मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
1 करिंथकरांस
1. {प्रेषित देवाला जबाबदारी} [PS] आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने मानावे.
2. या दृष्टीकोणातून हे गरजेचे आहे की जबाबदारी असलेल्या कारभाऱ्याने विश्वासू असले पाहिजे.
3. पण तुम्हाकडून किंवा कोणा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्याय व्हावा ही मला लहान गोष्ट वाटत आहे, मी माझा स्वतःचा देखील न्याय करीत नाही.
4. कारण जरी माझा विवेक मला दोष देत नाही तरी त्यामुळे मी निर्दोष ठरतो असे नाही. प्रभू हाच माझा न्यायनिवाडा करणारा आहे.
5. म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभू येईपर्यंत न्यायनिवाडा करुच नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंतःकरणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल. [PE][PS]
6. आता, बंधूनो, तुमच्यासाठी मी या गोष्टी माझ्याकरिता व अपुल्लोसाकरीता उदाहरणाने लागू केल्या आहेत. यासाठी की, [QBR] शास्त्रलेखापलीकडे कोणी स्वतःला न मानावे हा धडा तुम्ही आम्हापासून शिकावे म्हणजे तुम्हापैकी कोणीही गर्वाने फुगून जाऊ नये म्हणजे एखाद्याला चांगली वागणूक देऊन दुसऱ्याला विरोध करू नये. [PE][PS]
7. कारण तुझ्यात व दुसऱ्यात फरक पाहतो तो कोण आहे? आणि तुला मिळाले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? ज्याअर्थी तुला सर्व मिळाले आहे, तर तुला मिळाले नाही अशी बढाई का मारतोस?
8. तुम्हास ज्याची गरज आहे ते सर्व आधीच तुमच्याकडे आहे. तुम्ही अगोदरच श्रीमंत झाला आहात, तृप्त झाला आहात, तुम्हास असे वाटते की आमच्याशिवाय तुम्ही राजे झाला आहात आणि तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर राजे बनलो असतो.
9. कारण मला वाटते की देवाने आम्हास मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच मनुष्यांना जणू तमाशा असे झालो आहोत.
10. आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही बलवान आहात! तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही तुच्छ आहोत!
11. अगदी या क्षणापर्यंत आम्ही भुकेले आणि तहानलेले, उघडे आहोत, अमानुषपणे मारलेले, आम्ही बेघर असे आहोत.
12. आणि आम्ही श्रम करतो, आम्ही स्वतःच्या हातांनी काम करतो, आमची निंदा होत असता आम्ही आशीर्वाद देतो.
13. जेव्हा आमची निंदा होते, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो. जेव्हा आमचा छळ होतो तेव्हा आम्ही सहन करतो. जेव्हा आमची निंदा होते, आम्ही दयाळूपणे त्यांच्याशी बोलतो, या क्षणापर्यंत आम्ही जगासाठी गाळ आणि कचरा असे झालो आहोत. [PS]
14. {पितृतुल्य बोध व सूचना} [PS] मी तुम्हास हे लाजविण्यासाठी लिहित नाही, तर उलट मी तुम्हास माझ्या प्रिय लेकरांप्रमाणे चांगल्या गोष्टींची जाणीव करून देत आहे.
15. कारण जरी तुम्हास ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ वडील नाहीत कारण ख्रिस्त येशूमध्ये शुभवर्तमानाच्या योगे मी तुम्हास जन्म दिला आहे.
16. यास्तव मी तुम्हास बोध करतो की माझे अनुकरण करा.
17. यासाठीच तीमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे. प्रभूमध्ये तो माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. ज्याप्रमाणे मी सगळीकडे प्रत्येक मंडळीमध्ये शिकवतो, तसेच तो ख्रिस्तामधील माझ्या शिकवणुकीची आठवण करून देईल.
18. पण जणू काय मी तुमच्याकडे येणार नाही, म्हणून काहीजण गर्वाने फुगले आहेत.
19. तरीही जर प्रभूची इच्छा असेल तर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि मग मला समजेल की, जे गर्वाने फुगून गेले ते किती चांगले आहेत हे पाहण्यासाठी नव्हे, तर ते किती सामर्थ्यशाली आहेत हे मी पाहीन.
20. कारण देवाचे राज्य बोलण्यावर अवलंबून नसते तर सामर्थ्यावर असते.
21. तुम्हास काय पाहिजे? मी तुमच्याकडे तुम्हास शिक्षा करण्यासाठी काठी घेऊन यावे, की प्रीतीने व सौम्यतेच्या आत्म्याने यावे? [PE]

Notes

No Verse Added

Total 16 Chapters, Current Chapter 4 of Total Chapters 16
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
1 करिंथकरांस 4:17
1. {प्रेषित देवाला जबाबदारी} PS आम्ही ख्रिस्ताचे सेवक देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने मानावे.
2. या दृष्टीकोणातून हे गरजेचे आहे की जबाबदारी असलेल्या कारभाऱ्याने विश्वासू असले पाहिजे.
3. पण तुम्हाकडून किंवा कोणा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्याय व्हावा ही मला लहान गोष्ट वाटत आहे, मी माझा स्वतःचा देखील न्याय करीत नाही.
4. कारण जरी माझा विवेक मला दोष देत नाही तरी त्यामुळे मी निर्दोष ठरतो असे नाही. प्रभू हाच माझा न्यायनिवाडा करणारा आहे.
5. म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभू येईपर्यंत न्यायनिवाडा करुच नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील अंतःकरणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल. PEPS
6. आता, बंधूनो, तुमच्यासाठी मी या गोष्टी माझ्याकरिता अपुल्लोसाकरीता उदाहरणाने लागू केल्या आहेत. यासाठी की,
शास्त्रलेखापलीकडे कोणी स्वतःला मानावे हा धडा तुम्ही आम्हापासून शिकावे म्हणजे तुम्हापैकी कोणीही गर्वाने फुगून जाऊ नये म्हणजे एखाद्याला चांगली वागणूक देऊन दुसऱ्याला विरोध करू नये. PEPS
7. कारण तुझ्यात दुसऱ्यात फरक पाहतो तो कोण आहे? आणि तुला मिळाले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? ज्याअर्थी तुला सर्व मिळाले आहे, तर तुला मिळाले नाही अशी बढाई का मारतोस?
8. तुम्हास ज्याची गरज आहे ते सर्व आधीच तुमच्याकडे आहे. तुम्ही अगोदरच श्रीमंत झाला आहात, तृप्त झाला आहात, तुम्हास असे वाटते की आमच्याशिवाय तुम्ही राजे झाला आहात आणि तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर राजे बनलो असतो.
9. कारण मला वाटते की देवाने आम्हास मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच मनुष्यांना जणू तमाशा असे झालो आहोत.
10. आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही बलवान आहात! तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही तुच्छ आहोत!
11. अगदी या क्षणापर्यंत आम्ही भुकेले आणि तहानलेले, उघडे आहोत, अमानुषपणे मारलेले, आम्ही बेघर असे आहोत.
12. आणि आम्ही श्रम करतो, आम्ही स्वतःच्या हातांनी काम करतो, आमची निंदा होत असता आम्ही आशीर्वाद देतो.
13. जेव्हा आमची निंदा होते, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो. जेव्हा आमचा छळ होतो तेव्हा आम्ही सहन करतो. जेव्हा आमची निंदा होते, आम्ही दयाळूपणे त्यांच्याशी बोलतो, या क्षणापर्यंत आम्ही जगासाठी गाळ आणि कचरा असे झालो आहोत. PS
14. {पितृतुल्य बोध सूचना} PS मी तुम्हास हे लाजविण्यासाठी लिहित नाही, तर उलट मी तुम्हास माझ्या प्रिय लेकरांप्रमाणे चांगल्या गोष्टींची जाणीव करून देत आहे.
15. कारण जरी तुम्हास ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ वडील नाहीत कारण ख्रिस्त येशूमध्ये शुभवर्तमानाच्या योगे मी तुम्हास जन्म दिला आहे.
16. यास्तव मी तुम्हास बोध करतो की माझे अनुकरण करा.
17. यासाठीच तीमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे. प्रभूमध्ये तो माझा प्रिय विश्वासू पुत्र आहे. ज्याप्रमाणे मी सगळीकडे प्रत्येक मंडळीमध्ये शिकवतो, तसेच तो ख्रिस्तामधील माझ्या शिकवणुकीची आठवण करून देईल.
18. पण जणू काय मी तुमच्याकडे येणार नाही, म्हणून काहीजण गर्वाने फुगले आहेत.
19. तरीही जर प्रभूची इच्छा असेल तर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि मग मला समजेल की, जे गर्वाने फुगून गेले ते किती चांगले आहेत हे पाहण्यासाठी नव्हे, तर ते किती सामर्थ्यशाली आहेत हे मी पाहीन.
20. कारण देवाचे राज्य बोलण्यावर अवलंबून नसते तर सामर्थ्यावर असते.
21. तुम्हास काय पाहिजे? मी तुमच्याकडे तुम्हास शिक्षा करण्यासाठी काठी घेऊन यावे, की प्रीतीने सौम्यतेच्या आत्म्याने यावे? PE
Total 16 Chapters, Current Chapter 4 of Total Chapters 16
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
×

Alert

×

marathi Letters Keypad References