1. [QS]ज्ञानी मनुष्य कोण आहे? [QE][QS]जीवनात काय घटना घडणार आहे हे कोणाला समजते? [QE][QS]मनुष्यातील ज्ञान त्याचे मुख प्रकाशीत करते [QE][QS]आणि त्याच्या मुखाचा कठीणपणा बदलतो. [QE]
2. {#1राजाच्या आज्ञा पाळ } [PS]मी तुम्हास सल्ला देतो की, राजाची आज्ञा पाळा कारण त्याचे संरक्षण करण्याची तू देवाची शपथ घेतली आहे.
3. त्याच्या समोरून जाण्याची घाई करू नको आणि जे काही चुकीचे आहे त्यास पाठींबा देऊ नको. कारण राजाच्या इच्छेला येईल तसे तो करतो.
4. राजाच्या शब्दाला अधिकार आहे, म्हणून त्यास कोण म्हणेल, तू काय करतो? [PE]
5. [QS]जो राजाच्या आज्ञा पाळतो तो अनिष्ट टाळतो. [QE][QS]शहाण्या मनुष्याचे मन योग्य वेळ व न्यायसमय समजते. [QE]
6. {#1देवाचे मार्ग मानवी ज्ञानाला अगम्य } [QS]प्रत्येक गोष्टीला योग्य उत्तर मिळण्याचा आणि प्रतिक्रिया दर्शविण्याचा समय आहे. [QE][QS]कारण मनुष्याच्या अडचणी मोठ्या आहेत. [QE]
7. [QS]पुढे काय होणार आहे कोणाला माहित नाही. [QE][QS]काय होणार आहे हे त्यास कोण सांगू शकेल? [QE]
8. [QS]जीवनाच्या श्वासास[* आत्म्यास ] थांबून धरण्याचा अधिकार कोणालाही नाही; [QE][QS]आणि कोणालाही त्याच्या मरणाच्या दिवसावर अधिकार नाही. [QE][QS]युध्द चालू असताना कोणाचीही सैन्यातून सुटका होत नाही, [QE][QS]आणि दुष्टाई त्याच्या दासास सोडवणार नाही.
9. मी या सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत. आणि कोणतेही काम जे भूतलावर करण्यात येत आहे त्याकडे मी आपले लक्ष लावले आहे. एक समय आहे त्यामध्ये दुसरा मनुष्य आपल्या वाईटासाठी दुसऱ्यावर अधिकार करतो. [QE]
10. [PS]मी दुष्टांना सार्वजनिकरित्या पुरताना बघितले. त्यांना पवित्र जागेतून नेले आणि पुरले आणि त्यांनी ज्या शहरात दुष्ट कामे केली तेथील लोक त्यांची स्तुती करत होते[† लोक त्यांना विसरून गेले ]. हेसुद्धा निरुपयोगी आहे.
11. जेव्हा वाईट गुन्ह्याबद्दल शिक्षेचा हुकूम होऊनही ती लवकर अंमलात आणली जात नाही. त्यामुळे मानवजातीचे मन वाईट करण्याकडे तत्पर असते. [PE]
12. [PS]पापी शंभर दुष्कृत्य करेल आणि तरीही तो भरपूर आयुष्य जगला. असे असले तरी मला माहित आहे जे देवाचा सन्मान करतात, जे त्याच्यासमक्ष त्यास मान देतात हे अधिक चांगले आहे.
13. पण दुष्टाचे हित होणार नाही. त्यास दीर्घायुष्य लाभणार नाही. त्यांचे दिवस क्षणभंगूर सावलीसारखे असतील. कारण तो देवाला मान देत नाही. [PE]
14. [PS]पृथ्वीवर आणखी एक निरर्थक गोष्ट घडते, असे काही नीतिमान असतात की, दुष्टांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती यांची होते आणि असे काही दुष्ट असतात की, नीतिमानाच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती यांची होते. मी हे म्हणतो हेही व्यर्थ आहे.
15. मग मी आनंदाची शिफारस केली, कारण मनुष्याने खावे, प्यावे व आनंद करावा यापेक्षा सूर्याच्या खालती त्यास काही उत्तम नाही. कारण त्याच्या आयुष्याचे जे दिवस देवाने त्यास पृथ्वीवर दिले आहेत त्यामध्ये त्याच्या श्रमामध्ये हे त्याच्याजवळ राहील. [PE]
16. [PS]जेव्हा ज्ञान समजायला आणि जे कार्य पृथ्वीवर चालले आहे ते पाहायला जेव्हा मी आपले मन लावले. कारण अहोरात्र ज्याच्या डोळ्यास डोळा लागत नाही असेही लोक असतात.
17. तेव्हा देवाचे सर्व काम पाहून मला समजले की, जे काम भूतलावर करण्यात येत आहे ते मनुष्यास पुरते शोधून काढता येत नाही, कारण ते शोधून काढायला मनुष्याने कितीही श्रम केले तरी ते त्यास सापडणार नाही आणि याव्यतिरिक्त, कोणी ज्ञानी मनुष्याने, मी ते जाणीन, असे जरी म्हटले, तरी त्यास ते सापडणार नाही. [PE]