मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
यशया
1. त्या वेळेस, यहुदात, लोक पुढील गाणे म्हणतील परमेश्वराने आम्हाला तारण दिले आहे. भक्कम तटबंदी व पुरेशी संरक्षणव्यवस्था असलेले आमचे शहर अभेद्द आहे.
2. वेशी उघडा म्हणजे देवाची चांगली शिकवण मानणारे सज्जन लोक आत प्रवेश करतील.
3. परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर श्रध्दा ठेवणाऱ्यांना, तू खरी शांती देतोस.
4. म्हणून नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण परमेश्वर हा तुमच्यासाठी निरंतर सुरक्षित आसरा आहे.
5. पण परमेश्वर उद्दाम शहराचा नाश करील, आणि तेथील लोकांना शिक्षा करील. परमेश्वर ते मोठे शहर धुळीला मिळवील.
6. नंतर दीनदुबळे त्याचे भग्नावशेष पायाखाली तुडवतील.
7. प्रामाणिकपणा हे सज्जनांचे ब्रीद असते. सज्जन सत्याच्या सरळ मार्गाने जातात, आणि देवा तू तो मार्ग सुकर व सुलभ करतोस.
8. पण परमेश्वरा, तू न्याय कसा करतोस ते बघण्यास आम्ही उत्सुक आहोत. आमचे आत्मे तुला व तुझ्या नांवाला कायम स्मरणात ठेवू इच्छितात.
9. प्रत्येक रात्रीबरोबर तुझ्याशी एकरूप होण्याची आमची इच्छा आहे, आणि प्रत्येक पहाटेबरोबर माझ्यातील आत्मा तुझ्याशी समरस होऊ इच्छितो. जेव्हा तू न्याय देशील तेव्हा लोकांना जगण्याचा योग्य मार्ग सापडेल.
10. पापी माणसावर तू फक्त दयाच करीत राहिलास तर तो कधीच सत्कृत्य करायला शिकणार नाही. वाईट माणूस चांगल्या लोकांत राहिला तरी वाईट गोष्टीच करील: दुष्टाला परमेश्वराची महानता कदाचित कधीच कळणार नाही.
11. पण परमेश्वरा, तू त्यांना शिक्षा करण्यास तयार हो. नक्कीच ते हे पाहातील नाही का? परमेश्वरा, तुझ्या लोकांबद्दल असलेले तुझे भक्कम प्रेम तू पाप्यांना दाखव. मग ते नक्कीच खजील होतील. तुझे शत्रू नक्कीच त्यांच्याच आगीत भस्मसात होतील.
12. परमेश्वरा, आम्ही तडीस नेलेल्या सर्व गोष्टी तूच आमच्यासाठी केल्या आहेस तेव्हा आम्हाला शांती दे.
13. परमेश्वरा, तू आमचा देव आहेस. पूर्वी आम्ही इतर भोंदू देवांना अनुसरलो आम्ही त्यांना जवळ केले. पण आता लोकांनी फक्त तुझेच नाव घ्यावे असे आम्हाला वाटते.
14. ते मृत देव जीवंत होणार नाहीत. त्यांची भुते आता उठणार नाहीत. तू त्यांचा नाश करायचे ठरविलेस आणि त्यांची आठवण देणाऱ्या सर्व खाणाखुणा तू नष्ट केल्यास.
15. तुझ्या आवडत्या राष्ट्राला तू मदत केलीस. इतर लोकांना त्या राष्ट्राचा पराभव करण्यापासून थांबविलेस.
16. परमेश्वरा, संकटात असताना लोक तुझे स्मरण करतात. तू शिक्षा केल्यास लोक मनात तुझा धावा करतात.
17. परमेश्वरा, आम्ही तुझ्याबरोबर नाही. प्रसूति वेदना होऊन रडणाऱ्या स्त्रीसारखे आम्ही आहोत. ती वेदनेने विव्हळते.
18. त्याचप्रमाणे आम्हाल वेदना आहेत. आम्ही जन्म देतो पण तो फक्त वाऱ्याला. आम्ही जगासाठी नवीन लोक तयार करत नाही. आम्ही देशासाठी तारण आणत नाही.
19. परंतु परमेश्वर म्हणतो, “तुझे लोक मेले असले तरी जिवंत होतील. आमच्या माणसांचे मृतदेह सजीव होतील. मृतांनो, थडग्यातून उठा आणि आनंदित व्हा. तुमच्यावर पडलेले दव हे जणू नव्या दिवसाचा प्रकाश आहे. तो प्रकाश नवाकाळ येत आहे हे दाखवितो. मृत लोकांना आता जमिनीत पुरले आहे पण त्यांना नवजीवन मिळेल.”
20. माझ्या लोकांनो, आपापल्या खोल्यांत जा. दारे लावून घ्या. थोडा्या वेळ खोलीतच लपून बसा. देवाचा राग शांत होईपर्यंत लपून राहा.
21. परमेश्वर दुष्कृत्यांबद्दल जगातील लोकांचा न्यायनिवाडा करण्यासाठी देव आपले स्थान सोडून येईल. मारल्या गेलेल्या लोकांचे रक्त पृथ्वी त्याला दाखवील.
Total 66 अध्याय, Selected धडा 26 / 66
1 त्या वेळेस, यहुदात, लोक पुढील गाणे म्हणतील परमेश्वराने आम्हाला तारण दिले आहे. भक्कम तटबंदी व पुरेशी संरक्षणव्यवस्था असलेले आमचे शहर अभेद्द आहे. 2 वेशी उघडा म्हणजे देवाची चांगली शिकवण मानणारे सज्जन लोक आत प्रवेश करतील. 3 परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर श्रध्दा ठेवणाऱ्यांना, तू खरी शांती देतोस. 4 म्हणून नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण परमेश्वर हा तुमच्यासाठी निरंतर सुरक्षित आसरा आहे. 5 पण परमेश्वर उद्दाम शहराचा नाश करील, आणि तेथील लोकांना शिक्षा करील. परमेश्वर ते मोठे शहर धुळीला मिळवील. 6 नंतर दीनदुबळे त्याचे भग्नावशेष पायाखाली तुडवतील. 7 प्रामाणिकपणा हे सज्जनांचे ब्रीद असते. सज्जन सत्याच्या सरळ मार्गाने जातात, आणि देवा तू तो मार्ग सुकर व सुलभ करतोस. 8 पण परमेश्वरा, तू न्याय कसा करतोस ते बघण्यास आम्ही उत्सुक आहोत. आमचे आत्मे तुला व तुझ्या नांवाला कायम स्मरणात ठेवू इच्छितात. 9 प्रत्येक रात्रीबरोबर तुझ्याशी एकरूप होण्याची आमची इच्छा आहे, आणि प्रत्येक पहाटेबरोबर माझ्यातील आत्मा तुझ्याशी समरस होऊ इच्छितो. जेव्हा तू न्याय देशील तेव्हा लोकांना जगण्याचा योग्य मार्ग सापडेल. 10 पापी माणसावर तू फक्त दयाच करीत राहिलास तर तो कधीच सत्कृत्य करायला शिकणार नाही. वाईट माणूस चांगल्या लोकांत राहिला तरी वाईट गोष्टीच करील: दुष्टाला परमेश्वराची महानता कदाचित कधीच कळणार नाही. 11 पण परमेश्वरा, तू त्यांना शिक्षा करण्यास तयार हो. नक्कीच ते हे पाहातील नाही का? परमेश्वरा, तुझ्या लोकांबद्दल असलेले तुझे भक्कम प्रेम तू पाप्यांना दाखव. मग ते नक्कीच खजील होतील. तुझे शत्रू नक्कीच त्यांच्याच आगीत भस्मसात होतील. 12 परमेश्वरा, आम्ही तडीस नेलेल्या सर्व गोष्टी तूच आमच्यासाठी केल्या आहेस तेव्हा आम्हाला शांती दे. 13 परमेश्वरा, तू आमचा देव आहेस. पूर्वी आम्ही इतर भोंदू देवांना अनुसरलो आम्ही त्यांना जवळ केले. पण आता लोकांनी फक्त तुझेच नाव घ्यावे असे आम्हाला वाटते. 14 ते मृत देव जीवंत होणार नाहीत. त्यांची भुते आता उठणार नाहीत. तू त्यांचा नाश करायचे ठरविलेस आणि त्यांची आठवण देणाऱ्या सर्व खाणाखुणा तू नष्ट केल्यास. 15 तुझ्या आवडत्या राष्ट्राला तू मदत केलीस. इतर लोकांना त्या राष्ट्राचा पराभव करण्यापासून थांबविलेस. 16 परमेश्वरा, संकटात असताना लोक तुझे स्मरण करतात. तू शिक्षा केल्यास लोक मनात तुझा धावा करतात. 17 परमेश्वरा, आम्ही तुझ्याबरोबर नाही. प्रसूति वेदना होऊन रडणाऱ्या स्त्रीसारखे आम्ही आहोत. ती वेदनेने विव्हळते. 18 त्याचप्रमाणे आम्हाल वेदना आहेत. आम्ही जन्म देतो पण तो फक्त वाऱ्याला. आम्ही जगासाठी नवीन लोक तयार करत नाही. आम्ही देशासाठी तारण आणत नाही. 19 परंतु परमेश्वर म्हणतो, “तुझे लोक मेले असले तरी जिवंत होतील. आमच्या माणसांचे मृतदेह सजीव होतील. मृतांनो, थडग्यातून उठा आणि आनंदित व्हा. तुमच्यावर पडलेले दव हे जणू नव्या दिवसाचा प्रकाश आहे. तो प्रकाश नवाकाळ येत आहे हे दाखवितो. मृत लोकांना आता जमिनीत पुरले आहे पण त्यांना नवजीवन मिळेल.” 20 माझ्या लोकांनो, आपापल्या खोल्यांत जा. दारे लावून घ्या. थोडा्या वेळ खोलीतच लपून बसा. देवाचा राग शांत होईपर्यंत लपून राहा. 21 परमेश्वर दुष्कृत्यांबद्दल जगातील लोकांचा न्यायनिवाडा करण्यासाठी देव आपले स्थान सोडून येईल. मारल्या गेलेल्या लोकांचे रक्त पृथ्वी त्याला दाखवील.
Total 66 अध्याय, Selected धडा 26 / 66
×

Alert

×

Marathi Letters Keypad References