मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
अनुवाद
1. {#1याजक आणि लेवी ह्यांचे वाटे } [PS]लेवी याजकाला म्हणजे लेव्यांच्या सर्व वंशातील लोकांस इस्राएलमध्ये जमिनीत वाटा किंवा वतन मिळणार नाही. ते याजक म्हणून काम करतील. परमेश्वरासाठी अर्पण केलेल्या बलींवर त्यांनी निर्वाह करावा. तोच त्यांचा वाटा.
2. त्यांच्या इतर भाऊबंदाप्रमाणे लेवींना जमिनीत वतन नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे खुद्द परमेश्वरच त्यांचे वतन होय.
3. यज्ञासाठी गोऱ्हा किंवा मेंढरू मारताना त्या जनावराचा खांद्याचा भाग, गालफडे व कोथळा याजकाला द्यावा.
4. धान्य, नवीन द्राक्षरस व तेल या आपल्या उत्पन्नातील पहिला वाटाही त्यांना द्यावा. तसेच मेंढरांची पहिल्यांदा कातरलेली लोकरही लेवींना द्यावी.
5. कारण तुम्हा सर्वांमधून लेवी व त्याच्या वंशजांना तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या निरंतर सेवेसाठी निवडून घेतले आहे.
6. प्रत्येक लेवीच्या मंदिरातील सेवेच्या ठराविक वेळा असतील. पण दुसऱ्या कुठल्या वेळेला त्यास काम करायचे असल्यास तो करु शकतो. इस्राएलमध्ये कोणत्याही नगरात राहणारा कोणीही लेवी घर सोडून परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी येऊ शकतो. हे केव्हाही करायची त्यास मुभा आहे.
7. परमेश्वराची सेवा करणाऱ्या आपल्या सर्व लेवीय बांधवांप्रमाणे त्यानेही तेथे सेवा करावी.
8. त्यास इतरांप्रमाणेच वाटा मिळेल. शिवाय आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात त्याचा वाटा असेलच. [PE]
9. {#1परराष्ट्रीयांच्या रीतीरिवाजांविरुद्ध ताकीद } [PS]तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या ठिकाणी राहायला जाल तेव्हा तिकडच्या राष्ट्रांतील लोकांप्रमाणे भयंकर कृत्ये करु नका.
10. आपल्या पोटच्या मुलाबाळांचा वेदीवर बली देऊ नका. ज्योतिषी, चेटूक करणारा, शकुनमुहर्त पाहणारा, मांत्रिक यांच्या नादी लागू नका.
11. वशीकरण करणाऱ्याला थारा देऊ नका. तुमच्यापैकी कोणीमध्यस्थ, मांत्रिक बनू नये. मृतात्म्याशी विचारणारा असू नये.
12. अशा गोष्टी करणाऱ्यांचा तुमचा देव परमेश्वर ह्याला तिरस्कार आहे. म्हणून तर तो इतर राष्ट्रांना तुमच्या वाटेतून घालवून देईल.
13. तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशीच पूर्णपणे विश्वासू असा.
14. इतर राष्ट्रांना आपल्या भूमीतून हुसकावून लावा. ते लोक ज्योतिषी, चेटूक करणारे अशांच्या नादी लागणारे आहेत. पण तुमचा देव परमेश्वर तुम्हास तसे करु देणार नाही. [PE]
15. {#1मोशेसारखा दुसरा संदेष्टा देण्याचे परमेश्वराचे वचन } [PS]परमेश्वर तुमच्यासाठी संदेष्ट्याला पाठवील. तुमच्यामधूनच तो उदयाला येईल. तो माझ्यासारखा असेल. त्याचे तुम्ही ऐका.
16. तुमच्या सांगण्यावरुनच देव असे करत आहे. होरेब पर्वताशी तुम्ही सर्व जमलेले असताना तुम्हास या पर्वतावरील अग्नीची आणि देववाणीची भीती वाटली होती. तेव्हा तुम्ही म्हणालात, पुन्हा हा आमचा देव परमेश्वर ह्याचा आवाज आमच्या कानी न पडो. तसा अग्नीही पुन्हा दृष्टीस न पडो, नाहीतर खचितच आम्ही मरु.
17. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, यांचे म्हणणे ठीकच आहे.
18. मी यांच्यामधूनच तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन. माझी वचने त्याच्या मुखाने ऐकवीन. माझ्या आज्ञेप्रमाणे तो लोकांशी बोलेल.
19. हा संदेष्टा माझ्या वतीने बोलेल. तेव्हा जो कोणी ते ऐकणार नाही त्यास मी शासन करीन.
20. पण हा संदेष्टा मी न सांगितलेले ही काही माझ्या वतीने बोलला, तर त्यास मृत्युदंड दिला पाहिजे. इतर दैवतांच्या वतीने बोलणारा संदेष्टाही कदाचित उदयास येईल. त्यालाही ठार मारले पाहिजे.
21. तुम्ही म्हणाल की अमुक वचन परमेश्वराचे नव्हे हे आम्हास कसे कळणार?
22. तर, परमेश्वराच्या वतीने म्हणून तो संदेष्टा काही बोलला व ते प्रत्यक्षात घडले नाहीतर समजा की ते परमेश्वराचे बोलणे नव्हते, तर तो संदेष्टा स्वत:चेच विचार बोलून दाखवत होता. त्यास तुम्ही घाबरायचे कारण नाही. [PE]
Total 34 अध्याय, Selected धडा 18 / 34
याजक आणि लेवी ह्यांचे वाटे 1 लेवी याजकाला म्हणजे लेव्यांच्या सर्व वंशातील लोकांस इस्राएलमध्ये जमिनीत वाटा किंवा वतन मिळणार नाही. ते याजक म्हणून काम करतील. परमेश्वरासाठी अर्पण केलेल्या बलींवर त्यांनी निर्वाह करावा. तोच त्यांचा वाटा. 2 त्यांच्या इतर भाऊबंदाप्रमाणे लेवींना जमिनीत वतन नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे खुद्द परमेश्वरच त्यांचे वतन होय. 3 यज्ञासाठी गोऱ्हा किंवा मेंढरू मारताना त्या जनावराचा खांद्याचा भाग, गालफडे व कोथळा याजकाला द्यावा. 4 धान्य, नवीन द्राक्षरस व तेल या आपल्या उत्पन्नातील पहिला वाटाही त्यांना द्यावा. तसेच मेंढरांची पहिल्यांदा कातरलेली लोकरही लेवींना द्यावी. 5 कारण तुम्हा सर्वांमधून लेवी व त्याच्या वंशजांना तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या निरंतर सेवेसाठी निवडून घेतले आहे. 6 प्रत्येक लेवीच्या मंदिरातील सेवेच्या ठराविक वेळा असतील. पण दुसऱ्या कुठल्या वेळेला त्यास काम करायचे असल्यास तो करु शकतो. इस्राएलमध्ये कोणत्याही नगरात राहणारा कोणीही लेवी घर सोडून परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी येऊ शकतो. हे केव्हाही करायची त्यास मुभा आहे. 7 परमेश्वराची सेवा करणाऱ्या आपल्या सर्व लेवीय बांधवांप्रमाणे त्यानेही तेथे सेवा करावी. 8 त्यास इतरांप्रमाणेच वाटा मिळेल. शिवाय आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात त्याचा वाटा असेलच. परराष्ट्रीयांच्या रीतीरिवाजांविरुद्ध ताकीद 9 तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या ठिकाणी राहायला जाल तेव्हा तिकडच्या राष्ट्रांतील लोकांप्रमाणे भयंकर कृत्ये करु नका. 10 आपल्या पोटच्या मुलाबाळांचा वेदीवर बली देऊ नका. ज्योतिषी, चेटूक करणारा, शकुनमुहर्त पाहणारा, मांत्रिक यांच्या नादी लागू नका. 11 वशीकरण करणाऱ्याला थारा देऊ नका. तुमच्यापैकी कोणीमध्यस्थ, मांत्रिक बनू नये. मृतात्म्याशी विचारणारा असू नये. 12 अशा गोष्टी करणाऱ्यांचा तुमचा देव परमेश्वर ह्याला तिरस्कार आहे. म्हणून तर तो इतर राष्ट्रांना तुमच्या वाटेतून घालवून देईल. 13 तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशीच पूर्णपणे विश्वासू असा. 14 इतर राष्ट्रांना आपल्या भूमीतून हुसकावून लावा. ते लोक ज्योतिषी, चेटूक करणारे अशांच्या नादी लागणारे आहेत. पण तुमचा देव परमेश्वर तुम्हास तसे करु देणार नाही. मोशेसारखा दुसरा संदेष्टा देण्याचे परमेश्वराचे वचन 15 परमेश्वर तुमच्यासाठी संदेष्ट्याला पाठवील. तुमच्यामधूनच तो उदयाला येईल. तो माझ्यासारखा असेल. त्याचे तुम्ही ऐका. 16 तुमच्या सांगण्यावरुनच देव असे करत आहे. होरेब पर्वताशी तुम्ही सर्व जमलेले असताना तुम्हास या पर्वतावरील अग्नीची आणि देववाणीची भीती वाटली होती. तेव्हा तुम्ही म्हणालात, पुन्हा हा आमचा देव परमेश्वर ह्याचा आवाज आमच्या कानी न पडो. तसा अग्नीही पुन्हा दृष्टीस न पडो, नाहीतर खचितच आम्ही मरु. 17 तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, यांचे म्हणणे ठीकच आहे. 18 मी यांच्यामधूनच तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन. माझी वचने त्याच्या मुखाने ऐकवीन. माझ्या आज्ञेप्रमाणे तो लोकांशी बोलेल. 19 हा संदेष्टा माझ्या वतीने बोलेल. तेव्हा जो कोणी ते ऐकणार नाही त्यास मी शासन करीन. 20 पण हा संदेष्टा मी न सांगितलेले ही काही माझ्या वतीने बोलला, तर त्यास मृत्युदंड दिला पाहिजे. इतर दैवतांच्या वतीने बोलणारा संदेष्टाही कदाचित उदयास येईल. त्यालाही ठार मारले पाहिजे. 21 तुम्ही म्हणाल की अमुक वचन परमेश्वराचे नव्हे हे आम्हास कसे कळणार? 22 तर, परमेश्वराच्या वतीने म्हणून तो संदेष्टा काही बोलला व ते प्रत्यक्षात घडले नाहीतर समजा की ते परमेश्वराचे बोलणे नव्हते, तर तो संदेष्टा स्वत:चेच विचार बोलून दाखवत होता. त्यास तुम्ही घाबरायचे कारण नाही.
Total 34 अध्याय, Selected धडा 18 / 34
×

Alert

×

Marathi Letters Keypad References