1. मुला, दुसन्याच्या कर्जाला जामीन राहू नकोस. त्या माणसाला कर्जांची परतफेड करता आली नाही तर तू ते परत करण्याचे वचन का दिलेस? तू दुसऱ्याच्या कर्जाची हमी घेतलीस का?
|
3. तू त्या माणसाच्या शक्तीखाली आलास. मग त्याच्याकडे जा आणि स्वत:ला सोडव. त्याच्या कर्जापासून तुझी सुटका करण्यासाठी त्याची भीक माग.
|
5. शिकाऱ्यापासून हरिण जसे दूर पळते तसा तू सापळ्यापासून दूर राहा. जाळ्यातून उडून जाणान्या पक्ष्याप्रमाणे स्वत:ला सोडव.
|
8. पण उन्हाळ्यात ती सगळे अन्न गोळा करते. मुंगी तिचे अन्न साठवते आणि हिवाळ्यात तिच्याजवळ भरपूर अन्न असते.
|
11. परंतु तो झोपतच राहातो. आणि गरीब होत राहातो. लवकरच त्याच्याजवळ काहीही नसेल. चोर अचानक येऊन सर्व काही घेऊन जातो त्याचप्रमाणे त्याला अचानक गरीबी येईल.
|
15. पण त्याला शिक्षा होईल. त्याच्यावर अचानक संकट येईल. त्याचा त्वरित नाश होईल. आणि त्याला काहीही मदत मिळू शकणार नाही.
|
19. माणूस जो खोटे बोलतो आणि कोर्टात खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतो. माणूस जो वादविवादाला सुरुवात करतो आणि दुसऱ्यांमध्ये भांडणे लावून देतो.
|
22. त्यांची शिकवण तुला जिथे जायचे असेल तिथे नेईल. तू झोपलास की ती तुझ्यावर लक्ष ठेवेल आणि तू जेव्हा उठशील तेव्हा ती तुझ्याशी बोलेल आणि तुला मार्ग दाखवील.
|
23. तुझ्या आईवडिलांची शिकवण आणि आज्ञा प्रकाशाप्रमाणे असून त्या तुला योग्य मार्ग दाखवतात. ते तुला योग्य मार्ग दाखवतात आणि जीवनाचा मार्ग आचरायला शिकवतात.
|
24. त्यांची शिकवण तुला दुष्ट स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते. नवऱ्याला सोडून आलेल्या बाईच्या भुरळ पाडणाऱ्या बोलण्यापासून ते शब्द तुझे रक्षण करतात.
|
25. ती स्त्री सुंदर असेल. पण ते सौंदर्य तुझ्यात जळू देऊ नकोस आणि तुला त्याची भुरळ पडू देऊ नकोस. तू तिच्या डोळ्यांनी जायबंदी होऊ नकोस.
|
26. वेश्येचा मोबदला एक भाकरीचा असेल. पण दुसऱ्याच्या बायकोची किंमत म्हणून तुला तुझे जीवित द्यावे लागेल.
|
30. (30-31) माणूस भुकेला असला तर तो अन्नाची चोरी करतो. जर तो पकडला गेला तर त्याला चोरलेल्या अन्नाच्या सात पट अन्न द्यावे लागते. त्याच्या जवळ असेल नसेल ते सर्व त्याला त्याबद्दल द्यावे लागते. पण इतर लोक समजून घेतात. ते त्याच्या बद्दलचा आदर घालवत नाहीत.
|
32. पण जो माणूस व्यभिचाराचे पाप करतो तो मूर्ख असतो. तो स्वत:चा नाश करीत असतो. तो स्वत:च त्याच्या नाशाला कारणीभूत असतो.
|
33. लोकांना त्याच्याबद्दल वाटणारा आदर नाहीसा होतो. आणि त्याच्यावरचा लज्जेचा डाग कधीही धुतला जाणार नाही.
|
34. त्या स्त्रीचा नवरा मत्सरी होईल, त्या नवऱ्याला खूप राग येईल. त्या दुसऱ्या माणसाला शिक्षा करण्यासाठी तो काय वाट्टेल ते करेल.
|