मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
2 राजे
1. {#1एलीयाचे स्वर्गारोहण } [PS]आणि असे झाले की, एका वावटळीद्वारे परमेश्वर एलीयाला वर स्वर्गास घेणार होता, तेव्हा एलीया अलीशाबरोबर गिलगालहून निघाला.
2. एलीया अलीशाला म्हणाला, “कृपाकरून तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला बेथेल येथे पाठवले आहे.” अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे, व तू जिवंत आहे, मी तुला सोडणार नाही.” मग ते खाली बेथेलास गेले. [PE]
3. [PS]तेव्हा बेथेल येथील संदेष्ट्यांचे पुत्र अलीशाकडे येऊन त्यास म्हणाले, “आज तुझ्या स्वामीला परमेश्वर तुझ्यापासून घेऊन जाणार आहे, हे तुला माहित आहे काय?” अलीशा म्हणाला, “होय, मला माहित आहे, पण या विषयी बोलू नका”
4. एलीया अलीशाला म्हणाला, “कृपाकरून तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यरीहो येथे पाठवले आहे.” पण अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे व तू जिवंत आहे, मी तुला सोडणार नाही.” मग ते यरीहोस आले. [PE]
5. [PS]तेव्हा यरीहो मधील संदेष्ट्यांचा समूह अलीशाकडे येऊन म्हणाली, “परमेश्वर तुझ्या स्वामीला आज तुझ्यापासून घेऊन जाणार आहे हे तुला माहित आहे काय?” अलीशा म्हणाला, “होय मला माहित आहे, पण या विषयी बोलू नका.”
6. नंतर एलीया अलीशाला म्हणाला, “तू कृपाकरून येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यार्देनेस पाठवले आहे.” अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे व तू जिवंत आहे; मी तुला सोडणार नाही.” तेव्हा ते दोघे पुढे निघाले. [PE]
7. [PS]नंतर संदेष्ट्याच्या मुलांतले पन्नास त्यांच्या विरूद्ध दिशेने लांब उभे राहिले व ते दोघे यार्देन जवळ उभे राहिले.
8. तेव्हा एलीयाने आपला झगा काढला व त्याची घडी केली, आणि तो पाण्यावर आपटला. तेव्हा पाणी दोन्ही दिशेने दुभागले व ते दोघे कोरडया भूमीवरुन चालत नदी पार करून गेले. [PE]
9. [PS]आणि असे झाले की, नदी ओलांडल्यावर एलीया अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने मला येथून घेऊन जायच्या अगोदर मी तुझ्यासाठी काय करावे ते माग.” अलीशा म्हणाला, “कृपाकरून तुमच्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.”
10. एलीयाने उत्तर दिले, “ही तर फारच कठिण गोष्ट तू मागितलीस. तरीसुद्धा, तुझ्या जवळून मी घेतला जात असता, जर तुला मी दिसलो तर हे शक्य आहे. पण जर नाही, तर असे होणार नाही.”
11. एलीया आणि अलीशा बोलत पुढे चालले होते, तेवढयात अग्नीचा रथ व अग्नीचे घोडे तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी त्या दोघांना एकमेकांपासून दूर केले, आणि एका वावटळीमधून एलीया वर स्वर्गात गेला.
12. अलीशा हे पाहून मोठ्याने ओरडला, “माझ्या बापा! माझ्या बापा! इस्राएलचा रथ आणि त्याचे घोडेस्वार!” त्याने एलीयाला पुन्हा पाहिले नाही. त्याने आपली वस्रे धरुन फाडली व त्याचे दोन तुकडे केले. [PE]
13. {#1अलीशा एलीयाच्या जागी येतो } [PS]त्याने एलीयाचा अंगरखा जो जमिनीवर पडला होता, उचलला, आणि परत यार्देनकाठी जाऊन उभा राहिला.
14. त्याने एलीयाचा झगा जो खाली पडला होता, तो घेऊन पाण्यावर मारला आणि म्हटले, “परमेश्वर, एलीयाचा देव कोठे आहे?” त्याने जेव्हा पाण्यावर मारले, तेव्हा पाणी दोन्ही बाजूस दुभंगले आणि अलीशा पार गेला. [PE]
15. [PS]तेव्हा यरीहो येथील संदेष्ट्यांचे पुत्र जे समोर होते ते त्यास पाहून म्हणाले, “एलीयाचा आत्मा अलीशावर आला आहे.” आणि ते त्यास भेटायला आले. त्यांनी त्यास जमिनीपर्यंत लवून नमन केले.
16. ते त्यास म्हणाले, “आता पाहा, तुझ्या दासाकडे कडे पन्नास धष्टपुष्ट माणसे आहेत. त्यांना जाऊन तुझ्या स्वामीचा शोध घेऊ दे. कदाचित् परमेश्वराच्या आत्म्याने एलीयाला वर नेऊन कोठेतरी डोंगर किंवा दरीमध्ये टाकले असेल.” अलीशा म्हणाला, “नाही, त्यांना पाठवू नका.” [PE]
17. [PS]पण अलीशाला लाज वाटेपर्यंत संदेष्ट्यांनी आग्रह धरला, तो म्हणाला, “त्यांना पाठवा.” मग त्यांनी पन्नास जणांना पाठवले, आणि त्यांनी एलीयाचा तीन दिवस शोध घेतला, पण ते त्यास शोधू शकले नाही.
18. आणि अलीशा यरीहोत राहत असता, ते त्याच्याकडे परत आले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जाऊ नका, असे मी तुम्हास सांगितले नव्हते काय?” [PE]
19. [PS]त्या नगरातील माणसे अलीशाला म्हणाली, “पाहा, आम्ही तुला विनंती करतो, या नगराची परिस्थिती आनंददायी आहे, माझ्या स्वामी हे तुम्ही पाहताच आहात, पण इथले पाणी खराब व जमीन नापीक आहे.”
20. अलीशा त्यांना म्हणाला, “एक नवीन पात्र घेऊन या आणि त्यामध्ये मीठ घाला.” तेव्हा त्यांनी ते त्याच्याकडे आणले. [PE]
21. [PS]अलीशा ते घेऊन त्या झऱ्याच्या उगमापाशी गेला आणि त्यामध्ये ते मीठ टाकून म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ‘आता हे पाणी मी बरे केले आहे. आता यापुढे आणखी मृत्यू किंवा नापिकी आणखी होणार नाही.”
22. अलीशा बोललेल्या वचनाप्रमाणे ते पाणी चांगले झाले व आजपर्यंत ते चांगले आहे. [PE]
23. [PS]नंतर अलीशा तेथून वर बेथेलास गेला. तो वाटेने वर चालत असता, लहान मुलांनी गावातून निघून त्याची टिंगल करायला सुरुवात केली. ती म्हणाली, “अरे टकल्या वर जा, ए टकल्या, वर जा.”
24. अलीशाने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले आणि परमेश्वराच्या नावाने त्यांना शाप दिला. त्यानंतर दोन अस्वलींनी वनातून बाहेर येऊन त्यांच्यातली बेचाळीस मुले फाडून टाकली.
25. नंतर अलीशा तेथून कर्मेल डोंगराकडे गेला, आणि तिथून तो परत शोमरोनास आला. [PE]
Total 25 अध्याय, Selected धडा 2 / 25
एलीयाचे स्वर्गारोहण 1 आणि असे झाले की, एका वावटळीद्वारे परमेश्वर एलीयाला वर स्वर्गास घेणार होता, तेव्हा एलीया अलीशाबरोबर गिलगालहून निघाला. 2 एलीया अलीशाला म्हणाला, “कृपाकरून तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला बेथेल येथे पाठवले आहे.” अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे, व तू जिवंत आहे, मी तुला सोडणार नाही.” मग ते खाली बेथेलास गेले. 3 तेव्हा बेथेल येथील संदेष्ट्यांचे पुत्र अलीशाकडे येऊन त्यास म्हणाले, “आज तुझ्या स्वामीला परमेश्वर तुझ्यापासून घेऊन जाणार आहे, हे तुला माहित आहे काय?” अलीशा म्हणाला, “होय, मला माहित आहे, पण या विषयी बोलू नका” 4 एलीया अलीशाला म्हणाला, “कृपाकरून तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यरीहो येथे पाठवले आहे.” पण अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे व तू जिवंत आहे, मी तुला सोडणार नाही.” मग ते यरीहोस आले. 5 तेव्हा यरीहो मधील संदेष्ट्यांचा समूह अलीशाकडे येऊन म्हणाली, “परमेश्वर तुझ्या स्वामीला आज तुझ्यापासून घेऊन जाणार आहे हे तुला माहित आहे काय?” अलीशा म्हणाला, “होय मला माहित आहे, पण या विषयी बोलू नका.” 6 नंतर एलीया अलीशाला म्हणाला, “तू कृपाकरून येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यार्देनेस पाठवले आहे.” अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे व तू जिवंत आहे; मी तुला सोडणार नाही.” तेव्हा ते दोघे पुढे निघाले. 7 नंतर संदेष्ट्याच्या मुलांतले पन्नास त्यांच्या विरूद्ध दिशेने लांब उभे राहिले व ते दोघे यार्देन जवळ उभे राहिले. 8 तेव्हा एलीयाने आपला झगा काढला व त्याची घडी केली, आणि तो पाण्यावर आपटला. तेव्हा पाणी दोन्ही दिशेने दुभागले व ते दोघे कोरडया भूमीवरुन चालत नदी पार करून गेले. 9 आणि असे झाले की, नदी ओलांडल्यावर एलीया अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने मला येथून घेऊन जायच्या अगोदर मी तुझ्यासाठी काय करावे ते माग.” अलीशा म्हणाला, “कृपाकरून तुमच्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.” 10 एलीयाने उत्तर दिले, “ही तर फारच कठिण गोष्ट तू मागितलीस. तरीसुद्धा, तुझ्या जवळून मी घेतला जात असता, जर तुला मी दिसलो तर हे शक्य आहे. पण जर नाही, तर असे होणार नाही.” 11 एलीया आणि अलीशा बोलत पुढे चालले होते, तेवढयात अग्नीचा रथ व अग्नीचे घोडे तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी त्या दोघांना एकमेकांपासून दूर केले, आणि एका वावटळीमधून एलीया वर स्वर्गात गेला. 12 अलीशा हे पाहून मोठ्याने ओरडला, “माझ्या बापा! माझ्या बापा! इस्राएलचा रथ आणि त्याचे घोडेस्वार!” त्याने एलीयाला पुन्हा पाहिले नाही. त्याने आपली वस्रे धरुन फाडली व त्याचे दोन तुकडे केले. अलीशा एलीयाच्या जागी येतो 13 त्याने एलीयाचा अंगरखा जो जमिनीवर पडला होता, उचलला, आणि परत यार्देनकाठी जाऊन उभा राहिला. 14 त्याने एलीयाचा झगा जो खाली पडला होता, तो घेऊन पाण्यावर मारला आणि म्हटले, “परमेश्वर, एलीयाचा देव कोठे आहे?” त्याने जेव्हा पाण्यावर मारले, तेव्हा पाणी दोन्ही बाजूस दुभंगले आणि अलीशा पार गेला. 15 तेव्हा यरीहो येथील संदेष्ट्यांचे पुत्र जे समोर होते ते त्यास पाहून म्हणाले, “एलीयाचा आत्मा अलीशावर आला आहे.” आणि ते त्यास भेटायला आले. त्यांनी त्यास जमिनीपर्यंत लवून नमन केले. 16 ते त्यास म्हणाले, “आता पाहा, तुझ्या दासाकडे कडे पन्नास धष्टपुष्ट माणसे आहेत. त्यांना जाऊन तुझ्या स्वामीचा शोध घेऊ दे. कदाचित् परमेश्वराच्या आत्म्याने एलीयाला वर नेऊन कोठेतरी डोंगर किंवा दरीमध्ये टाकले असेल.” अलीशा म्हणाला, “नाही, त्यांना पाठवू नका.” 17 पण अलीशाला लाज वाटेपर्यंत संदेष्ट्यांनी आग्रह धरला, तो म्हणाला, “त्यांना पाठवा.” मग त्यांनी पन्नास जणांना पाठवले, आणि त्यांनी एलीयाचा तीन दिवस शोध घेतला, पण ते त्यास शोधू शकले नाही. 18 आणि अलीशा यरीहोत राहत असता, ते त्याच्याकडे परत आले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जाऊ नका, असे मी तुम्हास सांगितले नव्हते काय?” 19 त्या नगरातील माणसे अलीशाला म्हणाली, “पाहा, आम्ही तुला विनंती करतो, या नगराची परिस्थिती आनंददायी आहे, माझ्या स्वामी हे तुम्ही पाहताच आहात, पण इथले पाणी खराब व जमीन नापीक आहे.” 20 अलीशा त्यांना म्हणाला, “एक नवीन पात्र घेऊन या आणि त्यामध्ये मीठ घाला.” तेव्हा त्यांनी ते त्याच्याकडे आणले. 21 अलीशा ते घेऊन त्या झऱ्याच्या उगमापाशी गेला आणि त्यामध्ये ते मीठ टाकून म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ‘आता हे पाणी मी बरे केले आहे. आता यापुढे आणखी मृत्यू किंवा नापिकी आणखी होणार नाही.” 22 अलीशा बोललेल्या वचनाप्रमाणे ते पाणी चांगले झाले व आजपर्यंत ते चांगले आहे. 23 नंतर अलीशा तेथून वर बेथेलास गेला. तो वाटेने वर चालत असता, लहान मुलांनी गावातून निघून त्याची टिंगल करायला सुरुवात केली. ती म्हणाली, “अरे टकल्या वर जा, ए टकल्या, वर जा.” 24 अलीशाने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले आणि परमेश्वराच्या नावाने त्यांना शाप दिला. त्यानंतर दोन अस्वलींनी वनातून बाहेर येऊन त्यांच्यातली बेचाळीस मुले फाडून टाकली. 25 नंतर अलीशा तेथून कर्मेल डोंगराकडे गेला, आणि तिथून तो परत शोमरोनास आला.
Total 25 अध्याय, Selected धडा 2 / 25
×

Alert

×

Marathi Letters Keypad References