2. 2 मी परमेश्वराला म्हणालो “परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस माझ्याकडे असलेली प्रत्येक चांगली गोष्ट मला तुझ्याकडून मिळाली आहे”
|
3. 3 परमेश्वर त्याच्या पृथ्वीवरील भक्तांसाठी अनेक अद्भुत गोष्टी करतो. परमेश्वर त्या लोकांवर खरोखरच प्रेम करतो हे तो दाखवतो.
|
4. 4 परंतु जे लोक उपासनेसाठी दुसऱ्या देवाकडे वळतात त्यांना दु:ख भोगावे लागते. ते त्या मूर्तीना रक्ताची भेट देतात. मी त्यात सहभागी होणार नाही. मी त्या मूर्तींची नावेसुध्दा घेणार नाही.
|
5. 5 माझा वाटा आणि प्याला परमेश्वराकडूनच येतो. परमेश्वरा, तू माझा सांभाळ करतोस तुच मला माझा वाटा देतोस.
|
7. 7 मी परमेश्वराची स्तुती करतो कारण त्याने मला चांगले शिकवले रात्रीच्या वेळी मला अगदी आतल्या गाभ्यातून आज्ञा मिळाल्या.
|
10. 10 का? कारण परमेश्वरा, तू माझ्या आत्म्याला मृत्युलोकात राहू देणार नाहीस. तुझ्याशी इमानदार असणाऱ्याला तू थडग्यात सडू देणार नाहीस.
|
11. 11 तू मला नीट कसे जगावे ते शिकवशील परमेश्वरा, केवळ तुझ्या सान्निध्यात असणेही संपूर्ण समाधान देणारे असेल. तुझ्या उजव्या बाजूला राहण्याने कायमचे समाधान लाभेल.
|