3. 3 एखाद्याने तुझ्यावर विश्वास टाकला तर त्याची निराशा होणार नाही परंतु दगाबाज मात्र निराश होतील. त्यांना काहीही मिळणार नाही.
|
5. 5 मला मार्ग दाखव आणि मला तुझे सत्य शिकव तू माझा देव आहेस, माझा तारणारा आहेस मी रोज तुझ्यावर विश्वास टाकतो.
|
7. 7 माझे पाप आणि तरुणपणी मी ज्या वाईट गोष्टीकेल्या त्या लक्षात ठेवू नकोस परमेश्वरा, तुझ्या चांगल्या कीर्तीसाठी माझी प्रेमाने आठण ठेव.
|
11. 11 परमेश्वरा, मी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या. परंतु तुझा चांगुलपणा दाखवण्यासाठी तू मला त्याबद्दल क्षमा केलीस.
|
12. 12 जर एखाद्याने परमेश्वराच्या मार्गाने जायचे ठरवले तर देव त्याला उत्तम रीतीने कसे जगायचे ते दाखवील.
|
13. 13 तो माणूस चांगल्या गोष्टींचे सुख उपभोगील आणि त्याची मुले देवाने त्याला जी जमीन द्यायचे वचन दिले होते त्या जमिनीचे मालक बनतील.
|