4. 4 परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या आज्ञा दिल्यास आणि त्या आज्ञा पूर्णपणे पाळायला तू आम्हाला सांगितलेस.
|
18. 18 परमेश्वरा, माझे डोळे उघड मला तुझ्या शिकवणीकडे बघू दे आणि तू केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल वाचू दे.
|
21. 21 परमेश्वरा, तू गर्विष्ठ लोकांवर सदैव टीका करतोस. त्यांचे वाईट होईल ते तुझ्या आज्ञा पाळायचे नाकारतात.
|
23. 23 नेते सुध्दा माझ्या विषयी वाईट बोलतात. पण परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे आणि मी तुझ्या नियमांचा अभ्यास करतो.
|
27. 27 परमेश्वरा, तुझे नियम समजून घेण्यासाठी मला मदत कर. तू ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेस त्या मला अभ्यासू दे.
|
30. 30 परमेश्वरा, मी तुझ्याशी इमानदार राहायचे ठरवले. मी अगदी काळजीपूर्वक तू शहाणपणाने घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास करतो.
|
35. 35 परमेश्वरा, मला तुझ्या आज्ञांच्या मार्गाकडे घेऊन जा. मला जीवन जगायचा तो मार्ग अगदी मनापासून आवडतो.
|
37. 37 परमेश्वरा, कवडी मोलाच्या गोष्टीं कडे मला बघू देऊ नकोस. मला तुझ्या मार्गाने जीवन जगायला मदत कर.
|
42. 42 त्यावेळी ज्या लोकांनी माझा पाणउतारा केला होता त्यांना द्यायला माझ्याजवळ उत्तर असेल. परमेवरा, तू सांगतोस त्या गोष्टींवर माझा खरोखरच विश्वास आहे.
|
43. 43 मला नेहमी तुझ्या खऱ्या शिकवणी बद्दल बोलू दे. परमेश्वरा, मी तुझ्या शहाणपणाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
|
51. 51 तला माझ्यापेक्षा चांगले समजाता त्यांनी माझा सतत अपमान केला. पण मी तुझ्या शिकवणी नुसार वागणे सोडले नाही.
|
52. 52 मी नेहमी तुझ्या राहाणपणाच्या निर्णयांची आठवण ठेवतो. परमेश्वरा, तुझे निर्णय मला समाधान देतात, माझे सांत्वन करतात.
|
63. 63 जो कुणी तुझी उपासना करतो त्याचा मी मित्र आहे. जो कुणी तुझ्या आज्ञा पाळतो त्याचा मी मित्र आहे.
|
65. 65 परमेश्वरा, तू माझ्यासाठी, तुझ्या सेवकासाठी चांगल्या गोष्टी केल्यास. तू ज्या गोष्टी करण्याचे वचन दिले होतेस त्याच गोष्टी केल्यास.
|
67. 67 ख सोसण्यापूर्वी मी बऱ्याच चुकीच्या गोष्टी केल्या परंतु आता मी तुझ्या आज्ञा काळजी पूर्वक पाळतो.
|
69. 69 तला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझ्याबद्दल खोट सांगितलं पण परमेश्वरा, मी तरी ही अगदी मनापासून तुझ्या आज्ञा पाळणे चालूच ठेवले.
|
72. 72 परमेश्वरा, तूझी शिकवण माझ्यासाठी फार चांगली आहे. ती सोन्याच्या व चांदीच्या हजार तुकड्यांपेक्षा चांगली आहे.
|
73. 73 परमेश्वरा, तूच मला निर्माण केलेस आणि तू मला तुझ्या हाताचा आधार देतोस. तुझ्या आज्ञा शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मला मदत कर.
|
74. 74 परमेश्वरा, तुझे भक्त मला पाहातात आणि मला मान देतात. तू जे सांगतोस त्यावर मी विश्वास ठेवतो म्हणून ते आनंदी आहेत.
|
75. 75 परमेश्वरा, तुझे निर्णय योग्य असतात हे मला माहीत आहे आणि तू मला शिक्षा केलीस तेही योग्यच होते.
|
78. 78 तला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझ्याविषयी खोटं सांगितलं त्या लोकांना आता लाज वाटेल अशीमी आशा करतो. परमेश्वरा, मी तुझ्या कराराचा अभ्यास करतो.
|
81. 81 परमेश्वरा, तू माझा उध्दार करशील म्हणून वाट बघता बघता मी आता मरुन जाणार आहे. पण परमेश्वरा, तू जे सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.
|
82. 82 तू ज्या गोष्टींचे वचन दिले होतेस त्या शोधता शोधता माझे डोळे अगदी थकून गेले आहेत. परमेश्वरा, तू कधी माझे सांत्वन करणार आहेस?
|
84. 84 मी किती काळ जगणार आहे? परमेश्वरा, जे लोक मला तुरुंगात माझा छळ करतात. त्यांना तू कधी शिक्षा करणार आहेस?
|
85. 85 काही गार्विष्ठ लोकांनी खोटे बोलून माझ्या शरीरात सुरा खुपसला आणि ते तुझ्या शिकवणी विरुध्द आहे.
|
86. 86 परमेश्वरा, लोक तुझ्या सगळ्या आज्ञांवर विश्वास ठेवू शकतात. माझ्यावर खटला भरण्याची चूक त्यांनी केली. मला मदत कर.
|
94. 94 परमेश्वरा, मी तुझा आहे म्हणून माझा उध्दार कर. का? कारण तुझ्या आज्ञा पाळण्याची मी शिकस्त करतो.
|
98. 98 परमेश्वरा, तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा शहाणे करतात. तुझे नियम नेहमी माझ्याजवळ असतात.
|
101. 101 तू मला प्रत्येक पावलाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून दूर ठेवतोस म्हणून परमेश्वरा, मी तू जे सांगशील ते करु शकतो.
|
113. 113 परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते.
|
116. 116 परमेश्वरा, कबूल केल्याप्रमाणे तू मला आधार दे आणि मग मी जगेन. माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून माझी निराशा करु नकोस.
|
118. 118 परमेश्वरा, तुझे नियम मोडणाऱ्या पत्येकाला तू परत पाठव. का? कारण जेव्हा त्यांनी तुझ्यासांगण्या प्रमाणे वागायचे कबूल केले तेव्हा ते खोटे बोलले.
|
119. 119 परमेश्वरा, तू वाईट लोकांना पृथ्वीवर कचऱ्याप्रमाणे फेकून दे. म्हणजे मग मी तुझ्या करारावर सदैव प्रेम करीन.
|
121. 121 जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच मी केले परमेश्वरा, ज्या लोकांना मला त्रास द्यायची इच्छा आहे त्याच्या हाती मला सोडून देऊ नको.
|
122. 122 माझ्याशी चांगला वागशील असे मला वचन दे. परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे. त्या गर्विष्ठ लोकांना मला त्रास द्यायला लावू नकोस.
|
130. 130 जेव्हा लोक तुझा शब्द समजून घ्याला सुरुवात करतात तेव्हा ते त्यांना योग्य तऱ्हेने जीवन कसे जगायचे ते सांगणाऱ्या प्रकाशासारखे असते. तुझे शब्द अगदी साध्या लोकांना देखील शहाणे करतात.
|
131. 131 परमेश्वरा, मला खरोखरच तुझ्या आज्ञांचा अभ्यास करायचा आहे. मी जोर जोरात श्वासोच्छवास करणाऱ्या आणि अधीरतेने वाट बघणाऱ्या माणसासाखा आहे.
|
132. 132 देवा, माझ्याकडे बघ आणि माझ्याशी दयाळूपणे वाग. जे लोक तुझ्या नावावर प्रेम करतात त्यांच्यांसाठी योग्य गोष्टी कर.
|
139. 139 माझ्या तीव्र भावना माझा नाश करीत आहेत. माझे शत्रू तुझ्या आज्ञा विसरले म्हणून मी फारच अस्वस्थ झालो आहे.
|
140. 140 परमेश्वरा, आम्ही तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवू शकतो याबद्दलचा पुरावा आमच्याजवळ आहे आणि मला ते आवडते.
|
147. 147 तुझी प्रार्थना करण्यासाठी मी सकाळी लवकर उठतो. तू ज्या गोष्टी सांगतोस त्यावर मी विश्वास ठेवतो.
|
149. 149 तुझ्या सगळ्या प्रेमासकट माझ्याकडे लक्ष दे परमेश्वरा, ज्या गोष्टी योग्य आहेत असे तू सांगतोस त्या कर आणि मला जगू दे.
|
156. 156 परमेश्वरा, तू खूप दयाळू आहेस. तू ज्या गोष्टी योग्य आहेत असे सांगतोस त्या कर आणि मला जगू दे.
|
158. 158 मी त्या विश्वासघातक्यांना बघतो. परमेश्वरा, ते तुझा शब्द पाळत नाहीत आणि मी त्यांचा तिरस्कार करतो.
|
159. 159 बघ, मी तुझ्या आज्ञा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. परमेश्वरा, तुझ्या सगळ्या प्रेमासकट मला जगू दे.
|
160. 160 परमेश्वरा, अगदी सुरुवाती पासून तुझे सर्व शब्द विश्वसनीय होते आणि तुझे चांगले नियम सदैव राहातील.
|
161. 161 शक्तिमान पुढाऱ्यांनी माझ्यावर विनाकारण हल्ला केला. पण मी फक्त तुझ्या नियमांना भितो आणि मान देतो.
|
162. 162 परमेश्वरा, तुझा शब्द मला आनंदी करतो, नुकताच एखादा खजिना सापडलेल्या माणसासारखा मी आनंदित होतो.
|
165. 165 जे लोक तुझ्या शिकवणुकीवर प्रेम करतात त्यांना खरी शांती लाभेल. कुठलीही गोष्ट त्यांचा अधपात घडवणार नाही.
|
172. 172 तुझ्या शब्दाला उत्तर देण्यासाठी मला मदत कर आणि मला माझे गाणे म्हणून दे. परमेश्वरा, तुझे नियम चांगले आहेत.
|
173. 173 परमेश्वरा, मला मदत करण्यासाठी माझ्यापर्यंत पोहोच कारण मी तुझ्या आज्ञांप्रमाणे वागणे पसंत केले.
|
176. 176 मी हरवलेल्या मेंढीप्रमाणे रस्ता चुकलो. परमेश्वरा, मला शोधाला ये. मी तुझा सेवक आहे आणि मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही.
|