मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
1 राजे
1. {#1दुष्काळाविषयी एलीयाचे भविष्य } [PS]गिलाद येथील तिश्बी येथे उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीया हा एक संदेष्टा होता. एलीया अहाब राजाला म्हणाला, “मी इस्राएलाच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या जीविताची शप्पथ घेवून मी हे सांगतो की, येती काही वर्षे पाऊसच काय दंवसुध्दा पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.”
2. मग परमेश्वर एलीयाला म्हणाला,
3. “हा भाग सोड आणि पूर्वेला जा. करीथ या ओहोळापाशी लपून राहा. यार्देन नदीच्या पूर्वेला हा ओहोळ आहे.
4. त्या ओहोळाचे पाणी तू पी. कावळे तिथे तुला अन्न आणून देतील. त्यांना मी तसे सांगितले आहे.”
5. तेव्हा एलीया परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यार्देन नदीच्या पूर्वेला असलेल्या करीथ या ओहोळा जवळ राहायला गेला.
6. रोज सकाळ संध्याकाळ त्यास कावळे जेवण आणून देत. ओहोळाचे पाणी एलीया पीत असे.
7. पाऊस नव्हताच, तेव्हा काही काळानंतर ओहोळ आटला. [PE]
8. {#1एलीया आणि सारफथ येथील विधवा } [PS]तेव्हा परमेश्वर एलीयाला म्हणाला,
9. “सीदोनामधील सारफथ येथे जाऊन राहा, तेथे एक विधवा राहते. तिला मी तुला अन्न द्यायला सांगितले आहे.”
10. तेव्हा एलीया सारफथ येथे गेला. तो नगराच्या वेशीजवळ जातो तर त्यास एक स्त्री भेटली. ती विधवा होती. ती सरपण गोळा करत होती. एलीया तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला मिळेल का?”
11. ती पाणी आणायला निघाली तेव्हा, एलीया तिला म्हणाला, “मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे!”
12. तेव्हा ती स्त्री म्हणाली, “परमेश्वर देवाची शपथ सांगते, माझ्याकडे भाकर अजिबात नाही. थोडेसे पीठ शिल्लक आहे. आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे. इथे मी सरपण गोळा करायला आले. ते घेऊन मी घरी जाईन, स्वयंपाक करीन तो शेवटचाच. माझा पुत्र आणि मी जेवू आणि मग भूकेने मरु.”
13. तेव्हा एलीया तिला म्हणाला, “भिऊ नकोस. घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर. पण आधी जे पीठ शिल्लक आहे, त्याची लहानशी भाकर करून मला आणून दे, मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर.
14. इस्राएलाचा परमेश्वर देव म्हणाला आहे, तुझ्या डब्यातील पीठ कधी सरणार नाही. तुझ्या बरणीत नेहमीच तेल असेल. पुन्हा परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पाडेपर्यंत असे चालेल.”
15. तेव्हा ती घरी गेली. एलीयाच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. एलीया, ती आणि तिचा पुत्र यांना बरेच दिवसपर्यंत पुरेसे खायला मिळत गेले.
16. पीठ आणि तेल कधीच संपले नाही. एलीयाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणेच हे घडत गेले.
17. काही दिवसानंतर त्या स्त्रीचा पुत्र आजारी पडला. जिच्या मालकीचे ते घर होते, त्याचे दुखणे वाढत गेले शेवटी त्याचा श्वास थांबला.
18. तेव्हा ती स्त्री म्हणाली, “एलीया, तू तर देवाचा मनुष्य आहेस, मला तुझी काही मदत होईल का? की माझ्या पापांची आठवण द्यायलाच तू आला आहेस? की माझ्या मुलाला मारायला आला आहेस?”
19. एलीया तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला माझ्याकडे आण.” मग त्याने त्या मुलाला घेतले आणि वरच्या मजल्यावर तो गेला. आपल्या खोलीत, आपल्या बिछान्यावर त्याने त्यास ठेवले.
20. एलीयाने मग प्रार्थना केली, “परमेश्वर देवा, या विधवेने मला तिच्या घरी आश्रय दिला आहे. तिच्यावर ही वेळ का आणतोस? तिच्या मुलाला तू मारणार का?”
21. मग एलीयाने तीनदा त्याच्यावर पाखर घालून करून प्रार्थना केली, “परमेश्वर देवा याला वाचव.”
22. एलीयाच्या हाकेला परमेश्वराने उत्तर दिले. मुलाचा प्राण पुन्हा येऊन तो जिवंत झाला.
23. एलीयाने मुलाला खाली आणले. त्याच्या आईकडे त्यास सोपवून एलीया म्हणाला, “बघ, तुझा पुत्र जिवंत आहे.”
24. ती स्त्री एलीयाला म्हणाली, “तू खरोखरच देवाचा मनुष्य आहेस हे मला पटले. खरोखरच परमेश्वर तुझ्या शब्दाद्वारे बोलतो हे आता मला कळले.” [PE]
Total 22 अध्याय, Selected धडा 17 / 22
दुष्काळाविषयी एलीयाचे भविष्य 1 गिलाद येथील तिश्बी येथे उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीया हा एक संदेष्टा होता. एलीया अहाब राजाला म्हणाला, “मी इस्राएलाच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या जीविताची शप्पथ घेवून मी हे सांगतो की, येती काही वर्षे पाऊसच काय दंवसुध्दा पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.” 2 मग परमेश्वर एलीयाला म्हणाला, 3 “हा भाग सोड आणि पूर्वेला जा. करीथ या ओहोळापाशी लपून राहा. यार्देन नदीच्या पूर्वेला हा ओहोळ आहे. 4 त्या ओहोळाचे पाणी तू पी. कावळे तिथे तुला अन्न आणून देतील. त्यांना मी तसे सांगितले आहे.” 5 तेव्हा एलीया परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यार्देन नदीच्या पूर्वेला असलेल्या करीथ या ओहोळा जवळ राहायला गेला. 6 रोज सकाळ संध्याकाळ त्यास कावळे जेवण आणून देत. ओहोळाचे पाणी एलीया पीत असे. 7 पाऊस नव्हताच, तेव्हा काही काळानंतर ओहोळ आटला. एलीया आणि सारफथ येथील विधवा 8 तेव्हा परमेश्वर एलीयाला म्हणाला, 9 “सीदोनामधील सारफथ येथे जाऊन राहा, तेथे एक विधवा राहते. तिला मी तुला अन्न द्यायला सांगितले आहे.” 10 तेव्हा एलीया सारफथ येथे गेला. तो नगराच्या वेशीजवळ जातो तर त्यास एक स्त्री भेटली. ती विधवा होती. ती सरपण गोळा करत होती. एलीया तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला मिळेल का?” 11 ती पाणी आणायला निघाली तेव्हा, एलीया तिला म्हणाला, “मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे!” 12 तेव्हा ती स्त्री म्हणाली, “परमेश्वर देवाची शपथ सांगते, माझ्याकडे भाकर अजिबात नाही. थोडेसे पीठ शिल्लक आहे. आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे. इथे मी सरपण गोळा करायला आले. ते घेऊन मी घरी जाईन, स्वयंपाक करीन तो शेवटचाच. माझा पुत्र आणि मी जेवू आणि मग भूकेने मरु.” 13 तेव्हा एलीया तिला म्हणाला, “भिऊ नकोस. घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर. पण आधी जे पीठ शिल्लक आहे, त्याची लहानशी भाकर करून मला आणून दे, मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर. 14 इस्राएलाचा परमेश्वर देव म्हणाला आहे, तुझ्या डब्यातील पीठ कधी सरणार नाही. तुझ्या बरणीत नेहमीच तेल असेल. पुन्हा परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पाडेपर्यंत असे चालेल.” 15 तेव्हा ती घरी गेली. एलीयाच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. एलीया, ती आणि तिचा पुत्र यांना बरेच दिवसपर्यंत पुरेसे खायला मिळत गेले. 16 पीठ आणि तेल कधीच संपले नाही. एलीयाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणेच हे घडत गेले. 17 काही दिवसानंतर त्या स्त्रीचा पुत्र आजारी पडला. जिच्या मालकीचे ते घर होते, त्याचे दुखणे वाढत गेले शेवटी त्याचा श्वास थांबला. 18 तेव्हा ती स्त्री म्हणाली, “एलीया, तू तर देवाचा मनुष्य आहेस, मला तुझी काही मदत होईल का? की माझ्या पापांची आठवण द्यायलाच तू आला आहेस? की माझ्या मुलाला मारायला आला आहेस?” 19 एलीया तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला माझ्याकडे आण.” मग त्याने त्या मुलाला घेतले आणि वरच्या मजल्यावर तो गेला. आपल्या खोलीत, आपल्या बिछान्यावर त्याने त्यास ठेवले. 20 एलीयाने मग प्रार्थना केली, “परमेश्वर देवा, या विधवेने मला तिच्या घरी आश्रय दिला आहे. तिच्यावर ही वेळ का आणतोस? तिच्या मुलाला तू मारणार का?” 21 मग एलीयाने तीनदा त्याच्यावर पाखर घालून करून प्रार्थना केली, “परमेश्वर देवा याला वाचव.” 22 एलीयाच्या हाकेला परमेश्वराने उत्तर दिले. मुलाचा प्राण पुन्हा येऊन तो जिवंत झाला. 23 एलीयाने मुलाला खाली आणले. त्याच्या आईकडे त्यास सोपवून एलीया म्हणाला, “बघ, तुझा पुत्र जिवंत आहे.” 24 ती स्त्री एलीयाला म्हणाली, “तू खरोखरच देवाचा मनुष्य आहेस हे मला पटले. खरोखरच परमेश्वर तुझ्या शब्दाद्वारे बोलतो हे आता मला कळले.”
Total 22 अध्याय, Selected धडा 17 / 22
×

Alert

×

Marathi Letters Keypad References