मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
यशया
1. ह्या वेळेस, हिज्कीया फार आजारी पडला. जवळ जवळ तो मेलाच होता. अमोजचा मुलगा यशया हा संदेष्टा त्याला भेटायला गेला.यशया राजाला म्हणाला, “परमेश्वराने मला तुला सांगायला सांगितले आहे ‘तू लवकरच मरशील, म्हणून तू गेल्यावर तुझ्या घरातील लोकांनी काय करावे हे तू त्यांना सांगावेस. तू ह्या आजारातून उठणार नाहीस.”‘
2. हिज्कीया मंदिराच्या दिशेला वळला आणि त्याने प्रार्थना करण्यास सुरवात केली. तो म्हणाला,
3. “परमेश्वरा, मी नेहमीच शुध्द मनाने आणि प्रामाणिकपणाने तुझ्यासमोरच जगलो, हे कृपया लक्षात असू दे. मी तू सांगितलेल्या चांगल्या गोष्टीच नेहमी केल्या.” मग हिज्कीया कळवळून रडू लागला.
4. यशयाला परमेश्वराकडून संदेश मिळाला,
5. “हिज्कीयाकडे जाऊन त्याला सांग परमेश्वर, तुझ्या पूर्वजाचा, दाविदाचा, देव म्हणतो, ‘मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे दु:खाश्रू पाहिले, मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षे वाढवीन.
6. मी अश्शूराच्या राजापासून तुझा व ह्या शहराचा बचाव करीन.”‘22पण हिज्कीयाने यशयाला विचारले, “मी बरा होईन ह्याची खात्री पटण्यासाठी परमेश्वराचा संकेत काय असेल? मी परमेश्वराच्या मंदिरात जाण्यायोग्य होईन हे कसे ओळखायचे?”
7. (7-8) परमेश्वर जे म्हणतो ते करतो हे दाखविण्याची ही खूण असेल. “सूर्यास्तानंतर सूर्य क्षितिजाखाली गेल्यामुळे आहाजच्या पायऱ्यांवर पडणारी सावली मी दहा पावले मागे आणीन. सूर्यास्त होताच सूर्याची सावली दहा पावले मागे जाईल.”21मग यशया हिज्कीयाला म्हणाला, “अंजिरे वाटून तू तुझ्या दुखऱ्या भागावर लाव. मग तू बरा होशील.”
8.
9. आजारातून उठल्यावर हिज्कीयाने लिहिलेले हे पत्र:
10. मी म्हातारा होईपर्यंत जगावे असे मीच स्वत:शी म्हटले होते. पण अधोलोकाच्या दारातून जाण्याची माझी वेळ आली, आता मला सर्व काळ तेथेच काढावा लागेल असे मला वाटते.
11. म्हणून मी म्हणालो, “मी याह परमेश्वराला जिवंतांच्या भूमीवर यापुढे कधी पाहणार नाही. मी पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना पाहणार नाही.
12. माझे घर, माझा मेंढपाळाचा तंबू जमीनदोस्त केला जात आहे आणि माझ्यापासून हिसकावून घेतला गेला. जसे मागावरचे कापड कापून त्याची गुंडाळी केली जाते, तसा मी संपलो आहे. तू माझे आयुष्य अल्प काळातच संपविलेस.
13. सबंध रात्रभर मी सिंहगर्जनेप्रमाणे मोठमोठयाने रडलो. सिंहाने हाडेसुध्दा खाऊन नष्ट करावीत तशा माझ्या आशा नष्ट झाल्या. तू माझे आयुष्य फार लवकर संपविलेस.
14. मी कबुतराप्रमाणे घुमलो, पक्ष्याप्रमाणे कलकललो, माझे डोळे थकले, तरीही मी स्वर्गाकडे बघत राहिलो. माझ्या प्रभू, मी खूप निराश झालो आहे. मला मदत करशील असे वचन दे.”
15. मी काय बोलू? माझ्या प्रभूने काय घडणार ते मला सांगितले. आणि माझा प्रभूच ते घडवून आणील माझ्या मनाला खूप क्लेश झाले म्हणून आता माझ्या सगळ्या आयुष्यात मी नम्र होईन.
16. माझ्या प्रभू, या कठीण काळाचा उपयोग माझ्यात परत आत्मा आणण्यासाठी कर. मला शुध्द व निरोगी व्हायला मदत कर. मला परत जिवंत कर.
17. पाहा! माझ्या अडचणी संपल्या. मला आता शांतता मिळाली आहे. तू माझ्यावर खूप प्रेम करतोस. तू मला थडग्यात सडू दिले नाहीस तू माझे अपराध पोटात घातलेस. (मला क्षमा केलीस) माझी पापे दूर फेकलीस.
18. मृत तुझी स्तुतिस्तोत्रे गात नाहीत. अधोलोकातील लोक तुझे स्तवन करीत नाहीत. मृत तुझ्या मदतीची आशा करीत नाहीत. ते जमिनीतील खड्ड्यात जातात आणि परत कधीही बोलत नाहीत.
19. माझ्याप्रमाणे जिवंत असणारी माणसे तुझी स्तुती करतात. म्हणून वडिलांनी मुलांना तुझ्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही असे सांगावे.
20. (20-22) मी म्हणतो, “परमेश्वराने माझे रक्षण केले. म्हणून आम्ही आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात गाऊ व वाद्य वाजवू.”
21.
22.
Total 66 अध्याय, Selected धडा 38 / 66
1 ह्या वेळेस, हिज्कीया फार आजारी पडला. जवळ जवळ तो मेलाच होता. अमोजचा मुलगा यशया हा संदेष्टा त्याला भेटायला गेला.यशया राजाला म्हणाला, “परमेश्वराने मला तुला सांगायला सांगितले आहे ‘तू लवकरच मरशील, म्हणून तू गेल्यावर तुझ्या घरातील लोकांनी काय करावे हे तू त्यांना सांगावेस. तू ह्या आजारातून उठणार नाहीस.”‘ 2 हिज्कीया मंदिराच्या दिशेला वळला आणि त्याने प्रार्थना करण्यास सुरवात केली. तो म्हणाला, 3 “परमेश्वरा, मी नेहमीच शुध्द मनाने आणि प्रामाणिकपणाने तुझ्यासमोरच जगलो, हे कृपया लक्षात असू दे. मी तू सांगितलेल्या चांगल्या गोष्टीच नेहमी केल्या.” मग हिज्कीया कळवळून रडू लागला. 4 यशयाला परमेश्वराकडून संदेश मिळाला, 5 “हिज्कीयाकडे जाऊन त्याला सांग परमेश्वर, तुझ्या पूर्वजाचा, दाविदाचा, देव म्हणतो, ‘मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे दु:खाश्रू पाहिले, मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षे वाढवीन. 6 मी अश्शूराच्या राजापासून तुझा व ह्या शहराचा बचाव करीन.”‘22पण हिज्कीयाने यशयाला विचारले, “मी बरा होईन ह्याची खात्री पटण्यासाठी परमेश्वराचा संकेत काय असेल? मी परमेश्वराच्या मंदिरात जाण्यायोग्य होईन हे कसे ओळखायचे?” 7 (7-8) परमेश्वर जे म्हणतो ते करतो हे दाखविण्याची ही खूण असेल. “सूर्यास्तानंतर सूर्य क्षितिजाखाली गेल्यामुळे आहाजच्या पायऱ्यांवर पडणारी सावली मी दहा पावले मागे आणीन. सूर्यास्त होताच सूर्याची सावली दहा पावले मागे जाईल.”21मग यशया हिज्कीयाला म्हणाला, “अंजिरे वाटून तू तुझ्या दुखऱ्या भागावर लाव. मग तू बरा होशील.” 8 9 आजारातून उठल्यावर हिज्कीयाने लिहिलेले हे पत्र:
10 मी म्हातारा होईपर्यंत जगावे असे मीच स्वत:शी म्हटले होते. पण अधोलोकाच्या दारातून जाण्याची माझी वेळ आली, आता मला सर्व काळ तेथेच काढावा लागेल असे मला वाटते.
11 म्हणून मी म्हणालो, “मी याह परमेश्वराला जिवंतांच्या भूमीवर यापुढे कधी पाहणार नाही. मी पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना पाहणार नाही. 12 माझे घर, माझा मेंढपाळाचा तंबू जमीनदोस्त केला जात आहे आणि माझ्यापासून हिसकावून घेतला गेला. जसे मागावरचे कापड कापून त्याची गुंडाळी केली जाते, तसा मी संपलो आहे. तू माझे आयुष्य अल्प काळातच संपविलेस. 13 सबंध रात्रभर मी सिंहगर्जनेप्रमाणे मोठमोठयाने रडलो. सिंहाने हाडेसुध्दा खाऊन नष्ट करावीत तशा माझ्या आशा नष्ट झाल्या. तू माझे आयुष्य फार लवकर संपविलेस. 14 मी कबुतराप्रमाणे घुमलो, पक्ष्याप्रमाणे कलकललो, माझे डोळे थकले, तरीही मी स्वर्गाकडे बघत राहिलो. माझ्या प्रभू, मी खूप निराश झालो आहे. मला मदत करशील असे वचन दे.” 15 मी काय बोलू? माझ्या प्रभूने काय घडणार ते मला सांगितले. आणि माझा प्रभूच ते घडवून आणील माझ्या मनाला खूप क्लेश झाले म्हणून आता माझ्या सगळ्या आयुष्यात मी नम्र होईन. 16 माझ्या प्रभू, या कठीण काळाचा उपयोग माझ्यात परत आत्मा आणण्यासाठी कर. मला शुध्द व निरोगी व्हायला मदत कर. मला परत जिवंत कर. 17 पाहा! माझ्या अडचणी संपल्या. मला आता शांतता मिळाली आहे. तू माझ्यावर खूप प्रेम करतोस. तू मला थडग्यात सडू दिले नाहीस तू माझे अपराध पोटात घातलेस. (मला क्षमा केलीस) माझी पापे दूर फेकलीस. 18 मृत तुझी स्तुतिस्तोत्रे गात नाहीत. अधोलोकातील लोक तुझे स्तवन करीत नाहीत. मृत तुझ्या मदतीची आशा करीत नाहीत. ते जमिनीतील खड्ड्यात जातात आणि परत कधीही बोलत नाहीत. 19 माझ्याप्रमाणे जिवंत असणारी माणसे तुझी स्तुती करतात. म्हणून वडिलांनी मुलांना तुझ्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही असे सांगावे. 20 (20-22) मी म्हणतो, “परमेश्वराने माझे रक्षण केले. म्हणून आम्ही आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात गाऊ व वाद्य वाजवू.” 21 22
Total 66 अध्याय, Selected धडा 38 / 66
×

Alert

×

Marathi Letters Keypad References