मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
2 इतिहास
1. {#1शलमोनाची इतर कामगिरी [BR]1 राजे 9:10-28 } [PS]परमेश्वराचे मंदिर आणि आपले घर बांधायला शलमोनाला वीस वर्षे लागली.
2. मग हिरामाने दिलेली नगरे शलमोनाने वसविली त्या नगरांमध्ये काही इस्राएल लोकांस वस्ती करण्यास मुभा दिली.
3. पुढे शलमोनाने, हमाथ-सोबा हे नगर जिंकून घेतले.
4. वाळवंटातील तदमोर, हे नगरही त्याने वसवले कोठारांसाठी म्हणून त्याने हमाथामधली नगरे बांधली.
5. वरचे बेथ-होरोन आणि खालचे बेथ होरोन यांचीही उभारणीही शलमोनाने केली ती त्याने भक्कम तटबंदीची नगरे केली त्यांना मजबूत कोट, वेशी आणि अडसर करून,
6. बालाथ नगर व अन्य कोठारे असलेली गावे यांची शलमोनाने पुनर्रचना केली. रथ ठेवण्यासाठी तसेच घोडेस्वारांच्या वस्तीसाठीही त्याने गावे वसवली. यरूशलेम, लबानोन व आपल्या आधिपत्याखालील सर्व प्रदेशात शलमोनाने आपल्या गरजेनुसार बांधकामे केली.
7. इस्राएल लोक राहत असलेल्या प्रदेशात अनेक परके लोकही होते. ते म्हणजे हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी त्यांना शलमोनाने वेठबिगार केले.
8. हे लोक मूळचे इस्राएल नव्हते या प्रदेशात राहून गेलेल्या लोकांचे ते वंशज होते आणि इस्राएल लोकांनी त्यांना अजून नष्ट केले नव्हते. ते अजूनही आहेत.
9. इस्राएल लोकांपैकी कोणालाही शलमोनाने वेठबिगारीसाठी सक्ती केली नाही. ते त्याचे योध्दे होते. ते सैन्याधिकारी, रथाधिपती, स्वारांचे अधिकारी असे होते.
10. काही इस्राएली लोक तर शलमोनाच्या अधिकाऱ्यांवर अंमल गाजवणारे होते. असे प्रमुख अधिकारी अडीचशे होते.
11. शलमोनाने फारोच्या कन्येला, तिच्यासाठी बांधलेल्या महालात दावीद नगराहून आणले. शलमोन म्हणाला, “ज्या ज्याठिकाणी परमेश्वराचा करार कोश ठेवण्यात आला, ती सर्व स्थाने पवित्र आहेत, तेव्हा माझ्या पत्नीने इस्राएलचा दावीद याच्या नगरात राहू नेये.”
12. मग शलमोनाने वेदीवर परमेश्वरास होमार्पणे केली. मंदिराच्या प्रवेशमंडपासमोरच शलमोनाने ती वेदी बांधली होती.
13. मोशेच्या आज्ञेप्रमाणे शलमोन रोज होमार्पणे करी शब्बाथाच्या दिवशी, नवचंद्र दर्शनीला, वर्षभरातल्या तीन सणांना होमार्पणे करायची असत. बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण, आणि मंडपाचा सण हे तीन वार्षिक सण होत.
14. आपल्या पित्याच्या सूचना शलमोनाने तंतोतंत पाळल्या परमेश्वराच्या सेवेसाठी त्याने याजकवर्गाच्या नेमणुका केल्या लेवींना त्यांची कामे पार पाडायला नेमले. स्तुतिगीते म्हणणे आणि मंदिराच्या चाकरीतील रोजची सेवाकार्ये बजावण्यात याजकांना मदत करणे ही लेवीची कामे होती. याखेरीज शलमोनाने प्रत्येक प्रवेशद्वाराशी द्वारपालांच्या गटांच्या नेमणुका केल्या. परमेश्वरास मानणाऱ्या दाविदाने अशाच सूचना दिल्या होत्या.
15. याजक आणि लेवी यांना शलमोनाने ज्या सूचना दिल्या त्यामध्ये इस्राएल लोकांनी बदल केला नाही की आज्ञाभंग केला नाही. मौल्यवान वस्तू जतन करण्याविषयीच्या आज्ञांचाही त्यांनी बदल केला नाही.
16. शलमोनाची सगळी कामे सिध्दीस गेली. मंदिराच्या कामाला सुरुवात केल्यापासून ते संपेपर्यंत त्यांचे व्यवस्थित नियोजन केले होते. अशा रीतीने परमेश्वराच्या मंदिराचे काम पूर्ण झाले, व ते उपयोगात आणले जाऊ लागले.
17. यानंतर शलमोन लाल समुद्रानजीकच्या अदोम देशातील एसयोन-गेबेर आणि एलोथ या नगरांत गेला.
18. हिरामाने त्याच्याकडे आपली गलबते पाठवली. समुद्रपर्यटनात तरबेज अशा हिरामाच्या सेवकांनीच ती नेली. शलमोनाच्या चाकरीतील लोकांबरोबर, हे सेवक ओफिर येथे गेले, आणि तेथून चारशे पन्नास किक्कार[* साधारण 15,300 किलोग्राम ] सोने आणून, त्यांनी ते शलमोनाला दिले. [PE]
Total 36 अध्याय, Selected धडा 8 / 36
शलमोनाची इतर कामगिरी
1 राजे 9:10-28

1 परमेश्वराचे मंदिर आणि आपले घर बांधायला शलमोनाला वीस वर्षे लागली. 2 मग हिरामाने दिलेली नगरे शलमोनाने वसविली त्या नगरांमध्ये काही इस्राएल लोकांस वस्ती करण्यास मुभा दिली. 3 पुढे शलमोनाने, हमाथ-सोबा हे नगर जिंकून घेतले. 4 वाळवंटातील तदमोर, हे नगरही त्याने वसवले कोठारांसाठी म्हणून त्याने हमाथामधली नगरे बांधली. 5 वरचे बेथ-होरोन आणि खालचे बेथ होरोन यांचीही उभारणीही शलमोनाने केली ती त्याने भक्कम तटबंदीची नगरे केली त्यांना मजबूत कोट, वेशी आणि अडसर करून, 6 बालाथ नगर व अन्य कोठारे असलेली गावे यांची शलमोनाने पुनर्रचना केली. रथ ठेवण्यासाठी तसेच घोडेस्वारांच्या वस्तीसाठीही त्याने गावे वसवली. यरूशलेम, लबानोन व आपल्या आधिपत्याखालील सर्व प्रदेशात शलमोनाने आपल्या गरजेनुसार बांधकामे केली. 7 इस्राएल लोक राहत असलेल्या प्रदेशात अनेक परके लोकही होते. ते म्हणजे हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी त्यांना शलमोनाने वेठबिगार केले. 8 हे लोक मूळचे इस्राएल नव्हते या प्रदेशात राहून गेलेल्या लोकांचे ते वंशज होते आणि इस्राएल लोकांनी त्यांना अजून नष्ट केले नव्हते. ते अजूनही आहेत. 9 इस्राएल लोकांपैकी कोणालाही शलमोनाने वेठबिगारीसाठी सक्ती केली नाही. ते त्याचे योध्दे होते. ते सैन्याधिकारी, रथाधिपती, स्वारांचे अधिकारी असे होते. 10 काही इस्राएली लोक तर शलमोनाच्या अधिकाऱ्यांवर अंमल गाजवणारे होते. असे प्रमुख अधिकारी अडीचशे होते. 11 शलमोनाने फारोच्या कन्येला, तिच्यासाठी बांधलेल्या महालात दावीद नगराहून आणले. शलमोन म्हणाला, “ज्या ज्याठिकाणी परमेश्वराचा करार कोश ठेवण्यात आला, ती सर्व स्थाने पवित्र आहेत, तेव्हा माझ्या पत्नीने इस्राएलचा दावीद याच्या नगरात राहू नेये.” 12 मग शलमोनाने वेदीवर परमेश्वरास होमार्पणे केली. मंदिराच्या प्रवेशमंडपासमोरच शलमोनाने ती वेदी बांधली होती. 13 मोशेच्या आज्ञेप्रमाणे शलमोन रोज होमार्पणे करी शब्बाथाच्या दिवशी, नवचंद्र दर्शनीला, वर्षभरातल्या तीन सणांना होमार्पणे करायची असत. बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण, आणि मंडपाचा सण हे तीन वार्षिक सण होत. 14 आपल्या पित्याच्या सूचना शलमोनाने तंतोतंत पाळल्या परमेश्वराच्या सेवेसाठी त्याने याजकवर्गाच्या नेमणुका केल्या लेवींना त्यांची कामे पार पाडायला नेमले. स्तुतिगीते म्हणणे आणि मंदिराच्या चाकरीतील रोजची सेवाकार्ये बजावण्यात याजकांना मदत करणे ही लेवीची कामे होती. याखेरीज शलमोनाने प्रत्येक प्रवेशद्वाराशी द्वारपालांच्या गटांच्या नेमणुका केल्या. परमेश्वरास मानणाऱ्या दाविदाने अशाच सूचना दिल्या होत्या. 15 याजक आणि लेवी यांना शलमोनाने ज्या सूचना दिल्या त्यामध्ये इस्राएल लोकांनी बदल केला नाही की आज्ञाभंग केला नाही. मौल्यवान वस्तू जतन करण्याविषयीच्या आज्ञांचाही त्यांनी बदल केला नाही. 16 शलमोनाची सगळी कामे सिध्दीस गेली. मंदिराच्या कामाला सुरुवात केल्यापासून ते संपेपर्यंत त्यांचे व्यवस्थित नियोजन केले होते. अशा रीतीने परमेश्वराच्या मंदिराचे काम पूर्ण झाले, व ते उपयोगात आणले जाऊ लागले. 17 यानंतर शलमोन लाल समुद्रानजीकच्या अदोम देशातील एसयोन-गेबेर आणि एलोथ या नगरांत गेला. 18 हिरामाने त्याच्याकडे आपली गलबते पाठवली. समुद्रपर्यटनात तरबेज अशा हिरामाच्या सेवकांनीच ती नेली. शलमोनाच्या चाकरीतील लोकांबरोबर, हे सेवक ओफिर येथे गेले, आणि तेथून चारशे पन्नास किक्कार* साधारण 15,300 किलोग्राम सोने आणून, त्यांनी ते शलमोनाला दिले.
Total 36 अध्याय, Selected धडा 8 / 36
×

Alert

×

Marathi Letters Keypad References