1. तू आपल्या तारुण्याच्या दिवसातसुद्धा आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. [QBR] अनर्थाचे दिवस येण्यापूर्वी, [QBR] आणि तेव्हा अशी वर्षे येण्यापूर्वी तू म्हणशील, [QBR] त्यामध्ये मला काही सुख नाही. [QBR]
2. सूर्य, चंद्र आणि तारे यांच्या प्रकाशापूर्वी अंधकार वाढेल [QBR] आणि पावसानंतर काळोखे ढग परत येतील. [QBR]
3. त्यावेळी महालाचे पहारेकरी थरथरतील [QBR] आणि बळकट मनुष्य वाकतील, [QBR] आणि दळणाऱ्या स्त्रिया थांबतील कारण त्या थोड्या आहेत, [QBR] आणि ज्या खिडक्यातून पाहणाऱ्या आहेत त्यांना स्पष्ट दिसणार नाही. [QBR]
4. त्यासमयी जेव्हा रस्त्यातील दरवाजे बंद होतील आणि जात्याचा आवाज थांबेल, [QBR] तेव्हा पक्ष्याच्या शब्दाने मनुष्य बिथरेल, [QBR] आणि मुलींच्या गायनाचास्वर लुप्त होईल. [QBR]
5. तेव्हा मनुष्यास उंचावरच्या ठिकाणांची [QBR] आणि रस्त्यावरील पुढील धोक्यांची भीती वाटेल, [QBR] आणि तेव्हा बदामाचे झाड फुलेल, [QBR] आणि तेव्हा टोळ स्वतःपुढे भारी असा वाटेल, [QBR] आणि तेव्हा स्वाभाविक इच्छा दुर्बल होईल. [QBR] नंतर मनुष्य आपल्या सनातन घरास जातो, [QBR] आणि शोक करणारे रस्त्यात फिरतात. [QBR]
6. तू आपल्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर, [QBR] रुप्याची तार तुटण्यापूर्वी [QBR] किंवा सोन्याचा कटोरा चेपण्यापूर्वी, [QBR] अथवा झऱ्याजवळ घागर फुटण्यापूर्वी, [QBR] अथवा पाण्याचा रहाट विहिरीकडे मोडला जाईल, [QBR]
7. ज्या ठिकाणापासून ती आली, माती परत मातीला मिळेल, [QBR] आणि देवाने दिलेला आत्मा त्याजकडे परत जाईल. [QBR]
8. उपदेशक म्हणतो, धुक्याची वाफ, प्रत्येक गोष्ट नष्ट होणारी वाफ आहे. [PS]
9. {मानवाचे कर्तव्य} [PS] उपदेशक ज्ञानी होता आणि म्हणून तो लोकांस ज्ञान शिकवीत गेला. त्याने अभ्यास व निरक्षण करून व पुष्कळ म्हणीचा संच केला. [PE][PS]
10. उपदेशकाने स्पष्ट व सत्याची सरळमार्गी वचने शोधून लिहिण्याचा प्रयत्न केला.
11. ज्ञानाची वचने आरींसारखी आहेत. शिक्षकाची त्याच्या म्हणीच्या संग्रहातील वचने खोल ठोकलेल्या खिळ्यांसारखी आहेत. ती एकाच मेंढपाळाकडून शिकविण्यात आली आहेत. [PE][PS]
12. माझ्या मुला, त्याखेरीज अधिक सावध रहा. पुष्कळ पुस्तके रचण्याला, काही अंत नाही. खूप अभ्यास देहाला थकवा आणेल. [QBR]
13. याविषयाचा शेवट हाच आहे, [QBR] सर्व काही ऐकल्यानंतर, [QBR] तू देवाचे भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ. [QBR] कारण सर्व मानवजातीचे सारे कर्तव्य हेच आहे. [QBR]
14. देव सगळ्या कृत्यांचा न्याय करील, [QBR] त्याबरोबर प्रत्येक गुप्त गोष्टीचा, [QBR] मग ती वाईट असो किंवा चांगली. [PE]