मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
इफिसकरांस
1. {देवाच्या गुपिताचे प्रकटीकरण करणाऱ्या कार्यावर पौलाची रवानगी} [PS] या कारणासाठी मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिस्थ आहे.
2. देवाची कृपा तुमच्यासाठी मला मिळाली आहे तिच्या कार्याविषयी तुम्ही ऐकून असाल;
3. जसे मला प्रगटीकरणाद्वारे सत्याचे गुपित कळवले गेले मी त्यावर कमी लिहीले आहे.
4. जेव्हा तुम्ही ती वाचाल तेव्हा ख्रिस्ताच्या खऱ्या रहस्याविषयीचे माझे ज्ञान तुम्हास समजेल,
5. ते रहस्य जसे आता आत्म्याच्याद्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेश देणाऱ्यांना प्रकट करण्यात आले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संततीला सांगण्यात आले नव्हते.
6. हे रहस्य ते आहे की, परराष्ट्रीय येशू ख्रिस्तामध्ये शुभवर्तमानाद्वारे आमच्याबरोबर वारसदार आणि एकाच शरीराचे अवयव आहेत आणि अभिवचनाचे भागीदार आहेत. [PE][PS]
7. देवाच्या कृतीच्या सामर्थ्याचा परिणाम म्हणून जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्यामुळे मी त्या शुभवर्तमानाचा सेवक झालो.
8. जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,
9. आणि ज्याने सर्व निर्माण केले त्या देवाने युगादीकाळापासून जे रहस्य गुप्त ठेवले होते त्याची व्यवस्था काय आहे हे सर्व लोकांस मी प्रकट करावे.
10. यासाठी की आता मंडळीद्वारे सत्ताधीश आणि आकाशातील शक्ती यांना देवाचे पुष्कळ प्रकारचे असलेले ज्ञान कळावे.
11. देवाच्या सर्वकाळच्या हेतुला अनुसरून जे त्याने आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये पूर्ण केले आहे.
12. ख्रिस्तामध्ये आम्हास त्याच्यावरील विश्वासामुळे धैर्य आणि पूर्ण विश्वास मिळाला आहे.
13. म्हणून, मी विनंती करतो, तुमच्यासाठी मला होणाऱ्या यातनेमुळे तुम्ही माघार घेऊ नये कारण ही यातना आमचे गौरव आहे. [PS]
14. {हृदयामध्ये ख्रिस्ताने येऊन रहावे म्हणून प्रार्थना} [PS] (14-15) या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो, ज्याच्यामुळे प्रत्येक वंशाला स्वर्गात आणि पृथ्वीवर निर्माण करून नाव देण्यात आले आहे.
15. त्याच्या गौरवाच्या विपुलतेनुसार त्याने तुम्हास असे द्यावे, देवाच्या आत्म्याद्वारे सामर्थ्य मिळून तुम्ही आपल्या अंतर्यामी बलवान व्हावे.
16. विश्वासाद्वारे ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात रहावे ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व खोलवर पाया घातलेले असावे
17. यासाठी की, जे पवित्रजन आहेत त्यांच्यासह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे तुम्ही समजून घ्यावे.
18. म्हणजे तुम्हास समजावे ख्रिस्ताची महान प्रीती जी सर्वांना मागे टाकते, यासाठी की तुम्ही देवाच्या पूर्णत्वाने परिपूर्ण भरावे. [PE][PS]
19. आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आपल्यामध्ये कार्य करतो इतकेच नव्हे तर आमची मागणी किंवा आमच्या कल्पनेपेक्षा अधिक काम करण्यास तो समर्थ आहे,
20. त्यास मंडळी आणि ख्रिस्त येशूमध्ये सर्व पिढ्यानपिढ्या सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. [PE]
21.

Notes

No Verse Added

Total 6 अध्याय, Selected धडा 3 / 6
1 2 3 4 5 6
इफिसकरांस 3
देवाच्या गुपिताचे प्रकटीकरण करणाऱ्या कार्यावर पौलाची रवानगी 1 या कारणासाठी मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिस्थ आहे. 2 देवाची कृपा तुमच्यासाठी मला मिळाली आहे तिच्या कार्याविषयी तुम्ही ऐकून असाल; 3 जसे मला प्रगटीकरणाद्वारे सत्याचे गुपित कळवले गेले मी त्यावर कमी लिहीले आहे. 4 जेव्हा तुम्ही ती वाचाल तेव्हा ख्रिस्ताच्या खऱ्या रहस्याविषयीचे माझे ज्ञान तुम्हास समजेल, 5 ते रहस्य जसे आता आत्म्याच्याद्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेश देणाऱ्यांना प्रकट करण्यात आले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संततीला सांगण्यात आले नव्हते. 6 हे रहस्य ते आहे की, परराष्ट्रीय येशू ख्रिस्तामध्ये शुभवर्तमानाद्वारे आमच्याबरोबर वारसदार आणि एकाच शरीराचे अवयव आहेत आणि अभिवचनाचे भागीदार आहेत. 7 देवाच्या कृतीच्या सामर्थ्याचा परिणाम म्हणून जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्यामुळे मी त्या शुभवर्तमानाचा सेवक झालो. 8 जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले, 9 आणि ज्याने सर्व निर्माण केले त्या देवाने युगादीकाळापासून जे रहस्य गुप्त ठेवले होते त्याची व्यवस्था काय आहे हे सर्व लोकांस मी प्रकट करावे. 10 यासाठी की आता मंडळीद्वारे सत्ताधीश आणि आकाशातील शक्ती यांना देवाचे पुष्कळ प्रकारचे असलेले ज्ञान कळावे. 11 देवाच्या सर्वकाळच्या हेतुला अनुसरून जे त्याने आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये पूर्ण केले आहे. 12 ख्रिस्तामध्ये आम्हास त्याच्यावरील विश्वासामुळे धैर्य आणि पूर्ण विश्वास मिळाला आहे. 13 म्हणून, मी विनंती करतो, तुमच्यासाठी मला होणाऱ्या यातनेमुळे तुम्ही माघार घेऊ नये कारण ही यातना आमचे गौरव आहे. हृदयामध्ये ख्रिस्ताने येऊन रहावे म्हणून प्रार्थना 14 (14-15) या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो, ज्याच्यामुळे प्रत्येक वंशाला स्वर्गात आणि पृथ्वीवर निर्माण करून नाव देण्यात आले आहे. 15 त्याच्या गौरवाच्या विपुलतेनुसार त्याने तुम्हास असे द्यावे, देवाच्या आत्म्याद्वारे सामर्थ्य मिळून तुम्ही आपल्या अंतर्यामी बलवान व्हावे. 16 विश्वासाद्वारे ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात रहावे ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व खोलवर पाया घातलेले असावे 17 यासाठी की, जे पवित्रजन आहेत त्यांच्यासह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे तुम्ही समजून घ्यावे. 18 म्हणजे तुम्हास समजावे ख्रिस्ताची महान प्रीती जी सर्वांना मागे टाकते, यासाठी की तुम्ही देवाच्या पूर्णत्वाने परिपूर्ण भरावे. 19 आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आपल्यामध्ये कार्य करतो इतकेच नव्हे तर आमची मागणी किंवा आमच्या कल्पनेपेक्षा अधिक काम करण्यास तो समर्थ आहे, 20 त्यास मंडळी आणि ख्रिस्त येशूमध्ये सर्व पिढ्यानपिढ्या सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. 21
Total 6 अध्याय, Selected धडा 3 / 6
1 2 3 4 5 6
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References