1. त्यांनी देवाचा कोश दावीदाने उभारलेल्या तंबूमध्ये आत आणून ठेवला. मग त्यांनी देवापुढे होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पिली.
|
2. मग होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पिण्याचे समाप्त केल्यावर दावीदाने परमेश्वराच्या नावाने लोकांस आशीर्वाद दिला.
|
3. मग त्याने इस्राएलातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला एकएक भाकर, एक मांसाचा तुकडा आणि खिसमिसांची एकएक ढेप वाटून दिली. PEPS
|
4. मग दावीदाने काही लेवींची परमेश्वराच्या कोशापुढे सेवा करण्यास आणि इस्राएलाचा देव परमेश्वर याचे गुणगान गाणे, त्याचे आभार मानणे, स्तुती करणे हे त्यांचे काम नेमून दिले.
|
5. आसाफ हा पहिल्या गटाचा मुख्य होता. त्याचा गट झांज वाजवीत असे. जखऱ्या दुसऱ्या गटाचा प्रमुख होता. इतर लेवी उज्जियेल, शमीरामोथ, यहीएल, मत्तिथ्या, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम, आणि ईयेल. हे सतारी आणि वीणा वाजवत असत.
|
6. बनाया आणि याहजिएल हे याजक नेहमी देवाच्या कराराच्या कोशापुढे कर्णे वाजवत असत. स्तोत्र. 96:1-13; 105:1-15; 106:1, 47, 48 PEPS
|
7. {दाविदाचे आभारप्रदर्शक स्तोत्र} PS तेव्हा त्यादिवशी पहिल्याने दावीदाने आसाफाला आणि त्याच्या भावांना परमेश्वराची उपकारस्तुती करायला हे गीत गाण्यास दिले.
|
12. त्याने केलेल्या आश्र्चर्यकारक कृत्यांची आठवण करा.
त्याच्या तोंडचे न्याय आणि चमत्काराची कृत्ये यांचे स्मरण करा. |
19. मी हे म्हणालो त्यावेळी तुम्ही संख्येने अगदी थोडे होता,
फार थोडके होता, परक्या प्रदेशात उपरे असे होता. |
24. त्याच्या गौरवाची कृत्ये सर्व राष्ट्रांना कळवा
सर्व राष्ट्राला त्याच्या आश्चर्यकारक कृत्ये जाहीर सांगा. |
29. परमेश्वरास त्याच्या नावाचे योग्य ते गौरव द्या.
त्याच्यापुढे आपली अर्पणे आणा. पावित्र्यानेयुक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. |
30. त्याच्यासमोर सर्व पृथ्वीचा भीतीने थरकाप होतो
पण त्याने पृथ्वीला स्थिर स्थापले आहे. ते हलवता येणार नाही. |
31. पृथ्वी उल्हासित होवो आणि आकाश आनंदित होवो;
राष्ट्रामधल्या लोकांस सांगा की, “परमेश्वर राज्य करतो.” |
33. अरण्यातील वृक्ष परमेश्वरासमोर हर्षभरित होऊन गातील
कारण साक्षात तोच पृथ्वीचा न्याय करायला आला आहे. |
35. आणि म्हणा, “हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास तार.
आम्हास एकत्र करून इतर राष्ट्रापासून सोडीव. आणि तुझ्या पवित्र नावाची उपकारस्तुती करावी आणि तुझ्या स्तुतीने विजयी व्हावे.” |
36. इस्राएलाचा देव परमेश्वर अनादी काळापासून अनंतकाळापर्यंत धन्यवादित असो. सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले. PS
|
37. {कोशाच्या तैनातीसाठी लेवी लोकांची नेमणूक} PS मग आसाफ आणि त्याचे भाऊ यांनी कोशापुढे दररोजच्या कामाप्रमाणे नित्य सेवा करावी म्हणून दावीदाने त्यांना परमेश्वराच्या कराराच्या कोशासमोर ठेवले.
|
38. त्या कामात त्यांना मदत करण्यासाठी दावीदाने ओबेद-अदोम यांच्याबरोबर अडुसष्ट नातेवाईकांना त्यामध्ये समाविष्ट केले. यदूथूनाचा पुत्र ओबेद-अदोम, ह्याना होसासोबत, द्वारपाल केले होते.
|
39. सादोक याजक आणि त्याच्याबरोबरचे इतर याजक यांनी गिबोन येथील उच्चस्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवासमंडपासमोर सेवा करण्यास नेमले. PEPS
|
40. ते दररोज सकाळी आणि संध्याकाळी होमार्पणासाठी असलेल्या वेदीवर परमेश्वरास होमार्पणे करत असत. परमेश्वराच्या नियमशास्त्रात जे लिहिले आहे, त्याने इस्राएलांस आज्ञा केल्याप्रमाणे ते सर्व करावे म्हणून त्यांना नेमले होते.
|
41. आणि त्यांच्याबरोबर हेमान, यदूथून व बाकीचे नावे घेऊन निवडलेल्यांनी परमेश्वराची उपकारस्तुती करावी, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे. PEPS
|
42. हेमान आणि यदूथून यांना झांजा वाजवणे, कर्णे फुंकणे व देवासाठी इतर वाद्यांवर संगीत वाजवणे यांचे ते प्रमुख होते. यदूथूनाचे पुत्र द्वाररक्षक होते.
|