1. {गायनवादन करणाऱ्यांचा गट} PS दावीद आणि निवासमंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आसाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती अपत्ये. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी:
|
2. आसाफाच्या वंशातले:
जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला, हे आसाफाचे पुत्र राज्याच्या देखरेखीखाली आसाफाच्या मार्गदर्शनाखाली संदेश देत होते. |
3. यदूथूनाचे वंशज:
गदल्या, सारी, यशया, हशब्या व मत्तिथ्या हे सहाजण, आपला पिता यदूथून याच्या मार्गदर्शनाखाली वीणा वाजवून परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करून संदेश देत असे. PEPS |
4. हेमानाचे वंशज:
बुक्कीया, मत्तन्या, उज्जियेल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती-एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ. |
5. हेमान हा राजाचा संदेष्टा होता, हे सर्व हेमानाचे पुत्र शिंग वाजवायला होते. देवाने हेमानाला चौदा मुले आणि तीन मुली देऊन सन्मानीत केले. PEPS
|
6. हे सर्व आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या घरात ही अपत्ये झांजा, सतारी आणि वीणा वाजवून गीते गाण्यासाठी आणि देवाच्या घरातील सेवेसाठी होते. आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या देखरेखीखाली होती.
|
7. ते आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत पारंगत व परमेश्वरासाठी गायनाचे प्रशिक्षण घेतलेले दोनशे अठ्याऐशींजण होते.
|
8. त्यांनी लहानथोर, गुरु-शिष्य सर्वानी आपल्या कामासाठी सारख्याच चिठ्ठ्या टाकल्या व कामे वाटून घेतली. PEPS
|
9. तेव्हा आसाफाच्या मुलांच्या संबंधीत:
पहिली चिठ्ठी योसेफाची निघाली; दुसरी गदल्याची त्याची अपत्ये आणि भाऊबंद यांच्यातून बाराजणांना घेतले. |