मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
प्रेषितांचीं कृत्यें
1. {यहूद्यांबरोबर पौलाने केलेले भाषण} [PS] बंधुजनहो व वडील मंडळींनो, मी जे काही आता तुम्हास प्रत्युत्तर करतो ते ऐका.
2. तो आपणाबरोबर इब्री भाषेत बोलत आहे हे ऐकून ते अधिक शांत झाले, मग त्याने म्हटले. [PE][PS]
3. मी यहूदी आहे, माझा जन्म किलकीयातील तार्स नगरांत झाला आणि मी या शहरांत गमलियेलच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडीलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो.
4. पुरूष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालू देहान्त शिक्षा देऊन सुद्धा मी ‘या मार्गाचा’ पाठलाग केला.
5. त्याविषयी महायाजक व सगळा वडिलवर्गही माझा साक्षी आहे; मी त्यांच्यापासून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्कास चाललो होतो; ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरूशलेम शहरात शासन करावयास आणावे.
6. मग असे झाले की, जाता जाता मी दिमिष्क शहराजवळ पोहचलो तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला.
7. तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि “शौला, शौला, माझा छळ का करितोस?” अशी वाणी माझ्याबरोबर मी बोलताना ऐकली.
8. मी विचारले, प्रभूजी, तू कोण आहेस? त्याने मला म्हटले, “ज्या नासोरी येशूचा तू छळ करितोस तोच मी आहे.”
9. तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही.
10. मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे? प्रभूने मला म्हटले, “उठून दिमिष्कात जा; मग तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे, त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.”
11. त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले; म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिष्कात नेले. [PE][PS]
12. मग हनन्या नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता आणि तेथे राहणारे सर्व यहूदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत.
13. तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, शौल भाऊ, इकडे पहा, तत्क्षणीच मी त्याच्याकडे वर पाहिले.
14. मग तो म्हणाला आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे; आणि त्या नीतिमान पुरुषाला पहावे व त्याच्या तोंडाची वाणी ऐकावी.
15. कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील.
16. तर आता उशीर का करितोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर. [PE][PS]
17. मग असे झाले की, मी यरूशलेमे शहरास माघारी आल्यावर, परमेश्वराच्या भवनात प्रार्थना करीत असता माझे देहभान सुटले.
18. तेव्हा मी त्यास पाहिले; तो मला म्हणाला, “त्वरा कर, यरूशलेम शहरातून लवकर निघून जा; कारण तू माझ्याविषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाहीत.”
19. तेव्हा मी म्हणालो, प्रभू, त्यांना ठाऊक आहे की, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्याना मी बंदीत टाकून प्रत्येक सभास्थानात त्यांना मारहाण करीत असे.
20. तुझा साक्षी स्तेफन याचा रक्तपात झाला तेव्हा मी स्वतः जवळ उभा राहून मान्यता दर्शवित होतो आणि त्याचा घात करणाऱ्याची वस्त्रे सांभाळीत होतो.
21. तेव्हा त्याने मला सांगितले, “जा मी तुला मी परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.” [PS]
22. {रोमन नागरिक म्हणून असलेल्या पौलाचा हक्क} [PS] या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले; मग ते आरोळी मारून बोलले, जगातून ह्याला नाहीसे करा, याची जगण्याची लायकी नाही.
23. ते ओरडत व आपली बाह्यवस्त्रे अंगावरून काढून टाकून आकाशात धूळ उधळीत असता.
24. सरदाराने शिपायांना सांगितले, पौलाला चाबकाने मारा, अशाप्रकारे हे लोक पौलाविरुद्ध का ओरड करीत आहेत हे सरादाराला जाणून घ्यायचे होते.
25. मग त्यांनी त्यास वाद्यांनी ताणले, तेव्हा जवळ उभ्या असलेल्या शताधीपतीला पौलाने म्हटले, “रोमन मनुष्यास व ज्याला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?”
26. हे एकूण शताधीपतीने सरदाराजवळ जाऊन म्हटले, आपण हे काय करीत आहा? तो मनुष्य रोमन आहे.
27. तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “मला सांग, तू रोमन आहेस काय?” त्याने म्हटले, “होय.”
28. सरदाराने उत्तर दिले, “मी हा नागरिकपणाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमन आहे.”
29. ह्यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले; शिवाय हा रोमन आहे असे सरदाराला कळले तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्यास बांधिले होते. [PS]
30. {सन्हेंद्रिन सभेपुढे पौलाचे आत्मसमर्पण} [PS] यहूदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते, म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने त्यास मोकळे केले आणि मुख्य याजक लोक व सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकुम करून पौलाला खाली आणून त्याच्यापुढे उभे केले. [PE]

Notes

No Verse Added

Total 28 Chapters, Current Chapter 22 of Total Chapters 28
प्रेषितांचीं कृत्यें 22:26
1. {यहूद्यांबरोबर पौलाने केलेले भाषण} PS बंधुजनहो वडील मंडळींनो, मी जे काही आता तुम्हास प्रत्युत्तर करतो ते ऐका.
2. तो आपणाबरोबर इब्री भाषेत बोलत आहे हे ऐकून ते अधिक शांत झाले, मग त्याने म्हटले. PEPS
3. मी यहूदी आहे, माझा जन्म किलकीयातील तार्स नगरांत झाला आणि मी या शहरांत गमलियेलच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडीलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो.
4. पुरूष स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालू देहान्त शिक्षा देऊन सुद्धा मी ‘या मार्गाचा’ पाठलाग केला.
5. त्याविषयी महायाजक सगळा वडिलवर्गही माझा साक्षी आहे; मी त्यांच्यापासून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्कास चाललो होतो; ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरूशलेम शहरात शासन करावयास आणावे.
6. मग असे झाले की, जाता जाता मी दिमिष्क शहराजवळ पोहचलो तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला.
7. तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि “शौला, शौला, माझा छळ का करितोस?” अशी वाणी माझ्याबरोबर मी बोलताना ऐकली.
8. मी विचारले, प्रभूजी, तू कोण आहेस? त्याने मला म्हटले, “ज्या नासोरी येशूचा तू छळ करितोस तोच मी आहे.”
9. तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही.
10. मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे? प्रभूने मला म्हटले, “उठून दिमिष्कात जा; मग तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे, त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.”
11. त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले; म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिष्कात नेले. PEPS
12. मग हनन्या नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता आणि तेथे राहणारे सर्व यहूदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत.
13. तो माझ्याकडे आला जवळ उभा राहून मला म्हणाला, शौल भाऊ, इकडे पहा, तत्क्षणीच मी त्याच्याकडे वर पाहिले.
14. मग तो म्हणाला आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे; आणि त्या नीतिमान पुरुषाला पहावे त्याच्या तोंडाची वाणी ऐकावी.
15. कारण जे तू पाहिले आहे ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील.
16. तर आता उशीर का करितोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर. PEPS
17. मग असे झाले की, मी यरूशलेमे शहरास माघारी आल्यावर, परमेश्वराच्या भवनात प्रार्थना करीत असता माझे देहभान सुटले.
18. तेव्हा मी त्यास पाहिले; तो मला म्हणाला, “त्वरा कर, यरूशलेम शहरातून लवकर निघून जा; कारण तू माझ्याविषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाहीत.”
19. तेव्हा मी म्हणालो, प्रभू, त्यांना ठाऊक आहे की, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्याना मी बंदीत टाकून प्रत्येक सभास्थानात त्यांना मारहाण करीत असे.
20. तुझा साक्षी स्तेफन याचा रक्तपात झाला तेव्हा मी स्वतः जवळ उभा राहून मान्यता दर्शवित होतो आणि त्याचा घात करणाऱ्याची वस्त्रे सांभाळीत होतो.
21. तेव्हा त्याने मला सांगितले, “जा मी तुला मी परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.” PS
22. {रोमन नागरिक म्हणून असलेल्या पौलाचा हक्क} PS या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले; मग ते आरोळी मारून बोलले, जगातून ह्याला नाहीसे करा, याची जगण्याची लायकी नाही.
23. ते ओरडत आपली बाह्यवस्त्रे अंगावरून काढून टाकून आकाशात धूळ उधळीत असता.
24. सरदाराने शिपायांना सांगितले, पौलाला चाबकाने मारा, अशाप्रकारे हे लोक पौलाविरुद्ध का ओरड करीत आहेत हे सरादाराला जाणून घ्यायचे होते.
25. मग त्यांनी त्यास वाद्यांनी ताणले, तेव्हा जवळ उभ्या असलेल्या शताधीपतीला पौलाने म्हटले, “रोमन मनुष्यास ज्याला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?”
26. हे एकूण शताधीपतीने सरदाराजवळ जाऊन म्हटले, आपण हे काय करीत आहा? तो मनुष्य रोमन आहे.
27. तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “मला सांग, तू रोमन आहेस काय?” त्याने म्हटले, “होय.”
28. सरदाराने उत्तर दिले, “मी हा नागरिकपणाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमन आहे.”
29. ह्यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले; शिवाय हा रोमन आहे असे सरदाराला कळले तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्यास बांधिले होते. PS
30. {सन्हेंद्रिन सभेपुढे पौलाचे आत्मसमर्पण} PS यहूदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते, म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने त्यास मोकळे केले आणि मुख्य याजक लोक सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकुम करून पौलाला खाली आणून त्याच्यापुढे उभे केले. PE
Total 28 Chapters, Current Chapter 22 of Total Chapters 28
×

Alert

×

marathi Letters Keypad References