यांच्याजवळ भरपूर वेळ होता. पण त्यांनी गरिबांना असहाय्य लोकांना मदत केली नाही. 50 सदोम व तिच्या मुली अती गर्विष्ट झाल्या, आणि त्यांनी माझ्या समोर भयानक गोष्टी करण्यास सुरवात केली. मी ते पाहताच त्यांना शिक्षा केली.” 51 देव म्हणाला, “शोमरोनने तुझ्याहून अर्धीसुद्धा दुष्कृत्ये केली नाहीत. तू तिच्यापेक्षा खूपच जास्त भयानक कृत्ये केलीस. तू तुझ्या बहिणीपेक्षा खूपच जास्त पाप केलेस. तुझ्या तुलनेत सदोम व शोमरोन बऱ्याच म्हणायच्या. 52 “तेव्हा आता तुला अपमान सहन केलाच पाहिजे. तुझ्या बहिणींना तुझ्या तुलनेत, तूच चांगले ठरविले आहेस. तू भयंकर गोष्टी केल्या आहेस, तेव्हा तुला लज्जित व्हावेच लागेल.” 53 देव म्हणाला, “मी सदोम आणि तिच्या भोवतीच्या गावांचा नाश केला. मी शोमरोनचा आणि त्याच्या भोवतालच्या गावांचाही नाश केला, आणि आता, यरुशलेम, मी तुझा नाश करीन. मी ती शहरे पुन्हा वसवीन. यरुशलेम, तुलासुध्दा मी पुन्हा वसवीन. 54 मी तुझे सांत्वन करीन. मग तू स्वत: केलेली दुष्कृत्ये आठवून लज्जित होशील. 55 तेव्हा तुझी आणि तुझ्या बहिणींची पुन्हा उभारणी होईल. सदोम व तिच्याभोवतालची गावे, शोमरोन व तिच्या आजुबाजूची गावे आणि तू व तुझ्या सभोवतीची गावेही पुन्हा वसविली जातील.” 56 देव म्हणाला, “पूर्वी तू गर्विष्ठ होतीस. तेव्हा तू आपल्या बहिणीची सदोमची, चेष्टा केलीस. पण आता तू पुन्हा तसे करणार नाहीस. 57 तुला शिक्षा होण्याआधी, तुझे शेजारी तुझी थट्टा करण्याआधी, तू अशी वागलीस. अरामच्या आणि पलिष्ट्यांच्या मुली आता तुझी चेष्टा करीत आहेत. 58 तू केलेल्या दुष्कृत्यांबद्दल तुला दु:ख भोगलेच पाहिजे.” परमेश्वर असे म्हणाला. 59 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “तू मला जसे वागवलेस, तसेच मी तुला वागवीन. तू आपल्या लग्नाचे वचन मोडलेस. आपल्यातील कराराचा मान राखला नाहीस. 60 पण आपण केलेल्या कराराची मला आठवण असेल. मी तुझ्याबरोबर करार केला होता. आणि तो कायम चालू राहणार आहे. 61 मी तुझ्या बहिणींना तुझ्याकडे आणीन आणि त्यांना तुझ्या मुली करीन. हे आपल्या करारात नव्हते, पण मी हे तुझ्यासाठी करीन. मग तुला तुझ्या दुष्कृत्यांचे स्मरण होऊन लाज वाटेल. 62 मग मी तुझ्याबरोबर माझा करार करीन. मग तुला कळेल की मीच परमेश्वर आहे. 63 मी तुझ्याशी चांगले वागीन. मग तू माझे स्मरण ठेवशील आणि तू केलेल्या वाईट कृत्यांची तुला लाज वाटेल. तू जे काय केलेस, त्याबद्दल मी तुला क्षमा करीन. मग तुला पुन्हा लज्जित व्हावे लागणार नाही.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
Total 48 अध्याय, Selected धडा 16 / 48
×

Alert

×

Marathi Letters Keypad References