मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
स्तोत्रसंहिता
1. देवा, मला माझ्या सर्व संकटांपासून वाचव. पाणी आता माझ्या तोंडापर्यंत चढले आहे.
2. इथे उभे राहाण्यासाठीही काही नाही. मी बुडत चाललो आहे. चिखलात बुडत आहे. मी खोल पाण्यात आहे आणि लाटा माझ्यावर येऊन आदळत आहेत. मी आता लवकरच बुडणार आहे.
3. मी मदतीसाठी याचना करुन थकलो आहे. माझा घसा दुखत आहे. मी थांबलो आणि डोळे दुखेपर्यंत तुझ्या मदतीची वाट पाहिली.
4. मला माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही जास्त शत्रू आहेत. ते विनाकारण माझा तिरस्कार करतात. माझा नाश व्हावा म्हणून ते हरप्रकारे प्रयत्न करतात. माझे शत्रू माझ्याविषयी खोटे सांगतात. मी चोरी केली असे त्यांनी खोटेच सांगितले आणि नंतर मी न चोरलेल्या वस्तूंसाठी त्यांनी मला किंमत मोजायला भाग पाडले.
5. देवा, मी मूर्खासारखा वागलो ते तुला माहीत आहे. मी माझी पापे तुझ्यापासून लपवून ठेवू शकत नाही.
6. प्रभु, सर्वशक्तीमान परमेश्वरा, तुझ्या भक्तांना माझी लाज वाटू देऊ नकोस. इस्राएलाच्या देवा, तुझी उपासना करणाऱ्यांना माझ्यामुळे अडचणीत येऊ देऊ नकोस.
7. माझा चेहरा लाजेने झाकला गेला आहे. मी तुझ्यासाठी ही लाज जवळ बाळगतो.
8. माझे भाऊ मला परक्याप्रमाणे वागवतात. माझ्या आईची मुले मला परदेशी असल्याप्रमाणे वागवतात.
9. तुझ्या मंदीराविषयीच्या माझ्या तीव्र भावना माझा नाश करीत आहेत. जे लोक तुझी चेष्टा करतात त्यांच्याकडून मी अपमानित होतो.
10. मी रडतो, उपवास करतो आणि त्यामुळे ते माझी चेष्टा करतात.
11. माझे दु:ख दाखवण्याकरता मी जोडेभरडे कपडे वापरतो आणि लोक माझ्याविषयी विनोदी किस्से सांगतात.
12. ते सार्वजनिक ठिकाणी माझ्याबद्दल बोलतात. मद्य पिणारे लोक माझ्यावर गाणी रचतात.
13. माझ्याविषयी म्हणशील तर परमेश्वरा, ही माझी तुझ्यासाठी प्रार्थना आहे, तू माझा स्वीकार करावस असे मला वाटते. तू मला तारशील असा विश्वास मला वाटते.
14. मला चिखलातून बाहेर काढ मला चिखलात बुडू देऊ नकोस. माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांपासून मला वाचव. मला ह्या खोल पाण्यापासून वाचव.
15. लाटांमुळे मला बुडू देऊ नकोस खोल खड्यांना माझा घास घेऊ देऊ नकोस. धडग्याच्या जबड्यात मला जाऊ देऊ नकोस.
16. परमेश्वरा, तुझे प्रेम चांगले आहे. मला तुझ्या खऱ्या प्रेमाने उत्तर दे. तुझ्यातल्या सगळ्या दया बुध्दीने तू माझ्याकडे वळ आणि मला मदत कर.
17. तुझ्या सेवाकापासून दूर जाऊ नकोस, मी संकटात आहे, लवकर ये मला मदत कर.
18. ये माझ्या आत्म्याचा उध्दार कर. मला माझ्या शत्रूंपासून सोडव.
19. तुला माझी लाज ठाऊक आहे. माझे शत्रू माझा प्राण उतारा करतात ते तुला माहीत आहे. या गोष्टी करताना तू त्यांना पाहिले आहेस.
20. शरमेने मला गाडून टाकले आहे. लाजेमुळे मी लवकरच मरणार आहे. मी सहानुभूतीसाठी ताटकळलो आहे पण मला ती मिळाली नाही. कुणीतरी माझे सांत्वन करेल म्हणून मी वाट पाहिली, पण कुणीही आले नाही.
21. त्यांनी मला विष दिले, अन्न नव्हे. त्यांनी मला आंब दिली द्राक्षारस नाही.
22. त्यांचे ताट अन्नाने भरलेले आहे त्यांच्या, टेबलाजवळ बसून जेवताना त्यांना खूप सुरक्षित वाटते. हेच जेवण त्यांचा नाश करो अशी माझी इच्छा आहे.
23. ते आंध्ळे व्हावेत आणि त्यांच्या पाठी अशक्त व्हाव्यात अशी मी आशा करतो.
24. त्यांना तुझ्या क्रोधाची चव घेऊ दे.
25. त्यांची घरे रिकामी कर. त्यांत कुणालाही राहू देऊ नकोस.
26. त्यांना शिक्षा कर म्हणजे ते पळून जातील, त्यानंतर त्यांच्याजवळ बोलण्यासाठी दुख आणि जखमा खरोखरच असतील.
27. त्यांनी ज्या वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल त्यांना शिक्षा कर. तू किती चांगला असू शकतोस ते त्यांना दाखव नकोस.
28. जिवंत माणसांच्या यादीतून त्यांचे नाव पुसून टाक. त्यांचे नाव चांगल्या लोकांच्या यादीत लिहू नकोस.
29. मी खिन्न आणि दु:खी आहे देवा, मला वर उचल, मला वाचव.
30. मी गाण्यातून देवाच्या नावाची स्तुती करीन. मी त्याची धन्यवादाच्या गाण्यातून स्तुती करीन.
31. यामुळे देव आनंदित होईल. एखादा बैल मारुन संपूर्ण प्राणी देवाला अर्पण करण्यापेक्षा हे कितीतरी चांगले.
32. गरीबांनो तुम्ही देवाची उपासना करण्यासाठी आलात. या गोष्टी कळल्याने तुम्हाला आनंद होईल.
33. परमेश्वर गरीबांचे, दीनांचे ऐकतो परमेश्वराला तुरुंगातले लोक अजूनही आवडतात.
34. देवाची स्तुती करा स्वर्ग आणि पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्व गोष्टी तुम्ही सर्वानी त्याची स्तुती करा.
35. परमेश्वर सियोनाला वाचवेल. परमेश्वर यहुदाची नगरे परत बसवील. ती जमीन ज्यांच्या मालकीची होती ते लोक तिथे पुन्हा राहातील.
36. त्याच्या सेवकाच्या वंशजांना ती जमीन मिळेल. ज्या लोकांना त्याचे नाव आवडते ते लोक तिथे राहातील.
Total 150 अध्याय, Selected धडा 69 / 150
1 देवा, मला माझ्या सर्व संकटांपासून वाचव. पाणी आता माझ्या तोंडापर्यंत चढले आहे. 2 इथे उभे राहाण्यासाठीही काही नाही. मी बुडत चाललो आहे. चिखलात बुडत आहे. मी खोल पाण्यात आहे आणि लाटा माझ्यावर येऊन आदळत आहेत. मी आता लवकरच बुडणार आहे. 3 मी मदतीसाठी याचना करुन थकलो आहे. माझा घसा दुखत आहे. मी थांबलो आणि डोळे दुखेपर्यंत तुझ्या मदतीची वाट पाहिली. 4 मला माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही जास्त शत्रू आहेत. ते विनाकारण माझा तिरस्कार करतात. माझा नाश व्हावा म्हणून ते हरप्रकारे प्रयत्न करतात. माझे शत्रू माझ्याविषयी खोटे सांगतात. मी चोरी केली असे त्यांनी खोटेच सांगितले आणि नंतर मी न चोरलेल्या वस्तूंसाठी त्यांनी मला किंमत मोजायला भाग पाडले. 5 देवा, मी मूर्खासारखा वागलो ते तुला माहीत आहे. मी माझी पापे तुझ्यापासून लपवून ठेवू शकत नाही. 6 प्रभु, सर्वशक्तीमान परमेश्वरा, तुझ्या भक्तांना माझी लाज वाटू देऊ नकोस. इस्राएलाच्या देवा, तुझी उपासना करणाऱ्यांना माझ्यामुळे अडचणीत येऊ देऊ नकोस. 7 माझा चेहरा लाजेने झाकला गेला आहे. मी तुझ्यासाठी ही लाज जवळ बाळगतो. 8 माझे भाऊ मला परक्याप्रमाणे वागवतात. माझ्या आईची मुले मला परदेशी असल्याप्रमाणे वागवतात. 9 तुझ्या मंदीराविषयीच्या माझ्या तीव्र भावना माझा नाश करीत आहेत. जे लोक तुझी चेष्टा करतात त्यांच्याकडून मी अपमानित होतो. 10 मी रडतो, उपवास करतो आणि त्यामुळे ते माझी चेष्टा करतात. 11 माझे दु:ख दाखवण्याकरता मी जोडेभरडे कपडे वापरतो आणि लोक माझ्याविषयी विनोदी किस्से सांगतात. 12 ते सार्वजनिक ठिकाणी माझ्याबद्दल बोलतात. मद्य पिणारे लोक माझ्यावर गाणी रचतात. 13 माझ्याविषयी म्हणशील तर परमेश्वरा, ही माझी तुझ्यासाठी प्रार्थना आहे, तू माझा स्वीकार करावस असे मला वाटते. तू मला तारशील असा विश्वास मला वाटते. 14 मला चिखलातून बाहेर काढ मला चिखलात बुडू देऊ नकोस. माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांपासून मला वाचव. मला ह्या खोल पाण्यापासून वाचव. 15 लाटांमुळे मला बुडू देऊ नकोस खोल खड्यांना माझा घास घेऊ देऊ नकोस. धडग्याच्या जबड्यात मला जाऊ देऊ नकोस. 16 परमेश्वरा, तुझे प्रेम चांगले आहे. मला तुझ्या खऱ्या प्रेमाने उत्तर दे. तुझ्यातल्या सगळ्या दया बुध्दीने तू माझ्याकडे वळ आणि मला मदत कर. 17 तुझ्या सेवाकापासून दूर जाऊ नकोस, मी संकटात आहे, लवकर ये मला मदत कर. 18 ये माझ्या आत्म्याचा उध्दार कर. मला माझ्या शत्रूंपासून सोडव. 19 तुला माझी लाज ठाऊक आहे. माझे शत्रू माझा प्राण उतारा करतात ते तुला माहीत आहे. या गोष्टी करताना तू त्यांना पाहिले आहेस. 20 शरमेने मला गाडून टाकले आहे. लाजेमुळे मी लवकरच मरणार आहे. मी सहानुभूतीसाठी ताटकळलो आहे पण मला ती मिळाली नाही. कुणीतरी माझे सांत्वन करेल म्हणून मी वाट पाहिली, पण कुणीही आले नाही. 21 त्यांनी मला विष दिले, अन्न नव्हे. त्यांनी मला आंब दिली द्राक्षारस नाही. 22 त्यांचे ताट अन्नाने भरलेले आहे त्यांच्या, टेबलाजवळ बसून जेवताना त्यांना खूप सुरक्षित वाटते. हेच जेवण त्यांचा नाश करो अशी माझी इच्छा आहे. 23 ते आंध्ळे व्हावेत आणि त्यांच्या पाठी अशक्त व्हाव्यात अशी मी आशा करतो. 24 त्यांना तुझ्या क्रोधाची चव घेऊ दे. 25 त्यांची घरे रिकामी कर. त्यांत कुणालाही राहू देऊ नकोस. 26 त्यांना शिक्षा कर म्हणजे ते पळून जातील, त्यानंतर त्यांच्याजवळ बोलण्यासाठी दुख आणि जखमा खरोखरच असतील. 27 त्यांनी ज्या वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल त्यांना शिक्षा कर. तू किती चांगला असू शकतोस ते त्यांना दाखव नकोस. 28 जिवंत माणसांच्या यादीतून त्यांचे नाव पुसून टाक. त्यांचे नाव चांगल्या लोकांच्या यादीत लिहू नकोस. 29 मी खिन्न आणि दु:खी आहे देवा, मला वर उचल, मला वाचव. 30 मी गाण्यातून देवाच्या नावाची स्तुती करीन. मी त्याची धन्यवादाच्या गाण्यातून स्तुती करीन. 31 यामुळे देव आनंदित होईल. एखादा बैल मारुन संपूर्ण प्राणी देवाला अर्पण करण्यापेक्षा हे कितीतरी चांगले. 32 गरीबांनो तुम्ही देवाची उपासना करण्यासाठी आलात. या गोष्टी कळल्याने तुम्हाला आनंद होईल. 33 परमेश्वर गरीबांचे, दीनांचे ऐकतो परमेश्वराला तुरुंगातले लोक अजूनही आवडतात. 34 देवाची स्तुती करा स्वर्ग आणि पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्व गोष्टी तुम्ही सर्वानी त्याची स्तुती करा. 35 परमेश्वर सियोनाला वाचवेल. परमेश्वर यहुदाची नगरे परत बसवील. ती जमीन ज्यांच्या मालकीची होती ते लोक तिथे पुन्हा राहातील. 36 त्याच्या सेवकाच्या वंशजांना ती जमीन मिळेल. ज्या लोकांना त्याचे नाव आवडते ते लोक तिथे राहातील.
Total 150 अध्याय, Selected धडा 69 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References