12. ज्ञान आणि समज तुला दुष्ट लोकांसारखे चुकीचे जीवन जगण्यापासून परावृत्त करतील. ते लोक बोलतानाही दुष्टपणा करतात.
|
15. त्या लोकांवर विश्वास टाकणे शक्य नाही. ते खोटं बोलतात आणि फसवतात. पण तुझे ज्ञान आणि तुझी समज तुला या सर्व गोष्टींपासून दूर ठेवेल.
|
16. (16-17) ज्ञान तुला अनोळखी स्त्रीपासून वाचवील. दुसऱ्या देशातली एखादी स्त्री गोड शब्दांनी तुला तिच्याबरोबर पाप करायला प्रवृत्त करेल. त्या स्त्रीने तरुणपणी लग्न केले. पण तिने नवऱ्याला सोडले. तिने देवासमोर तिचे लग्नाचे वचन पाळले नाही. पण ज्ञान तुला तिला ‘नाही’ म्हणायला मदत करील.
|
18. तिच्या बरोबर घरात जाणे म्हणजे विनाशाकडे नेणारे पहिले पाऊल उचलणे. जर तू तिच्या मागे गेलास तर ती तुला तुझ्या कबरेकडे घेऊन जाईल.
|
19. ती उघड्या कबरेसारखी आहे. जे लोक तिच्याकडे आत जातात ते जीवनाला मुकतात आणि पुन्हा कधीच परत येत नाहीत.
|
22. परंतु दुष्ट लोक त्यांच्या जमीनीला मुकतील. जे लोक खोटे बोलतात व फसवतात त्यांना त्यांच्या जमिनीपासून दूर नेले जाईल.
|