1. {#1दाविदाने गाइलेले मुक्तीगीत [BR]स्तोत्र. 18:1-50 }
2. [PS]शौल आणि इतर शत्रू यांच्या हातून परमेश्वराने सोडवल्याबद्दल दावीदाने हे स्तुतिगीत म्हटले; [PE][QS]परमेश्वर हा माझा दुर्ग, माझा गड, माझ्या सुरक्षिततेचा आधार. [QE]
3. [QS]“तो माझा देव माझ्या संरक्षणासाठी मी या दुर्गाच्या, [QE][QS]देवाच्या आश्रयाला जातो. [QE][QS]देव म्हणजे माझी संरक्षक ढाल आहे त्याचे सामर्थ्य माझे रक्षण करते. [QE][QS]परमेश्वर म्हणजे माझी लपण्याची जागा, [QE][QS]माझ्या सुरक्षिततेचे ठिकाण उंच डोंगरात असलेले. [QE][QS]क्रूर शत्रूपासून तो मला वाचवतो. [QE]
4. [QS]त्यांनी माझी चेष्टा केली, पण मी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला, [QE][QS]आणि शत्रूपासून माझा बचाव करण्यात आला. [QE]
5. [QS]शत्रूंना माझा जीव घ्यायचा होता. [QE][QS]मृत्यूच्या लाटा माझ्याभोवती थैमान घालत होत्या. [QE][QS]मृत्युसदनाला नेणाऱ्या पुराच्या लोंढ्यात मी सापडलो होतो. [QE]
6. [QS]अधोलोकाचे [* मृत्युलोकाचे ]पाश माझ्या भोवती आवळले होते. [QE][QS]मृत्यूचा सापळा माझ्यासमोर तयार होता. [QE]
7. [QS]तेव्हा मी परमेश्वराचा धावा केला. होय, [QE][QS]मी त्यालाच शरण गेलो देव त्याच्या मंदिरात होता त्याने माझा धावा ऐकला. [QE][QS]मदतीसाठी केलेला माझा आक्रोश त्याने ऐकला. [QE]
8. [QS]तेव्हा धरती डळमळली हादरली स्वर्गाचा पाया थरथरला, [QE][QS]कारण देवाचा कोप झाला होता. [QE]
9. [QS]त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता. [QE][QS]मुखातून अग्नीज्वाला बाहेर पडत होत्या ठिणग्या बरसत होत्या. [QE]
10. [QS]आकाश फाडून परमेश्वर खाली अवतरला. [QE][QS]काळ्याभोर ढगावर उभा राहिला. [QE]
11. [QS]करुबावर आरुढ होऊन तो उडत होता. [QE][QS]तो वाऱ्यावर स्वार झाला होता. [QE]
12. [QS]परमेश्वराने दाट काळे ढग स्वत:भोवती तंबू सारखे वेढून घेतले होते. [QE][QS]त्याने त्या दाट गडगडणाऱ्या मेघामध्ये पाणी भरून ठेवले होते. [QE]
13. [QS]त्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला की, [QE][QS]निखारे धगधगू लागले. [QE]
14. [QS]परमेश्वर आकाशातून गरजला. [QE][QS]त्याचा आवाज सर्वत्र दुमदुमला. [QE]
15. [QS]त्याने विजांचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली. [QE][QS]परमेश्वराने विजा पाठवल्या आणि लोक भीतीने सैरावैरा पळाले. [QE]
16. [QS]परमेश्वरा, तुझ्या धमकीच्या आवाजात तू बोललास तेव्हा तुझ्या नाकपुड्यातील सोसाट्याच्या श्वासाने समुद्राचे पाणीही मागे हटले. [QE][QS]समुद्राचा तळ दिसू लागला, पृथ्वीचा पाया उघडा पडला. [QE]
17. [QS]मला परमेश्वराने आधार दिला, वरून तो खाली आला. [QE][QS]मला धरून त्याने संकटाच्या खोल पाण्यातून बाहेर काढले. [QE]
18. [QS]शत्रू मला वरचढ होता. त्यांना माझा मत्सर वाटला. शत्रू बलाढ्य होता. [QE][QS]पण परमेश्वराने मला वाचवले. [QE]
19. [QS]मी अडचणीत होतो तेव्हा शत्रूने माझ्यावर हल्ला केला. [QE][QS]पण परमेश्वराने मला आधार दिला. [QE]
20. [QS]परमेश्वराचा माझ्यावर लोभ आहे, म्हणून त्याने मला सोडवले. [QE][QS]मला त्याने सुरक्षित स्थळी नेले. [QE]
21. [QS]मी केले त्याचे फळ परमेश्वर मला देईल, कारण मी योग्य तेच केले. [QE][QS]मी गैर काही केले नाही, तेव्हा त्याचे चांगले फळ तो मला देईल. [QE]
22. [QS]कारण मी परमेश्वराचे आज्ञापालन केले. देवाविरुध्द कोणताही अपराध मी केला नाही. [QE]
23. [QS]परमेश्वराचे निर्णय मी नेहमी ध्यानात ठेवतो. त्याच्या नियमांचे पालन करतो. [QE]
24. [QS]मी त्याच्याशी निर्दोषतेने वागत असे, आणि मी [QE][QS]अधर्मापासून स्वत:ला अलिप्त राखले. [QE]
25. [QS]तेव्हा परमेश्वर त्याचे फळ मला देणारच. कारण माझी वर्तणूक योग्य आहे. [QE][QS]त्याच्या दृष्टीने मी वावगे केलेले नाही. तेव्हा तो माझे भले करील. [QE]
26. [QS]एखाद्याचे आपल्यावर खरे प्रेम असेल तर आपणही त्याची भरपाई खऱ्या प्रेमाने करू. [QE][QS]तो आपल्याशी प्रामाणिक असेल तर आपणही प्रामाणिक राहू. [QE]
27. [QS]हे परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुध्द आचरणाचे आहेत त्यांच्याशी तूही तसाच वागतोस. [QE][QS]पण दुष्ट आणि कुटिलांशी तू ही कुटिलतेने वागतोस. [QE]
28. [QS]परमेश्वरा, दीनांना तू मदत करतोस, गर्विष्ठांना धडा शिकवतोस. [QE]
29. [QS]परमेश्वरा, तू माझा दीप आहेस. [QE][QS]माझ्या भोवतीचा अंधकार तू उजळवून टाकतोस. [QE]
30. [QS]परमेश्वरा, तुझ्या मदतीनेच मी सैन्यावर चाल करू शकतो. [QE][QS]देवाच्या मदतीनेच मी शत्रूंची भिंतसुध्दा पार करू शकतो. [QE]
31. [QS]देवाची सत्ता सर्वकष आहे. परमेश्वराचे वचन कसोटीला उतरलेले आहे. [QE][QS]त्याच्यावर भरवसा टाकणाऱ्या, सर्वांची तो ढाल आहे. [QE]
32. [QS]या परमेश्वरा खेरीज दुसरा देव कोणता? [QE][QS]याच्याखेरीज भक्कम दुर्ग कोण? [QE]
33. [QS]देव माझा मजबूत दुर्ग आहे. [QE][QS]सात्विक लोकांस तो आपल्या मार्गाने नेतो. [QE]
34. [QS]देव मला हरणासारखे वेगाने पळण्यास मदत करतो. तो मला आत्मविश्वास देतो. [QE][QS]उच्च स्थानावर तो मला अढळ ठेवतो. [QE]
35. [QS]युध्दकलेत तो मला तरबेज बनवतो. [QE][QS]त्यामुळे माझे बाहू भक्कम धनुष्याने शिरसंधान करू शकतात. [QE]
36. [QS]देवा, तूच मला वाचवलेस आणि जिंकायला मदत केलीस. [QE][QS]शत्रूचा पाडाव करण्यात मला हात दिलास. [QE]
37. [QS]माझ्या पायांत बळ दे, [QE][QS]म्हणजे मी न अडखळता ताठ चालू शकेन. [QE]
38. [QS]शत्रूंचा नि:पात होईपर्यंत मला त्यांचा पाठलाग करायचा आहे. [QE][QS]त्यांचा उच्छेद होई पर्यंत मी परतणार नाही. [QE]
39. [QS]त्यांचा मी नाश केला. त्यांचा पराभव केला. आता ते शत्रू डोके वर काढू शकणार नाहीत. [QE][QS]होय, ते माझ्या पायदळी तुडवले गेले. [QE]
40. [QS]देवा, युध्दात तू मला वरचढ केलेस. [QE][QS]शत्रूचा पाडाव केलास. [QE]
41. [QS]त्यांना मला पाठ दाखवायला लावलेस, [QE][QS]म्हणून मी त्यांच्यावर वार करू शकलो. [QE]
42. [QS]शत्रू मदतीसाठी याचना करू लागले. [QE][QS]पण कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. [QE][QS]त्यांनी परमेश्वराचा धावाही केला त्यानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली. [QE]
43. [QS]माझ्या शत्रूची मी खांडोळी केली. [QE][QS]जमिनीवरच्या धुळीसारखा त्यांचा मी भुगा केला. [QE][QS]चिखल तुडवावा तसे मी त्यांना तुडवले. [QE]
44. [QS]माझ्यावर जे चाल करून आले त्यांच्यापासून तू मला संरक्षण दिलेस. [QE][QS]त्यांच्यावर राज्यकर्ता म्हणून मला नेमलेस. [QE][QS]ज्यांना मी कधी बघितले नव्हते ती राष्ट्रे माझे दास झाली. [QE]
45. [QS]आता दूर देशचे लोक माझे ऐकतात [QE][QS]जेव्हा ते माझी आज्ञा ऐकतात, तात्काळ माझा शब्द मानतात. [QE][QS]माझा त्यांना धाक वाटतो. [QE]
46. [QS]भीतीने ते गर्भगळीत होतात. [QE][QS]हे परदेशी लोक जिथे लपून बसले होते, [QE][QS]ती जागा सोडून भीतीने थरथर कापत बाहेर येतात. [QE]
47. [QS]परमेश्वर जिवंत आहे. [QE][QS]माझ्या दुर्गाची मी स्तुती करतो देव महान आहे. [QE][QS]तो माझा रक्षणकर्ता दुर्ग आहे. [QE]
48. [QS]या देवानेच माझ्या शत्रूंना धडा शिकवला. [QE][QS]लोकांस माझ्या शासनामध्ये ठेवले. [QE]
49. [QS]देवा, तू माझे वैऱ्यांपासून रक्षण केलेस. [QE][QS]मला विरोध करणाऱ्यांचा पाडाव करण्याचे सामर्थ्य मला दिलेस. [QE][QS]दुष्टांपासून मला वाचवलेस. [QE]
50. [QS]हे परमेश्वरा, म्हणून मी राष्ट्राराष्ट्रांमध्ये आभारपूर्वक तुझी स्तुतिस्तोत्रे गाईन. [QE][QS]तुझे नामसंकीर्तन करीन. [QE]
51. [QS]परमेश्वर राजाला युध्दात विजयी करतो. [QE][QS]आपल्या अभिषिक्त राजाबद्दल परमेश्वर खरे प्रेम दाखवतो. [QE][QS]दावीद आणि त्याचे वंशज यांचे तो निरंतर कल्याण करील.” [QE]