1. {न्यायसभेपुढे पेत्र व योहान} PS पेत्र आणि योहान लोकांशी बोलत असता, याजक परमेश्वराच्या भवनाची रखवाली करणाऱ्यांच्या सरदार व सदूकी हे त्यांच्यावर चालून आले.
|
2. कारण ते लोकांस शिक्षण देऊन येशूच्या द्वारे पुनरुत्थान असे उघडपणे सांगत होते म्हणून त्यांना फार संताप आला.
|
3. तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली व आता संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना बंदिशाळेत ठेवले.
|
4. तरी वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळांनी विश्वास ठेवला; आणि विश्वास ठेवलेल्या पुरूषांची संख्या सुमारे पाच हजार होती. PEPS
|
5. मग दुसऱ्या दिवशी असे झाले, की त्यांचे अधिकारी, वडील व नियमशास्त्र शिक्षक हे यरूशलेम शहरात एकत्र जमले.
|
7. त्यांनी पेत्र व योहानाला मध्ये उभे करून विचारले, “हे तुम्ही कोणत्या सामर्थ्याने, किंवा कोणत्या नावाने केले?”
|
8. तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण झालेला असता, त्यांना म्हणाला, “अहो लोकांच्या अधिकाऱ्यांनो, आणि वडिलांनो,
|
10. तर तुम्हा सर्वास व सर्व इस्राएल लोकांस हे माहित असावे, की ज्याला तुम्ही वधस्तंभी दिले, ज्याला देवाने मरण पावलेल्यामधून उठवले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने, हा मनुष्य बरा होऊन येथे तुमच्यापुढे उभा राहिला आहे.
|
12. आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल; असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.”
|
13. तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, आणि ही निरक्षर व अशिक्षित माणसे आहेत, हे जाणून त्यांनी आश्चर्य केले, आणि हे येशूच्या संगतीत होते असे त्यांनी ओळखले.
|
14. तेव्हा तो बरा झालेला मनुष्य त्यांच्याजवळ उभा असलेला पाहून, यहूदी पुढाऱ्यांना त्यांच्याविरुद्ध काही बोलता येईना.
|
16. ते म्हणाले, “या मनुष्यांस आपण काय करावे? कारण खरोखर यांच्याकडून प्रसिद्ध चमत्कार घडला आहे यरूशलेम शहरात राहणाऱ्या सर्वास माहित आहे; व ते आपण नाकारू शकत नाही.
|
17. परंतु हे लोकांमध्ये अधिक पसरू नये, म्हणून आपण त्यांना अशी धमकी द्यावी की, यापुढे तुम्ही या नावाने कोणाशीही बोलू नये.”
|
18. मग त्यांनी पेत्र व योहानला बोलावून आज्ञा केली की तुम्ही येशूच्या नावाने मुळीच बोलू नका व शिकवूही नका.
|
19. परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर देऊन म्हटले, “देवापेक्षा तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे, हे तुम्हीच ठरवा.
|
21. तेव्हा त्यांनी त्यांना आणखी धमकावून सोडून दिले, कारण लोकांमुळे त्यांना शिक्षा कशी करावी. हे त्यांना काहीच सुचेना, कारण घडलेल्या गोष्टीवरून सर्व लोक देवाचे गौरव करीत होते.
|
23. {पेत्र व योहान आपल्या मित्रांकडे परत येतात} PS तेव्हा त्यांची सुटका झाल्यानंतर, ते आपल्या लोकांकडे आले आणि मुख्य याजकांनी व वडिलांनी जे काही म्हणले होते ते सर्व त्यांनी सांगितले.
|
24. ते ऐकून ते एकचित्त होऊन देवाला उच्च वाणीने म्हणाले, “हे प्रभू, आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्वकाही ज्याने निर्माण केले तो तूच आहे.
|
25. तुझा सेवक, आमचा पूर्वज दावीद, याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्याद्वारे तू म्हटले, ‘राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ कल्पना का केल्या?
|
27. कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र सेवक, येशू, ह्याच्याविरुद्ध या नगरात परराष्ट्रीय व इस्राएली लोक यांच्याबरोबर हेरोद व पंतय पिलात एकत्र झाले.
|
28. यासाठी की जे काही घडावे म्हणून तुझ्या हाताने व तुझ्या इच्छेने पूर्वी नेमले होते ते त्यांनी करावे.
|
29. तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा आणि तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन बोलावे असे दान दे.
|
30. तू आपला हात लोकांस निरोगी करण्यास पुढे करीत असता असे कर तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चमत्कार व अद्भूते घडावी असे ही कर.”
|
31. आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते एकत्र जमले होते ती हालली, आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन, देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. PS
|
32. {समाईक निधी} PS तेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांचा समुदाय एक मनाचा व एकजिवाचा होता: आणि कोणीही आपल्या मालमत्तेतील काही आपले स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व पदार्थ सामाईक होते.
|
33. आणि प्रेषित मोठ्या सामर्थ्याने, प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते, आणि त्या सर्वावर मोठी कृपा होती.
|
34. त्यांतील कोणालाही काही उणे नव्हते, कारण जितके जमिनीचे किंवा घरांचे मालक होते तितक्यांनी ती विकली आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणले.
|
35. आणि ते प्रेषितांच्या पायाशी ठेवले, मग जसजशी कोणाला गरज लागत असे, तसतसे ते प्रत्येकाला वाटून देत असत. PEPS
|
36. आणि कुप्र बेटाचा रहिवासी लेवी योसेफ, ज्याला प्रेषितांनी बर्णबा, म्हणजे उत्तेजन पुत्र असे नाव दिले होती.
|