1. {#1परमेश्वराच्या न्यायापासून सुटका अशक्य } [PS]मी प्रभूला वेदीजवळ उभे असलेले पाहिले, आणि तो म्हणाला, [PE][QS]“खांबांच्या माथ्यावर मार, म्हणजे इमारत अगदी उंबऱ्यापासून हादरेल. [QE][QS]आणि त्यांच्या डोक्यावर मारून त्याचे तुकडे कर. [QE][QS]कोणी जिवंत राहिल्यास, [QE][QS]मी त्यास तलवारीने ठार मारीन. [QE][QS]त्यांच्यातल्या एकालाही पळून जाता येणार नाही, [QE][QS]आणि त्यांच्यातल्या एकालाही सुटता येणार नाही. [QE]
2. [QS]ते खणून मृतलोकांत जरी गेले, तरी माझा हात त्यांना तेथून ओढून काढीन. [QE][QS]ते आकाशात उंच चढून गेले, [QE][QS]तरी मी त्यांना तेथून खाली आणीन. [QE]
3. [QS]ते जरी कर्मेल पर्वताच्या शिखरावर लपले, [QE][QS]तरी तेथून मी त्यांना शोधून काढीन. [QE][QS]त्यांनी जरी माझ्यापासून लपून समुद्राचा तळ गाठला, [QE][QS]तर मी सापाला आज्ञा करीन व तो त्यांना चावेल. [QE]
4. [QS]ते जरी आपल्या वैऱ्यांपुढे पाडावपणात गेले, [QE][QS]तर तेथून मी तलवारीला आज्ञा करीन आणि ती त्यांना ठार मारील. [QE][QS]मी आपले डोळे त्यांच्याकडे चांगल्यासाठी नव्हे, [QE][QS]तर त्यांना त्रास कसा होईल या करीता लावीन.” [QE]
5. [QS]आणि ज्याने भूमीला स्पर्श केला म्हणजे ती वितळते, [QE][QS]आणि त्यामध्ये राहणारे सर्व शोक करतात, [QE][QS]तो प्रभू, सैन्यांचा परमेश्वर आहे, [QE][QS]आणि त्यातील सर्व नदीप्रमाणे उठणार [QE][QS]व मिसरच्या नदीप्रमाणे पुन्हा बुडणार. [QE]
6. [QS]ज्याने आकाशामध्ये आपल्या माड्या बांधल्या, [QE][QS]आणि आपला घुमट पृथ्वीत स्थापिला आहे, [QE][QS]जो समुद्राच्या पाण्याला बोलवून पृथ्वीच्या पाठीवर ओततो, [QE][QS]त्याचे नाव परमेश्वर आहे. [QE]
7. [QS]परमेश्वर असे म्हणतो: [QE][QS]“इस्राएलाचे लोकहो, [QE][QS]तुम्ही मला कूशी लोकांप्रमाणे नाही काय? [QE][QS]मी इस्राएलाला मिसर देशातून पलिष्ट्यांना कफतोरमधून आणि अरामींना कीर मधून आणले नाही काय?” [QE]
8. [QS]पाहा, प्रभू परमेश्वराचे डोळे पापी राज्यावर आहे, [QE][QS]आणि मी ते पृथ्वीच्या पाठीवरून नष्ट करीन, [QE][QS]पण याकोबाच्या घराण्याचा मी संपूर्ण नाश करणार नाही. [QE]
9. [QS]“पाहा, मी आज्ञा करीन, [QE][QS]धान्य चाळण्यासारखे मी इस्राएलाच्या घराण्याला सर्व राष्ट्रांमध्ये चाळीन, [QE][QS]व त्यातील लहान अशी कणी देखील भूमीवर पडणार नाही.” [QE]
10. [QS]माझ्या लोकांतील पापी जे असे म्हणतात, [QE][QS]“आमचे काही वाईट होणार नाही किंवा ते आम्हास आडवेही येणार नाही. [QE][QS]ते सर्व तलवारीने मारतील.” [QE]
11. {#1इस्त्राएलाचा भावी उद्धार } [QS]त्या दिवशी दाविदचा मंडप जो पडला आहे, [QE][QS]मी तो पुन्हा उभारीन. [QE][QS]मी त्यांच्या भिंतीतील भगदाडे बुजवीन आणि जे उद्ध्वस्त झोलेले आहे, [QE][QS]ते मी पुन्हा बांधीन. [QE][QS]मी त्या पुरातन दिवसात होत्या, तशाच पुन्हा बांधीन. [QE]
12. [QS]“ह्यासाठी की त्यांनी अदोमाच्या उरलेल्यांना, [QE][QS]आणि ज्या राष्ट्रांना माझे नाव ठेवले आहे, [QE][QS]त्या सर्व राष्ट्रांना, आपल्या ताब्यात घ्यावे.” [QE][QS]परमेश्वर जो हे करतो तो असे म्हणतो. [QE]
13. [QS]परमेश्वर म्हणतो, “असे दिवस येत आहेत की,” [QE][QS]नांगरणी करणारा कापणी करणाऱ्याला, [QE][QS]द्राक्षे तुडविणारा बी पेरणाऱ्याला, गाठील. [QE][QS]आणि पर्वत गोड द्राक्षरस गळू देतील आणि सर्व टेकड्या पाझरतील. [QE]
14. [QS]मी माझ्या लोकांस, इस्राएलाला, [QE][QS]कैदेतून सोडवून परत आणीन, [QE][QS]ते उद्ध्वस्त झालेली गावे पुन्हा बांधतील, [QE][QS]आणि त्यामध्ये वस्ती करतील. [QE][QS]ते द्राक्षांचे मळे लावतील. [QE][QS]आणि त्यापासून मिळणारा द्राक्षरस पितील. [QE][QS]ते बागा लावतील व त्यापासून मिळणारे पीक खातील. [QE]
15. [QS]मी त्यांना त्यांच्या देशात रुजवीन [QE][QS]आणि मी त्यांना दिलेल्या भूमीतून ते पुन्हा उपटले जाणार नाहीत. [QE][QS]परमेश्वर तुझा देव असे म्हणतो.[QE]