1. {गायनवादन करणाऱ्यांचा गट} [PS] दावीद आणि निवासमंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आसाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती अपत्ये. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी:
2. आसाफाच्या वंशातले: [QBR] जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला, हे आसाफाचे पुत्र राज्याच्या देखरेखीखाली आसाफाच्या मार्गदर्शनाखाली संदेश देत होते.
3. यदूथूनाचे वंशज: [QBR] गदल्या, सारी, यशया, हशब्या व मत्तिथ्या हे सहाजण, आपला पिता यदूथून याच्या मार्गदर्शनाखाली वीणा वाजवून परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करून संदेश देत असे. [PE][PS]
4. हेमानाचे वंशज: [QBR] बुक्कीया, मत्तन्या, उज्जियेल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती-एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ.
5. हेमान हा राजाचा संदेष्टा होता, हे सर्व हेमानाचे पुत्र शिंग वाजवायला होते. देवाने हेमानाला चौदा मुले आणि तीन मुली देऊन सन्मानीत केले. [PE][PS]
6. हे सर्व आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या घरात ही अपत्ये झांजा, सतारी आणि वीणा वाजवून गीते गाण्यासाठी आणि देवाच्या घरातील सेवेसाठी होते. आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या देखरेखीखाली होती.
7. ते आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत पारंगत व परमेश्वरासाठी गायनाचे प्रशिक्षण घेतलेले दोनशे अठ्याऐशींजण होते.
8. त्यांनी लहानथोर, गुरु-शिष्य सर्वानी आपल्या कामासाठी सारख्याच चिठ्ठ्या टाकल्या व कामे वाटून घेतली. [PE][PS]
9. तेव्हा आसाफाच्या मुलांच्या संबंधीत: [QBR] पहिली चिठ्ठी योसेफाची निघाली; [QBR] दुसरी गदल्याची त्याची अपत्ये आणि भाऊबंद यांच्यातून बाराजणांना घेतले. [QBR]
10. तिसरी चिठ्ठी जक्कूरचे पुत्र आणि भाऊबंद यांच्यामधून, बाराजणांना घेतले. [QBR]
11. चौथी चिठ्ठी इस्रीची, त्याचे पुत्र आणि आप्त यांच्यामधून बाराजणांना घेतले. [QBR]
12. पाचवी नथन्याची त्याचे पुत्र व नातलग यामधून बाराजण. [QBR]
13. सहावी चिठ्ठी बुक्कीयाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण. [QBR]
14. सातवी यशरेलाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण. [QBR]
15. यशयाची आठवी. या चिठ्ठीनुसार पुत्र आणि भाऊबंद यामधून बाराजण. [QBR]
16. नववी मत्तन्याची. त्याचे पुत्र आणि नातलग यामधून बाराजण. [QBR]
17. दहावी शिमीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. [QBR]
18. अकरावी अजरेलाची. त्याचे पुत्र आणि नातलाग यांमधून बाराजण. [QBR]
19. बारावी हशब्याची. त्याचे पुत्र आणि त्याचे नातलग यांमधून बाराजण. [QBR]
20. तेरावी शूबाएलाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. [QBR]
21. चौदावी मत्तिथ्याची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण. [QBR]
22. पंधरावी यरेमोथची. त्याचे पुत्र आणि नातेवाईक यांमधून बारा. [QBR]
23. सोळावी हनन्याची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण. [QBR]
24. सतरावी याश्बकाशाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. [QBR]
25. अठरावी हनानीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. [QBR]
26. एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे पुत्र आणि आप्त यांमधून बाराजण. [QBR]
27. विसावी अलीयाथची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण. [QBR]
28. एकविसावी होथीरची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. [QBR]
29. बावीसावी गिद्दल्तीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. [QBR]
30. तेविसावी महजियोथची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण. [QBR]
31. चोविसावी रोममती-एजेरची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण. [PE]