3. 3 ते तुझ्या लोकांविरुध्द गुप्त योजना आखत आहेत. ते तू ज्या माणसांवर प्रेम करतोस त्या माणसांविरुध्दच्या योजनाची चर्चा करत आहेत.
|
4. 4 ते शत्रू म्हणत आहेत, “या त्यांचा पूर्णनिपात करु. यानंतर कोणालाही “इस्राएल” या शब्दाची आठवण सुध्दा येणार नाही.”
|
6. 6 ते शत्रू आमच्याशी लढण्यासाठी एकत्र आले, अदोम आणि इश्माएलीचे लोक, मवाब आणि हागारचे वंशज गाबाल, अम्मोन अमालेकचे लोक, पलेशेथ आणि सोरचे लोक. ते सगळे लोक आमच्याशी लढायला एकत्र आले.
|
11. 11 देवा, शत्रूच्या प्रमुखाचा पराभव कर. तू ओरेब व जेब यांचे जे केलेस तेच त्यांचेही कर जेबह व सलमुन्ना यांचे जे केलेस तसेच त्यांचे ही कर.
|
12. 12 देवा, ते लोक आम्हाला जबरदस्तीने तुझ्या वस्तीवरुन जायला सांगत होते म्हणजे त्यांना तिचा ताबा घेता येईल.
|
13. 13 देवा, तू त्यांना गवतासारखे वाऱ्यावर उडवून लाव वाऱ्याने वाळलेलं गवत इतस्तता पसरतं तस तू त्यांना पसरवून दे.
|
15. 15 देवा, वादळात धूळ जशी उडून जाते, तसे तू त्या लोकांचा पाठलाग करुन त्यांना उडवून लाव. त्यांना गदगदा हलव आणि तुफानात उडवून दे.
|
16. 16 देवा, आपण खरोखरच अशक्त आहोत हे त्यांना कळून येऊ दे. नंतर त्यांना तुझ्या नावाचा धावा करायची इच्छा होईल.
|
17. 17 देवा, त्या लोकांना खूप घाबरवून सोड आणि त्यांना कायमचे लज्जित कर. त्यांना काळीमा फास आणि त्यांचा नाश कर.
|
18. 18 नंतर त्यांना तू देव आहेस हे कळेल. तुझे नाव यहोवा आहे हे त्यांना कळेल. तू सर्वशक्तिमान देवच सर्व जगाचा देव आहेस हे ही त्यांना कळेल.
|