मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
अनुवाद
1. {एबाल डोंगरावर लिहून ठेवण्याचे नियम} [PS] मग मोशे आणि इस्राएलमधील वडीलजन, यांनी लोकांस आज्ञापीले कि, “आज मी देणार असलेल्या सर्व आज्ञा पाळा.
2. तुमचा देव परमेश्वर देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही लवकरच यार्देन नदी ओलांडून जाणार आहात. त्यादिवशी मोठे धोंडे ऊभारा आणि त्यांच्यावर चुन्याचा लेप लावा.
3. त्या धोंडयावर या आज्ञा आणि शिकवणी लिहून काढा. यार्देन नदी उतरुन जाल त्यादिवशी हे करा. नंतरच परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, तो देणार असलेल्या त्या दुधामधाच्या भूमीत पाऊल टाका. परमेश्वर, तुमच्या पूर्वजांचा देव ह्याने हा प्रदेश तुम्हास देण्यासाठी वचन दिले आहे.
4. यार्देन नदी ओलांडून गेल्यावर माझ्या आजच्या आज्ञा पाळा. एबाल पर्वतावर चुन्याचा लेप केलेल्या शिला उभारा.
5. तसेच तुमचा देव परमेश्वर ह्यासाठी एक दगडी वेदी तयार करा. दगड फोडण्यासाठी लोखंडी हत्यार वापरु नका.
6. वेदी अखंड, न घडलेल्या दगडाची असावी. आणि त्यावर आपला देव परमेश्वरा ह्याला होमबली अर्पण करा.
7. तेथे शांत्यर्पणांचे यज्ञ करून भोजन करा. व आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद करा.
8. मग धोंड्यावर नियमशास्त्राची सर्व वचने स्वच्छ अक्षरात लिहून काढा.”
9. मग मोशे आणि लेवी याजक इस्राएल लोकांशी बोलले. मोशे म्हणाला, हे इस्राएला, शांत रहा! आणि ऐक! आज तू तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रजेतील झालास.
10. तेव्हा परमेश्वर सांगतो त्याप्रमाणे वाग. मी आज देतो त्या त्याच्या सर्व आज्ञा आणि नियम पाळ. [PS]
11. {एलाब डोंगरावर उभे राहून उच्चारायची शापवचने} [PS] त्याच दिवशी मोशेने लोकांस हेही सांगितले,
12. ते यार्देन नदी पार करून जातील तेव्हा शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, योसेफ व बन्यामीन या गोत्रांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम डोंगरावर उभे रहावे.
13. तसेच रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान व नफताली या गोत्रांनी शाप वाचून दाखवण्यासाठी एबाल डोंगरावर उभे रहावे.
14. लेवींनी सर्व इस्राएलास मोठ्याने असे सांगावे,
15. “मूर्ती घडवून तिची गुप्तपणे स्थापना करणारा शापित असो.” या मूर्ती म्हणजे कोणा कारागीराने लाकूड, दगड किंवा धातू यांच्यापासून घडवलेल्या असतात. परमेश्वरास अशा गोष्टींचा वीट आहे! तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
16. “नंतर लेवींनी लोकांस सांगावे आपल्या आईवडीलांचा अनादर दाखवणारी कृत्ये करतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
17. परत लेवींनी म्हणावे, “शेजाऱ्याच्या शेताची हद्द दाखवणारी खूण जो सरकवतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
18. लेवींना म्हणावे, “आंधळ्याला फसवून त्याचा रस्ता चुकवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे.
19. लेवींनी म्हणावे “परकीय, अनाथ, आणि विधवा यांच्याबाबतीत न्यायीपणाने न वागणारे शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
20. लेवींनी म्हणावे “वडीलांच्या पत्नीशी (सख्ख्या किंवा सावत्र आईशी) शरीरसंबंध ठेवून वडीलांच्या तोंडाला काळे फासणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
21. लेवींनी म्हणावे “पशूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
22. लेवींनी म्हणावे, “सख्ख्या अथवा सावत्र बहिणीशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
23. लेवींनी म्हणावे, “सासूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
24. लेवींनी म्हणावे, “दुसऱ्याचा खून करणारा तो जरी पकडला गेला नाही तरी शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
25. लेवींनी म्हणावे, “निरपराध व्यक्तीला ठार मारण्यासाठी जो पैसे घेतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
26. लेवींनी म्हणावे, “जो ही नियमशात्राची वचने मान्य करीत नाही, आचरणात आणत नाही तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.” [PE]

Notes

No Verse Added

Total 34 Chapters, Current Chapter 27 of Total Chapters 34
अनुवाद 27:3
1. {एबाल डोंगरावर लिहून ठेवण्याचे नियम} PS मग मोशे आणि इस्राएलमधील वडीलजन, यांनी लोकांस आज्ञापीले कि, “आज मी देणार असलेल्या सर्व आज्ञा पाळा.
2. तुमचा देव परमेश्वर देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही लवकरच यार्देन नदी ओलांडून जाणार आहात. त्यादिवशी मोठे धोंडे ऊभारा आणि त्यांच्यावर चुन्याचा लेप लावा.
3. त्या धोंडयावर या आज्ञा आणि शिकवणी लिहून काढा. यार्देन नदी उतरुन जाल त्यादिवशी हे करा. नंतरच परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, तो देणार असलेल्या त्या दुधामधाच्या भूमीत पाऊल टाका. परमेश्वर, तुमच्या पूर्वजांचा देव ह्याने हा प्रदेश तुम्हास देण्यासाठी वचन दिले आहे.
4. यार्देन नदी ओलांडून गेल्यावर माझ्या आजच्या आज्ञा पाळा. एबाल पर्वतावर चुन्याचा लेप केलेल्या शिला उभारा.
5. तसेच तुमचा देव परमेश्वर ह्यासाठी एक दगडी वेदी तयार करा. दगड फोडण्यासाठी लोखंडी हत्यार वापरु नका.
6. वेदी अखंड, घडलेल्या दगडाची असावी. आणि त्यावर आपला देव परमेश्वरा ह्याला होमबली अर्पण करा.
7. तेथे शांत्यर्पणांचे यज्ञ करून भोजन करा. आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद करा.
8. मग धोंड्यावर नियमशास्त्राची सर्व वचने स्वच्छ अक्षरात लिहून काढा.”
9. मग मोशे आणि लेवी याजक इस्राएल लोकांशी बोलले. मोशे म्हणाला, हे इस्राएला, शांत रहा! आणि ऐक! आज तू तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रजेतील झालास.
10. तेव्हा परमेश्वर सांगतो त्याप्रमाणे वाग. मी आज देतो त्या त्याच्या सर्व आज्ञा आणि नियम पाळ. PS
11. {एलाब डोंगरावर उभे राहून उच्चारायची शापवचने} PS त्याच दिवशी मोशेने लोकांस हेही सांगितले,
12. ते यार्देन नदी पार करून जातील तेव्हा शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, योसेफ बन्यामीन या गोत्रांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम डोंगरावर उभे रहावे.
13. तसेच रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान नफताली या गोत्रांनी शाप वाचून दाखवण्यासाठी एबाल डोंगरावर उभे रहावे.
14. लेवींनी सर्व इस्राएलास मोठ्याने असे सांगावे,
15. “मूर्ती घडवून तिची गुप्तपणे स्थापना करणारा शापित असो.” या मूर्ती म्हणजे कोणा कारागीराने लाकूड, दगड किंवा धातू यांच्यापासून घडवलेल्या असतात. परमेश्वरास अशा गोष्टींचा वीट आहे! तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
16. “नंतर लेवींनी लोकांस सांगावे आपल्या आईवडीलांचा अनादर दाखवणारी कृत्ये करतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
17. परत लेवींनी म्हणावे, “शेजाऱ्याच्या शेताची हद्द दाखवणारी खूण जो सरकवतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
18. लेवींना म्हणावे, “आंधळ्याला फसवून त्याचा रस्ता चुकवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे.
19. लेवींनी म्हणावे “परकीय, अनाथ, आणि विधवा यांच्याबाबतीत न्यायीपणाने वागणारे शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
20. लेवींनी म्हणावे “वडीलांच्या पत्नीशी (सख्ख्या किंवा सावत्र आईशी) शरीरसंबंध ठेवून वडीलांच्या तोंडाला काळे फासणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
21. लेवींनी म्हणावे “पशूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
22. लेवींनी म्हणावे, “सख्ख्या अथवा सावत्र बहिणीशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
23. लेवींनी म्हणावे, “सासूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
24. लेवींनी म्हणावे, “दुसऱ्याचा खून करणारा तो जरी पकडला गेला नाही तरी शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
25. लेवींनी म्हणावे, “निरपराध व्यक्तीला ठार मारण्यासाठी जो पैसे घेतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
26. लेवींनी म्हणावे, “जो ही नियमशात्राची वचने मान्य करीत नाही, आचरणात आणत नाही तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.” PE
Total 34 Chapters, Current Chapter 27 of Total Chapters 34
×

Alert

×

marathi Letters Keypad References