मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
स्तोत्रसंहिता
1. सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझे मंदिर खरोखरच सुंदर आहे.
2. परमेश्वरा, मला वाट पाहाण्याचा मनस्वी कंटाळा आला आहे. मला तुझ्या मंदिरात यायचे आहे. माझ्यातला कण कण जिवंत देवाजवळ जायला उत्सुक आहे.
3. सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, चिमण्यांना आणि पाकोळ्यांना देखील घरे असतात. ते पक्षी तुझ्या सिंहासनाजवळ त्यांचे घरटे बांधतात आणि तिथे त्यांना पिल्ले होतात.
4. तुझ्या मंदिरात राहाणारे लोक खूप सुखी असतात. ते नेहमी तुझी स्तुती करतात.
5. जे लोक तुला त्यांच्या शक्तीचा स्त्रोत मानतात ते खूप सुखी असतात, ते तुला त्यांचे नेतृत्व करु देतात.
6. ते बाका दरीतून जातात तेव्हा देव तिला झऱ्याचे शिशिरातल्या पावसाने निर्माण केलेल्या जलाशयांचे स्वरुप देतो.
7. लोक देवाला भेटण्यासाठी सियोनाला जाताना एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात.
8. सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक याकोबाच्या देवा, माझे ऐक.
9. देवा, आमच्या रक्षणकर्त्याचे रक्षण कर. तू निवडलेल्या राजाला दया दाखव.
10. तुझ्या मंदिरातला एक दिवस इतर ठिकाणच्या हजार दिवसांपेक्षा चांगला आहे. माझ्या देवाच्या प्रवेशद्वारापाशी उभे राहाणे हे वाईट माणसाच्या घरात राहाण्यापेक्षा चांगले आहे.
11. परमेश्वर आमचा रक्षणकर्ता आणि आमचा गौरवशाली राजा आहे. देव आम्हाला दयेचा आणि गौरवाचा आशीर्वाद देतो जे लोक परमेश्वराची प्रार्थना करतात आणि त्याचे ऐकतात त्यांना परमेश्वर प्रत्येक चांगली गोष्ट देतो.
12. सर्वशक्तिमान परमेश्वरा, जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात ते खरोखरच सुखी असतात. 13
Total 150 अध्याय, Selected धडा 84 / 150
1 सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझे मंदिर खरोखरच सुंदर आहे. 2 परमेश्वरा, मला वाट पाहाण्याचा मनस्वी कंटाळा आला आहे. मला तुझ्या मंदिरात यायचे आहे. माझ्यातला कण कण जिवंत देवाजवळ जायला उत्सुक आहे. 3 सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, चिमण्यांना आणि पाकोळ्यांना देखील घरे असतात. ते पक्षी तुझ्या सिंहासनाजवळ त्यांचे घरटे बांधतात आणि तिथे त्यांना पिल्ले होतात. 4 तुझ्या मंदिरात राहाणारे लोक खूप सुखी असतात. ते नेहमी तुझी स्तुती करतात. 5 जे लोक तुला त्यांच्या शक्तीचा स्त्रोत मानतात ते खूप सुखी असतात, ते तुला त्यांचे नेतृत्व करु देतात. 6 ते बाका दरीतून जातात तेव्हा देव तिला झऱ्याचे शिशिरातल्या पावसाने निर्माण केलेल्या जलाशयांचे स्वरुप देतो. 7 लोक देवाला भेटण्यासाठी सियोनाला जाताना एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात. 8 सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक याकोबाच्या देवा, माझे ऐक. 9 देवा, आमच्या रक्षणकर्त्याचे रक्षण कर. तू निवडलेल्या राजाला दया दाखव. 10 तुझ्या मंदिरातला एक दिवस इतर ठिकाणच्या हजार दिवसांपेक्षा चांगला आहे. माझ्या देवाच्या प्रवेशद्वारापाशी उभे राहाणे हे वाईट माणसाच्या घरात राहाण्यापेक्षा चांगले आहे. 11 परमेश्वर आमचा रक्षणकर्ता आणि आमचा गौरवशाली राजा आहे. देव आम्हाला दयेचा आणि गौरवाचा आशीर्वाद देतो जे लोक परमेश्वराची प्रार्थना करतात आणि त्याचे ऐकतात त्यांना परमेश्वर प्रत्येक चांगली गोष्ट देतो. 12 सर्वशक्तिमान परमेश्वरा, जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात ते खरोखरच सुखी असतात. 13
Total 150 अध्याय, Selected धडा 84 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References