मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
दानीएल
1. कोरेश पारसचा राजा होता कोरेश राजाच्या कारकिर्दोच्या तिसऱ्या वर्षो, दानीएलला पुढील गोष्टीविषयी कळले. (दानीएलचे दुसरे नाव बेल्टशस्सर असे होते.) ह्या गोष्टी सत्य होत्या परंत समजण्यास कठीण होत्या.पण दानीएलला त्या समजल्या. दृष्टान्तामध्ये त्याला त्या समजावून सांगितल्या गेल्या.
2. दानीएल म्हणतो,”त्या वेळी मी, दानीएल, तीन आठवडे, खूप दुःखी होतो.
3. त्या तीन आठवड्यांमध्ये मी आवडते जेवण केले नाही मांस अजिबात खाल्ले नाही, मी मद्य प्यायलो नाही, स्वत:ला तेल लावले नाही तीन आठवडे मी असे केले.
4. वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या 24 व्या दिवशी मी हिद्देकेल नदीकाठी उभा असताना.
5. मी वर पाहिले, तर माझ्यासमोर एक माणूस उभा होता. त्याने तागाचे कपडे घातले होते उफाजमधील सोन्याचा कमरपट्टा त्याने बांधला होता.
6. त्याचा देह चकचकीत दगडासारखा होता. त्याचा चेहरा विद्युतलतेप्रमाणे चमकत होता त्याचे हात व पाय चमक दिलेल्या पितळाप्रमाणे होते. त्याचा आवाज लोकांच्या कोलहलाप्रमाणे मोठा होता.
7. “दुष्टान्त पाहणारा मी, दानीएल, एकटाच होतो माझ्याबरोबरच्या लोकांना दृष्टान्त दिसला नाही. पण तरीही ते घाबरले. ते इतके घाबरल, की दूर पळून जाऊन लपून बसले.
8. मग मी एकटाच उरलो .मी दृष्टान्त पाहात होतो. त्या दृष्टान्ताने मी सुध्दा घाबरलो. माझा धीर खचला. मृत माणसाच्या चेहऱ्याप्रमाणे माझा चेहरा पांढराफटक पडला, मी असहाय झालो.
9. मग मी दृष्टान्तातील त्या माणसाला बोलताना ऐकले त्याचा आवाज ऐकताना, मला गाढ झोप लागली मी जमिनीवर पालथा पडलो होतो.
10. मग मला एका हाताचा स्पर्श जाणवला. तो स्पर्श होताच मी हात गुडघे ह्यावर भार टाकून ओणवा झालो मी इतका घाबरलो होतो की थरथर कापत होतो.
11. दृष्टान्तातील माणस मला म्हणाला ‘दानीएला, देव तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्याशी बोलेन त्यावर काळजीपूर्वक विचार कर. उभा राहा मला तुझ्याकडेच पाठविले आहे. तो असे म्हणताच मी उभा राहिलो भीतीमुळे अजूनही मी थरथर कापत होतो.
12. मग दृष्टान्तातील माणस पुन्हा बोलू लागला तो म्हणाला, ‘दानीएला, घाबरू नकोस ज्या दिवसापासून तू ज्ञान मिळविण्याचे व देवापुढे नम्र होण्याचे ठरविलेस, त्या दिवसापासून तो तुझी प्रार्थना ऐकत आहे. तू प्रार्थना करीत असल्यामुळेच मी तुझ्याकडे आलो.
13. पण पारसचा राजपुत्र (देवदूत) 21 दिवस माझ्याशी लढत होता व मला त्रास देत होता. पण महत्वाच्या राजपुत्रांपैकी (देवदूतांपैकी) एक मिखाएल माझ्या मदतीला आला. कारण मी तेथे अडकुन पडलो होतो
14. भविष्यात तुझ्या लोकांच्या बाबतीत काय घडणार आहे, हे तुला समजावून सांगायला मी येथे आलो आहे. दानीएला, हा दृष्टान्त भविष्यकाळासंबंधी आहे.’
15. तो माणूस माझ्याशी बोलत असताना, मी खाली वाकून जमिनीवर डोके टेकविले. मी बोलू शकत नव्हतो.
16. मग माणसाप्रमाणे दिसणाऱ्या एकाने माझ्या ओठांना स्पर्श केला मग मी तोंड उघडले व बोलू लागलो. माझ्यासमोर उभ्या असणाऱ्याला मी म्हणालो,”महाराज दृष्टान्तात मी जे काही पाहिले, त्याने मी अस्वस्थ झालो आहे आणि घाबरलो आहे मी असहाय आहे.
17. “महाराज, मी दानीएल तुमचा सेवक.मी तुमच्याशी कसा बोलू शकेन? माझा धीर खचला आहे व वास घेणेही मला कठीण आहे.”
18. माणसाप्रमाणे दिसणाऱ्याने मला पुन्हा स्पर्श केला त्या स्पर्शाने मला शक्ती आली.
19. मग तो म्हणाला, ‘दानीएला घाबरू नकोस, देवाचे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुला शांती लाभो! धीर धर! धीर धर!’ “त्याच्या बोलण्याने मला धीर आला मग मी म्हणालो, महाराज तुम्ही मला धीर दिलात आता तुम्ही बोलू शकता. 2
20. मग तो म्हणाला, “दानीएला, मी तुझ्याकडे का आलो, तुला माहीत आहे का? लवकरच पारसच्या राजपुत्राशी (देवदूताशी) लढायला मला परत गेले पाहिजे. मी जाईल तेव्हा ग्रीसचा राजपुत्र (देवदूत) येईल.
21. पण दानीएल, जाण्याआधी. प्रथम सत्याच्या ग्रंथात काय लिहिले आहे ते मी तुला सांगितले पाहिजे, त्या दुष्ट देवदूतांच्या विरोधात माझ्या बाजूने मीखाएलशिवाय कोणीही उभा राहणार नाही. मीखाएल तुझ्या लोकांवर राज्य करणारा राजपुत्र (देवदूत) आहे.
Total 12 अध्याय, Selected धडा 10 / 12
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
1 कोरेश पारसचा राजा होता कोरेश राजाच्या कारकिर्दोच्या तिसऱ्या वर्षो, दानीएलला पुढील गोष्टीविषयी कळले. (दानीएलचे दुसरे नाव बेल्टशस्सर असे होते.) ह्या गोष्टी सत्य होत्या परंत समजण्यास कठीण होत्या.पण दानीएलला त्या समजल्या. दृष्टान्तामध्ये त्याला त्या समजावून सांगितल्या गेल्या. 2 दानीएल म्हणतो,”त्या वेळी मी, दानीएल, तीन आठवडे, खूप दुःखी होतो. 3 त्या तीन आठवड्यांमध्ये मी आवडते जेवण केले नाही मांस अजिबात खाल्ले नाही, मी मद्य प्यायलो नाही, स्वत:ला तेल लावले नाही तीन आठवडे मी असे केले. 4 वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या 24 व्या दिवशी मी हिद्देकेल नदीकाठी उभा असताना. 5 मी वर पाहिले, तर माझ्यासमोर एक माणूस उभा होता. त्याने तागाचे कपडे घातले होते उफाजमधील सोन्याचा कमरपट्टा त्याने बांधला होता. 6 त्याचा देह चकचकीत दगडासारखा होता. त्याचा चेहरा विद्युतलतेप्रमाणे चमकत होता त्याचे हात व पाय चमक दिलेल्या पितळाप्रमाणे होते. त्याचा आवाज लोकांच्या कोलहलाप्रमाणे मोठा होता. 7 “दुष्टान्त पाहणारा मी, दानीएल, एकटाच होतो माझ्याबरोबरच्या लोकांना दृष्टान्त दिसला नाही. पण तरीही ते घाबरले. ते इतके घाबरल, की दूर पळून जाऊन लपून बसले. 8 मग मी एकटाच उरलो .मी दृष्टान्त पाहात होतो. त्या दृष्टान्ताने मी सुध्दा घाबरलो. माझा धीर खचला. मृत माणसाच्या चेहऱ्याप्रमाणे माझा चेहरा पांढराफटक पडला, मी असहाय झालो. 9 मग मी दृष्टान्तातील त्या माणसाला बोलताना ऐकले त्याचा आवाज ऐकताना, मला गाढ झोप लागली मी जमिनीवर पालथा पडलो होतो. 10 मग मला एका हाताचा स्पर्श जाणवला. तो स्पर्श होताच मी हात गुडघे ह्यावर भार टाकून ओणवा झालो मी इतका घाबरलो होतो की थरथर कापत होतो. 11 दृष्टान्तातील माणस मला म्हणाला ‘दानीएला, देव तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्याशी बोलेन त्यावर काळजीपूर्वक विचार कर. उभा राहा मला तुझ्याकडेच पाठविले आहे. तो असे म्हणताच मी उभा राहिलो भीतीमुळे अजूनही मी थरथर कापत होतो. 12 मग दृष्टान्तातील माणस पुन्हा बोलू लागला तो म्हणाला, ‘दानीएला, घाबरू नकोस ज्या दिवसापासून तू ज्ञान मिळविण्याचे व देवापुढे नम्र होण्याचे ठरविलेस, त्या दिवसापासून तो तुझी प्रार्थना ऐकत आहे. तू प्रार्थना करीत असल्यामुळेच मी तुझ्याकडे आलो. 13 पण पारसचा राजपुत्र (देवदूत) 21 दिवस माझ्याशी लढत होता व मला त्रास देत होता. पण महत्वाच्या राजपुत्रांपैकी (देवदूतांपैकी) एक मिखाएल माझ्या मदतीला आला. कारण मी तेथे अडकुन पडलो होतो 14 भविष्यात तुझ्या लोकांच्या बाबतीत काय घडणार आहे, हे तुला समजावून सांगायला मी येथे आलो आहे. दानीएला, हा दृष्टान्त भविष्यकाळासंबंधी आहे.’ 15 तो माणूस माझ्याशी बोलत असताना, मी खाली वाकून जमिनीवर डोके टेकविले. मी बोलू शकत नव्हतो. 16 मग माणसाप्रमाणे दिसणाऱ्या एकाने माझ्या ओठांना स्पर्श केला मग मी तोंड उघडले व बोलू लागलो. माझ्यासमोर उभ्या असणाऱ्याला मी म्हणालो,”महाराज दृष्टान्तात मी जे काही पाहिले, त्याने मी अस्वस्थ झालो आहे आणि घाबरलो आहे मी असहाय आहे. 17 “महाराज, मी दानीएल तुमचा सेवक.मी तुमच्याशी कसा बोलू शकेन? माझा धीर खचला आहे व वास घेणेही मला कठीण आहे.” 18 माणसाप्रमाणे दिसणाऱ्याने मला पुन्हा स्पर्श केला त्या स्पर्शाने मला शक्ती आली. 19 मग तो म्हणाला, ‘दानीएला घाबरू नकोस, देवाचे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुला शांती लाभो! धीर धर! धीर धर!’ “त्याच्या बोलण्याने मला धीर आला मग मी म्हणालो, महाराज तुम्ही मला धीर दिलात आता तुम्ही बोलू शकता. 2 20 मग तो म्हणाला, “दानीएला, मी तुझ्याकडे का आलो, तुला माहीत आहे का? लवकरच पारसच्या राजपुत्राशी (देवदूताशी) लढायला मला परत गेले पाहिजे. मी जाईल तेव्हा ग्रीसचा राजपुत्र (देवदूत) येईल. 21 पण दानीएल, जाण्याआधी. प्रथम सत्याच्या ग्रंथात काय लिहिले आहे ते मी तुला सांगितले पाहिजे, त्या दुष्ट देवदूतांच्या विरोधात माझ्या बाजूने मीखाएलशिवाय कोणीही उभा राहणार नाही. मीखाएल तुझ्या लोकांवर राज्य करणारा राजपुत्र (देवदूत) आहे.
Total 12 अध्याय, Selected धडा 10 / 12
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
×

Alert

×

Marathi Letters Keypad References