मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
यहेज्केल
1. परागंदा काळाच्या अकराच्या वर्षीच्या तिसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी परमेश्वराचा संदेश मला मिळाला. तो म्हणाला,
2. “मानवपुत्रा, मिसरचा राजा फारो आणि त्याचे लोक यांना पुढील गोष्टी सांग:“मोठेपणात तुम्ही कोणासारखे आहात?
3. अश्शूर सुंदर फांद्या असलेल्या व गर्द छाया असलेल्या लबानोनमधील उंच गंधसरुसारखा होता. त्याचा शेंडा ढगांना भिडला होता.
4. पाण्यामुळे वृक्ष वाढला. नदीमुळे तो उंच झाला. वृक्षाभोवती नद्या वाहत होत्या. त्याच्यापासून निघणारे फक्त लहान पाटच मळ्यातील इतर झाडांपर्यंत जात.
5. म्हणून तो वृक्ष मळ्यातील इतर झाडांपेक्षा उंच होता. त्यांला खूप फांद्या फुटल्या. त्याला भरपूर पाणी मिळाल्याने, त्याच्या फांद्या विस्तारल्या.
6. सर्व पक्ष्यांनी त्या वृक्ष्याच्या फांद्यांमध्ये आपली घरटी बांधली. त्याच्या छायेत सर्व प्राण्यांची वीण होई. त्याच्या सावलीला सर्व मोठी राष्ट्रे राहात.
7. वृक्ष फारच सुंदर होता. त्याच्या मुळांना भरपूर पाणी मिळाल्याने त्याचा विस्तार मोठा झाला, त्याच्या फांद्या लांब झाल्या.
8. देवाच्या बागेतील, गंधसुरुंनासुध्दा एवढ्या फांद्या नव्हत्या देवदारुलाही एवढ्या फांद्या नव्हत्या, अर्मोन झाडांनाही अशा फांद्या नव्हत्या. देवाच्या बागेतील कोठलाच वृक्ष, ह्या वृक्षा इतका, सुंदर नव्हता.
9. मी त्याला खूप फांद्या देऊन सुंदर बनविले. मग एदेनमधील म्हणजेच देवाच्या बागेतील वृक्ष त्याचा द्वेष करु लागले.”
10. मग परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “वृक्ष उंच वाढला आहे. त्याचा शेडा ढगाला भिडला आहे. वृक्षाला आपल्या उंचीचा अभिमान आहे.
11. म्हणून मी त्यास एका बलिष्ट राजाच्या स्वाधीन करीन. तो त्या वृक्षाने केलेल्या दुष्कृत्यांबद्दल त्याला शिक्षा करील. मी त्या वृक्षाला त्याच्या दुष्टाव्याबद्दल माझ्या बागेतून काढून टाकीन.
12. राष्ट्रांतील अत्यंत भयंकर परक्यांनी त्याला तोडून फेकले. वृक्षाच्या फांद्या डोंगरदऱ्यात पडल्या त्या फांद्या त्या देशातून वाहणाऱ्या नद्यांतून वाहत गेल्या. त्या वृक्षाची सावली राहिली नसल्याने, पृथ्वीवरचे सगळे लोक दूर निघून गेले.
13. आता त्या तोडून टाकलेल्या झाडावर पक्ष्यांची वस्ती आहे आणि हिंस्र श्वापदे त्याच्या तोडून टाकलेल्या फांद्यामधून संचार करत आहेत.
14. “आता, पाण्याजवळचे कोठलेही झाड गर्व करणार नाही. कोणीही ढगापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार नाही. ते पाणी पिणारे मोठे वृक्ष आपल्या उंचीची प्रौढी मिरविणार नाहीत. का? कारण प्रत्येकाला मरण अटळ आहे. त्यांना जमिनीखाली, शेओलमध्ये मृत्यूलोकांत जावे लागणार. इतर मृतांमध्ये, खोल विवरात त्यांना जावे लागणार.”
15. परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो “ज्या दिवशी तो वृक्षा शेओलमध्ये मृत्युलोकांत गेला, त्या दिवशी मी लोकांना शोक करायला लावला. मी खोल पाण्याने त्या वृक्षाला झाकले.वृक्षाच्या नद्यांचा प्रवाह मी अडविला. त्यामुळे झाडांकडे वाहणारे पाणी वाहण्याचे थांबले. मी त्याच्यासाठी लबानोनला शोक करायला भाग पाडले. त्या मोठ्या वृक्षाबद्दलच्या दु:खाने मळ्यातील झाडे म्लान झाली.
16. मी वृक्ष पाडला. त्याच्या आवाजाने राष्ट्र हादरली, घाबरली. मी वृक्षाला मृत्यूलोकांत जायला भाग पाडले. तो वृक्ष इतर लोकांबरोबर खोल विवरात जाऊन पडला. पूर्वी, एदेनमधल्या सर्व वृक्षांनी आणि लबानोनमधील उत्तम झाडांनी तेच पाणी प्यायले होते. धरणीखाली गेलेले ते वृक्ष मग समाधान पावले.
17. हो! ते वृक्षही मोठ्या वृक्षाबरोबर खाली गेले. ते लढाईत मारल्या गेलेल्या लोकांमध्ये जाऊन मिसळले. त्या मोठ्या वृक्षाने इतरांना बलवान केले होते. राष्ट्रांमध्ये ती झाडे ह्या मोठ्या वृक्षाच्या सावलीला राहिली.
18. “तेव्हा हे मिसर देशा, एदेनमधल्या कोणत्या मोठ्या, बलवान वृक्षाशी मी तुझी तुलना करावी? तू, मृत्युलोकांत, त्या परदेशीयांबरोबर आणि लढाईत मारल्या गेलेल्या लोकांबरोबर, जाऊन पडशील, फारो आणि त्याची माणसे ह्यांच्याबाबतीत तसेच घडेल.” देव, माझा प्रभू, असे म्हणाला.

Notes

No Verse Added

Total 48 अध्याय, Selected धडा 31 / 48
यहेज्केल 31:40
1 परागंदा काळाच्या अकराच्या वर्षीच्या तिसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी परमेश्वराचा संदेश मला मिळाला. तो म्हणाला, 2 “मानवपुत्रा, मिसरचा राजा फारो आणि त्याचे लोक यांना पुढील गोष्टी सांग:“मोठेपणात तुम्ही कोणासारखे आहात? 3 अश्शूर सुंदर फांद्या असलेल्या व गर्द छाया असलेल्या लबानोनमधील उंच गंधसरुसारखा होता. त्याचा शेंडा ढगांना भिडला होता. 4 पाण्यामुळे वृक्ष वाढला. नदीमुळे तो उंच झाला. वृक्षाभोवती नद्या वाहत होत्या. त्याच्यापासून निघणारे फक्त लहान पाटच मळ्यातील इतर झाडांपर्यंत जात. 5 म्हणून तो वृक्ष मळ्यातील इतर झाडांपेक्षा उंच होता. त्यांला खूप फांद्या फुटल्या. त्याला भरपूर पाणी मिळाल्याने, त्याच्या फांद्या विस्तारल्या. 6 सर्व पक्ष्यांनी त्या वृक्ष्याच्या फांद्यांमध्ये आपली घरटी बांधली. त्याच्या छायेत सर्व प्राण्यांची वीण होई. त्याच्या सावलीला सर्व मोठी राष्ट्रे राहात. 7 वृक्ष फारच सुंदर होता. त्याच्या मुळांना भरपूर पाणी मिळाल्याने त्याचा विस्तार मोठा झाला, त्याच्या फांद्या लांब झाल्या. 8 देवाच्या बागेतील, गंधसुरुंनासुध्दा एवढ्या फांद्या नव्हत्या देवदारुलाही एवढ्या फांद्या नव्हत्या, अर्मोन झाडांनाही अशा फांद्या नव्हत्या. देवाच्या बागेतील कोठलाच वृक्ष, ह्या वृक्षा इतका, सुंदर नव्हता. 9 मी त्याला खूप फांद्या देऊन सुंदर बनविले. मग एदेनमधील म्हणजेच देवाच्या बागेतील वृक्ष त्याचा द्वेष करु लागले.” 10 मग परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “वृक्ष उंच वाढला आहे. त्याचा शेडा ढगाला भिडला आहे. वृक्षाला आपल्या उंचीचा अभिमान आहे. 11 म्हणून मी त्यास एका बलिष्ट राजाच्या स्वाधीन करीन. तो त्या वृक्षाने केलेल्या दुष्कृत्यांबद्दल त्याला शिक्षा करील. मी त्या वृक्षाला त्याच्या दुष्टाव्याबद्दल माझ्या बागेतून काढून टाकीन. 12 राष्ट्रांतील अत्यंत भयंकर परक्यांनी त्याला तोडून फेकले. वृक्षाच्या फांद्या डोंगरदऱ्यात पडल्या त्या फांद्या त्या देशातून वाहणाऱ्या नद्यांतून वाहत गेल्या. त्या वृक्षाची सावली राहिली नसल्याने, पृथ्वीवरचे सगळे लोक दूर निघून गेले. 13 आता त्या तोडून टाकलेल्या झाडावर पक्ष्यांची वस्ती आहे आणि हिंस्र श्वापदे त्याच्या तोडून टाकलेल्या फांद्यामधून संचार करत आहेत. 14 “आता, पाण्याजवळचे कोठलेही झाड गर्व करणार नाही. कोणीही ढगापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार नाही. ते पाणी पिणारे मोठे वृक्ष आपल्या उंचीची प्रौढी मिरविणार नाहीत. का? कारण प्रत्येकाला मरण अटळ आहे. त्यांना जमिनीखाली, शेओलमध्ये मृत्यूलोकांत जावे लागणार. इतर मृतांमध्ये, खोल विवरात त्यांना जावे लागणार.” 15 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो “ज्या दिवशी तो वृक्षा शेओलमध्ये मृत्युलोकांत गेला, त्या दिवशी मी लोकांना शोक करायला लावला. मी खोल पाण्याने त्या वृक्षाला झाकले.वृक्षाच्या नद्यांचा प्रवाह मी अडविला. त्यामुळे झाडांकडे वाहणारे पाणी वाहण्याचे थांबले. मी त्याच्यासाठी लबानोनला शोक करायला भाग पाडले. त्या मोठ्या वृक्षाबद्दलच्या दु:खाने मळ्यातील झाडे म्लान झाली. 16 मी वृक्ष पाडला. त्याच्या आवाजाने राष्ट्र हादरली, घाबरली. मी वृक्षाला मृत्यूलोकांत जायला भाग पाडले. तो वृक्ष इतर लोकांबरोबर खोल विवरात जाऊन पडला. पूर्वी, एदेनमधल्या सर्व वृक्षांनी आणि लबानोनमधील उत्तम झाडांनी तेच पाणी प्यायले होते. धरणीखाली गेलेले ते वृक्ष मग समाधान पावले. 17 हो! ते वृक्षही मोठ्या वृक्षाबरोबर खाली गेले. ते लढाईत मारल्या गेलेल्या लोकांमध्ये जाऊन मिसळले. त्या मोठ्या वृक्षाने इतरांना बलवान केले होते. राष्ट्रांमध्ये ती झाडे ह्या मोठ्या वृक्षाच्या सावलीला राहिली. 18 “तेव्हा हे मिसर देशा, एदेनमधल्या कोणत्या मोठ्या, बलवान वृक्षाशी मी तुझी तुलना करावी? तू, मृत्युलोकांत, त्या परदेशीयांबरोबर आणि लढाईत मारल्या गेलेल्या लोकांबरोबर, जाऊन पडशील, फारो आणि त्याची माणसे ह्यांच्याबाबतीत तसेच घडेल.” देव, माझा प्रभू, असे म्हणाला.
Total 48 अध्याय, Selected धडा 31 / 48
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References