मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
1 इतिहास
1. {#1कोश यरूशलेमेस आणतात [BR]2 शमु. 6:12-16 } [PS]दावीदाने दावीद नगरात स्वत:साठी घरे बांधली. तसेच त्याने देवाचा कोश ठेवण्यासाठी एक स्थान तयार केले व त्यासाठी तंबू केला.
2. मग दावीद म्हणाला, “फक्त लेवींनाच देवाचा कोश वाहून आणण्याची परवानगी आहे. या कामासाठी आणि सर्वकाळ परमेश्वराची सेवा करण्यासाठीच त्यांची निवड झाली आहे.”
3. मग दावीदाने परमेश्वराच्या कोशासाठी जे ठिकाण तयार केले होते तेथे तो वर आणण्यासाठी सर्व इस्राएल लोकांस यरूशलेमेत एकत्र जमा केले. [PE]
4.
5. [PS]दावीदाने अहरोनाचे वंशज आणि लेवी यांनाही एकत्र जमवले. [PE][QS]कहाथाच्या घराण्यातील उरीएल त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे एकशें वीस माणसे होती. [QE]
6. [QS]मरारीच्या कुळातला असाया हा त्यांचा नेता होता व त्याचे नातेवाईक दोनशे वीस माणसे होती. [QE]
7. [QS]गर्षोमच्या घराण्यातला योएल हा त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे एकशेतीस माणसे होती. [QE]
8. [QS]अलीसाफानच्या घराण्यापैकी त्यांचा नेता शमाया होता व त्याचे नातेवाईक दोनशे माणसे होते. [QE]
9. [QS]हेब्रोनाच्या वंशातला अलीएल त्यांच्या नेता होता व त्याचे नातेवाईक ऐंशी माणसे होते. [QE]
10. [QS]उज्जियेलाच्या घराण्यातला अमीनादाब हा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक एकशें बारा माणसे होती. [QE]
11. [PS]दावीदाने मग सादोक आणि अब्याथार याजकांना बोलावले. आणि तसेच उरीएल, असाया, योएल, शमाया, अलीएल आणि अमीनादाब या लेवींनाही बोलावून घेतले.
12. दावीद त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी घराण्यांचे प्रमुख आहात. तुम्ही आपल्या भावांसहीत आपणास पवित्र करा. यासाठी की, इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या कोशासाठी मी तयार केलेल्या जागेत तुम्ही तो आणावा. [PE]
13. [PS]पहिल्या वेळी तुम्ही तो उचलून आणला नव्हता. आपण आपला देव परमेश्वर याच्या विधीचे पालन केले नाही किंवा त्याचा धावा आम्ही केला नाही, म्हणून त्याने आपल्याला शिक्षा दिली.”
14. यावरुन याजक व लेवी यांनी इस्राएलाचा देव परमेश्वर याचा कोश आणण्यासाठी आपणांस पवित्र केले.
15. मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आज्ञा केली होती त्याप्रमाणे लेव्यांनी देवाच्या कोशास लावलेल्या त्याच्या काठ्या आपल्या खांद्यावर घेऊन वाहिला. [PE]
16. [PS]दावीदाने लेवीच्या प्रमुखांना आज्ञा केली की, सतार, वीणा, ही तंतूवाद्ये, झांजा, ही संगीत वाद्ये मोठ्याने वाजवून आनंदाने उंच स्वराने गायन करणारे असे तुमच्या भावांतले गायकांची नेमणूक करा.
17. लेवींनी मग हेमान आणि त्याचे भाऊ आसाफ आणि एथान यांना नेमले. हेमान हा योएलाचा पुत्र. आसाफ बरेख्याचा पुत्र. एथान कुशायाचा पुत्र. हे सर्वजण मरारीच्या घराण्यातले होते.
18. याखेरीज लेवीचा आणखी एक गट होता. जखऱ्या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, बनाया, मासेया, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम आणि ईयेल हे ते होत. हे द्वारपाल होते.
19. हेमान, आसाफ आणि एथान हे गाणारे, यांना पितळेच्या झांजा मोठ्याने वाजवायला नेमले होते.
20. जखऱ्या, अजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, मासेया, बनाया हे अलामोथ या सुरावर तंतूवाद्ये वाजवायला नेमले होते.
21. मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम, ईयेल आणि अजज्या हे शमीनीथ सुरावर वीणा वाजवण्याच्या कामावर होते. [PE]
22. [PS]लेवींचा प्रमुख कनन्या हा मुख्य गायक होता. गायनात निपुण असल्यामुळे त्याच्यावर ही कामगिरी होती.
23. बरेख्या आणि एलकाना हे कोशाचे रक्षक होते.
24. शबन्या, योशाफाट, नथनेल, अमासय, जखऱ्या, बनाया आणि अलियेजर हे याजक देवाच्या कोशापुढे चालताना कर्णे वाजवत होते. ओबेद-अदोम आणि यहीया हे कोशाचे आणखी दोन रक्षक होते. [PE]
25. [PS]अशाप्रकारे दावीद, इस्राएलमधील वडीलजन, हजारांवरचे सरदार हे परमेश्वराच्या कराराचा कोश ओबेद-अदोमाच्या घरातून उत्साहाने आणण्यासाठी तिकडे गेले.
26. परमेश्वराचा करार कोश उचलून आणणाऱ्या लेव्यांना देवाने साहाय्य केले. त्यांनी सात बैल आणि सात मेंढे यांचे यज्ञार्पण केले. [PE]
27. [PS]कराराचा कोश वाहून नेणाऱ्या सर्व लेव्यांनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायक प्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दावीदाने तागाचे एफोद घातले होते.
28. अखेर सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वराचा कराराचा कोश आणला. जयघोष करत रणशिंगाच्या नादांत, कर्णे, झांजा, सतारी, वीणा अशी तंतूवाद्ये वाजवत त्यांनी तो आणला. [PE]
29. [PS]पण परमेश्वराच्या कराराचा कोश दावीद नगरात पोहचला तेव्हा शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून बाहेर पाहिले. तिने दावीद राजाला नाचताना, जल्लोष करताना पाहून तिने आपल्या अंतःकरणात त्यास तुच्छ लेखले. [PE]
Total 29 अध्याय, Selected धडा 15 / 29
कोश यरूशलेमेस आणतात
2 शमु. 6:12-16

1 दावीदाने दावीद नगरात स्वत:साठी घरे बांधली. तसेच त्याने देवाचा कोश ठेवण्यासाठी एक स्थान तयार केले व त्यासाठी तंबू केला. 2 मग दावीद म्हणाला, “फक्त लेवींनाच देवाचा कोश वाहून आणण्याची परवानगी आहे. या कामासाठी आणि सर्वकाळ परमेश्वराची सेवा करण्यासाठीच त्यांची निवड झाली आहे.” 3 मग दावीदाने परमेश्वराच्या कोशासाठी जे ठिकाण तयार केले होते तेथे तो वर आणण्यासाठी सर्व इस्राएल लोकांस यरूशलेमेत एकत्र जमा केले. 4 5 दावीदाने अहरोनाचे वंशज आणि लेवी यांनाही एकत्र जमवले. कहाथाच्या घराण्यातील उरीएल त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे एकशें वीस माणसे होती. 6 मरारीच्या कुळातला असाया हा त्यांचा नेता होता व त्याचे नातेवाईक दोनशे वीस माणसे होती. 7 गर्षोमच्या घराण्यातला योएल हा त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे एकशेतीस माणसे होती. 8 अलीसाफानच्या घराण्यापैकी त्यांचा नेता शमाया होता व त्याचे नातेवाईक दोनशे माणसे होते. 9 हेब्रोनाच्या वंशातला अलीएल त्यांच्या नेता होता व त्याचे नातेवाईक ऐंशी माणसे होते. 10 उज्जियेलाच्या घराण्यातला अमीनादाब हा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक एकशें बारा माणसे होती. 11 दावीदाने मग सादोक आणि अब्याथार याजकांना बोलावले. आणि तसेच उरीएल, असाया, योएल, शमाया, अलीएल आणि अमीनादाब या लेवींनाही बोलावून घेतले. 12 दावीद त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी घराण्यांचे प्रमुख आहात. तुम्ही आपल्या भावांसहीत आपणास पवित्र करा. यासाठी की, इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या कोशासाठी मी तयार केलेल्या जागेत तुम्ही तो आणावा. 13 पहिल्या वेळी तुम्ही तो उचलून आणला नव्हता. आपण आपला देव परमेश्वर याच्या विधीचे पालन केले नाही किंवा त्याचा धावा आम्ही केला नाही, म्हणून त्याने आपल्याला शिक्षा दिली.” 14 यावरुन याजक व लेवी यांनी इस्राएलाचा देव परमेश्वर याचा कोश आणण्यासाठी आपणांस पवित्र केले. 15 मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आज्ञा केली होती त्याप्रमाणे लेव्यांनी देवाच्या कोशास लावलेल्या त्याच्या काठ्या आपल्या खांद्यावर घेऊन वाहिला. 16 दावीदाने लेवीच्या प्रमुखांना आज्ञा केली की, सतार, वीणा, ही तंतूवाद्ये, झांजा, ही संगीत वाद्ये मोठ्याने वाजवून आनंदाने उंच स्वराने गायन करणारे असे तुमच्या भावांतले गायकांची नेमणूक करा. 17 लेवींनी मग हेमान आणि त्याचे भाऊ आसाफ आणि एथान यांना नेमले. हेमान हा योएलाचा पुत्र. आसाफ बरेख्याचा पुत्र. एथान कुशायाचा पुत्र. हे सर्वजण मरारीच्या घराण्यातले होते. 18 याखेरीज लेवीचा आणखी एक गट होता. जखऱ्या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, बनाया, मासेया, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम आणि ईयेल हे ते होत. हे द्वारपाल होते. 19 हेमान, आसाफ आणि एथान हे गाणारे, यांना पितळेच्या झांजा मोठ्याने वाजवायला नेमले होते. 20 जखऱ्या, अजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, मासेया, बनाया हे अलामोथ या सुरावर तंतूवाद्ये वाजवायला नेमले होते. 21 मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम, ईयेल आणि अजज्या हे शमीनीथ सुरावर वीणा वाजवण्याच्या कामावर होते. 22 लेवींचा प्रमुख कनन्या हा मुख्य गायक होता. गायनात निपुण असल्यामुळे त्याच्यावर ही कामगिरी होती. 23 बरेख्या आणि एलकाना हे कोशाचे रक्षक होते. 24 शबन्या, योशाफाट, नथनेल, अमासय, जखऱ्या, बनाया आणि अलियेजर हे याजक देवाच्या कोशापुढे चालताना कर्णे वाजवत होते. ओबेद-अदोम आणि यहीया हे कोशाचे आणखी दोन रक्षक होते. 25 अशाप्रकारे दावीद, इस्राएलमधील वडीलजन, हजारांवरचे सरदार हे परमेश्वराच्या कराराचा कोश ओबेद-अदोमाच्या घरातून उत्साहाने आणण्यासाठी तिकडे गेले. 26 परमेश्वराचा करार कोश उचलून आणणाऱ्या लेव्यांना देवाने साहाय्य केले. त्यांनी सात बैल आणि सात मेंढे यांचे यज्ञार्पण केले. 27 कराराचा कोश वाहून नेणाऱ्या सर्व लेव्यांनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायक प्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दावीदाने तागाचे एफोद घातले होते. 28 अखेर सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वराचा कराराचा कोश आणला. जयघोष करत रणशिंगाच्या नादांत, कर्णे, झांजा, सतारी, वीणा अशी तंतूवाद्ये वाजवत त्यांनी तो आणला. 29 पण परमेश्वराच्या कराराचा कोश दावीद नगरात पोहचला तेव्हा शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून बाहेर पाहिले. तिने दावीद राजाला नाचताना, जल्लोष करताना पाहून तिने आपल्या अंतःकरणात त्यास तुच्छ लेखले.
Total 29 अध्याय, Selected धडा 15 / 29
×

Alert

×

Marathi Letters Keypad References