मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
निर्गम
1. {प्रथमजन्मलेल्यास पवित्र म्हणून वेगळे ठेवणे} [PS] मग परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
2. “इस्राएली लोकांमध्ये मनुष्याचा व पशूचा या दोहोंचे प्रत्येक प्रथम जन्मलेले सर्व नर माझ्यासाठी पवित्र कर. प्रथम जन्मलेले ते माझे आहेत.” निर्ग. 12:14-20 [PE][PS]
3. {बेखमीर भाकरीचा सण} [PS] मोशे लोकांस म्हणाला, “आजच्या दिवसाची आठवण ठेवा. तुम्ही मिसर देशात गुलाम म्हणून होता; परंतु या दिवशी परमेश्वराने आपल्या हाताच्या बळाने तुम्हास गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले म्हणून तुम्ही खमीर घातलेली भाकर खाऊ नये.
4. आज अबीब महिन्यात तुम्ही मिसर सोडून निघत आहात.
5. परमेश्वराने तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक करार केला होता की कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी व यबूसी ह्याच्या देशात, जेथे दुधामधाचे प्रवाह वाहतात त्या देशात आणल्यानंतर तुम्ही या महिन्यात ही सेवा करावी.
6. या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. सातव्या दिवशी परमेश्वरासाठी तुम्ही हा सण पाळावा;
7. या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. तुमच्या देशाच्या हद्दीत कोठेही खमिराचे दर्शनसुध्दा होऊ नये.
8. या दिवशी परमेश्वराने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले म्हणून आम्ही हा सण पाळीत आहोत असे तुम्ही आपल्या पुत्रपौत्रांना सांगावे.
9. हे चिन्ह तुझ्या हातावर, तुझ्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये स्मारक असे असावे, परमेश्वराचा नियम तुझ्या मुखी असावा. कारण की परमेश्वराने बलवान भुजाने तुला मिसर देशामधून बाहेर आणले.
10. म्हणून तू वर्षानुवर्षे नेमलेल्या वेळी हा विधी पाळावा. [PS]
11. {प्रथमजन्मलेले अपत्य} [PS] परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे तो तुम्हास आता कनानी लोक राहत असलेल्या देशात घेऊन जाईल व तो देश तुझ्या हाती देईल.
12. तेव्हा उदरातून निघालेला प्रथम पुरुष व जनावराच्या पोटचा प्रथम वत्स यांना परमेश्वरासाठी वेगळे करावे, सर्व नर परमेश्वराचे होत.
13. गाढवाचा प्रथम वत्स एक कोकरू देऊन सोडवून घ्यावा; त्याचा मोबदला काही न दिल्यास त्याची मान मुरगाळावी. तुझ्या मुलातील प्रथम नर मोबदला देऊन सोडवून घ्यावा.
14. पुढील काळी तुमची मुलेबाळे विचारतील की हे काय? तेव्हा त्यांना सांग, ‘मिसर देशातून गुलामगिरीतून परमेश्वराने आम्हांला आपल्या हाताच्या बलाने बाहेर काढले.
15. आणि फारो आम्हांस मिसर सोडून जाऊ देईना, तेव्हा परमेश्वराने मिसर देशामधील मनुष्य व पशू यांचे सर्व प्रथम नर मारून टाकले; आणि म्हणूनच आम्ही उदरातून निघालेल्या सर्व प्रथम नरांचा मी परमेश्वरास बली अर्पितो. पण माझे सर्व ज्येष्ठ पुत्र देऊन सोडवून घेतो.
16. तुझ्या हातावर आणि तुझ्या दोहो डोळ्यांच्या मध्यभागी हे स्मारक चिन्ह व्हावे. कारण परमेश्वराने आपल्या हाताच्या बलाने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले.” निर्ग. 40:34-38; गण. 9:15-23; 1 राजे 8:10-11 [PE][PS]
17. {मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ} [PS] फारोने लोकांस जाऊ दिले, परंतु परमेश्वराने लोकांस पलिष्टी लोकांच्या देशातून जवळची वाट असताना देखील त्यातून जाऊ दिले नाही “युध्द प्रसंग पाहून हे लोक माघार घेऊन मिसर देशाला परत जातील, असे देवाला वाटले.”
18. म्हणून देवाने त्यांना दुसऱ्या मार्गाने तांबड्या समुद्राजवळील रानातून नेले. इस्राएल लोक मिसरामधून सशस्त्र बाहेर निघाले होते.
19. मोशेने योसेफाच्या अस्थी आपल्याबरोबर घेतल्या. कारण मरण्यापूर्वी योसेफाने आपणाकरता इस्राएली पुत्रांकडून वचन घेतले होते. तो म्हणाला होता, “देव जेव्हा तुम्हास मिसरमधून सोडवील तेव्हा माझ्या अस्थी मिसरमधून घेऊन जाण्याची आठवण ठेवा.”
20. मग ते सुक्कोथ नगराहून रवाना झाले व रानाजवळील एथामात त्यांनी तळ दिला.
21. त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मेघस्तंभाच्या ठायी आणि रात्री त्यांना प्रकाश देण्यासाठी अग्नीस्तंभाच्या ठायी त्यांच्यापुढे चालत असे.
22. दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्नीस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत. [PE]

Notes

No Verse Added

Total 40 अध्याय, Selected धडा 13 / 40
निर्गम 13:27
प्रथमजन्मलेल्यास पवित्र म्हणून वेगळे ठेवणे 1 मग परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, 2 “इस्राएली लोकांमध्ये मनुष्याचा व पशूचा या दोहोंचे प्रत्येक प्रथम जन्मलेले सर्व नर माझ्यासाठी पवित्र कर. प्रथम जन्मलेले ते माझे आहेत.” निर्ग. 12:14-20 बेखमीर भाकरीचा सण 3 मोशे लोकांस म्हणाला, “आजच्या दिवसाची आठवण ठेवा. तुम्ही मिसर देशात गुलाम म्हणून होता; परंतु या दिवशी परमेश्वराने आपल्या हाताच्या बळाने तुम्हास गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले म्हणून तुम्ही खमीर घातलेली भाकर खाऊ नये. 4 आज अबीब महिन्यात तुम्ही मिसर सोडून निघत आहात. 5 परमेश्वराने तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक करार केला होता की कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी व यबूसी ह्याच्या देशात, जेथे दुधामधाचे प्रवाह वाहतात त्या देशात आणल्यानंतर तुम्ही या महिन्यात ही सेवा करावी. 6 या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. सातव्या दिवशी परमेश्वरासाठी तुम्ही हा सण पाळावा; 7 या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. तुमच्या देशाच्या हद्दीत कोठेही खमिराचे दर्शनसुध्दा होऊ नये. 8 या दिवशी परमेश्वराने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले म्हणून आम्ही हा सण पाळीत आहोत असे तुम्ही आपल्या पुत्रपौत्रांना सांगावे. 9 हे चिन्ह तुझ्या हातावर, तुझ्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये स्मारक असे असावे, परमेश्वराचा नियम तुझ्या मुखी असावा. कारण की परमेश्वराने बलवान भुजाने तुला मिसर देशामधून बाहेर आणले. 10 म्हणून तू वर्षानुवर्षे नेमलेल्या वेळी हा विधी पाळावा. प्रथमजन्मलेले अपत्य 11 परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे तो तुम्हास आता कनानी लोक राहत असलेल्या देशात घेऊन जाईल व तो देश तुझ्या हाती देईल. 12 तेव्हा उदरातून निघालेला प्रथम पुरुष व जनावराच्या पोटचा प्रथम वत्स यांना परमेश्वरासाठी वेगळे करावे, सर्व नर परमेश्वराचे होत. 13 गाढवाचा प्रथम वत्स एक कोकरू देऊन सोडवून घ्यावा; त्याचा मोबदला काही न दिल्यास त्याची मान मुरगाळावी. तुझ्या मुलातील प्रथम नर मोबदला देऊन सोडवून घ्यावा. 14 पुढील काळी तुमची मुलेबाळे विचारतील की हे काय? तेव्हा त्यांना सांग, ‘मिसर देशातून गुलामगिरीतून परमेश्वराने आम्हांला आपल्या हाताच्या बलाने बाहेर काढले. 15 आणि फारो आम्हांस मिसर सोडून जाऊ देईना, तेव्हा परमेश्वराने मिसर देशामधील मनुष्य व पशू यांचे सर्व प्रथम नर मारून टाकले; आणि म्हणूनच आम्ही उदरातून निघालेल्या सर्व प्रथम नरांचा मी परमेश्वरास बली अर्पितो. पण माझे सर्व ज्येष्ठ पुत्र देऊन सोडवून घेतो. 16 तुझ्या हातावर आणि तुझ्या दोहो डोळ्यांच्या मध्यभागी हे स्मारक चिन्ह व्हावे. कारण परमेश्वराने आपल्या हाताच्या बलाने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले.” निर्ग. 40:34-38; गण. 9:15-23; 1 राजे 8:10-11 मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ 17 फारोने लोकांस जाऊ दिले, परंतु परमेश्वराने लोकांस पलिष्टी लोकांच्या देशातून जवळची वाट असताना देखील त्यातून जाऊ दिले नाही “युध्द प्रसंग पाहून हे लोक माघार घेऊन मिसर देशाला परत जातील, असे देवाला वाटले.” 18 म्हणून देवाने त्यांना दुसऱ्या मार्गाने तांबड्या समुद्राजवळील रानातून नेले. इस्राएल लोक मिसरामधून सशस्त्र बाहेर निघाले होते. 19 मोशेने योसेफाच्या अस्थी आपल्याबरोबर घेतल्या. कारण मरण्यापूर्वी योसेफाने आपणाकरता इस्राएली पुत्रांकडून वचन घेतले होते. तो म्हणाला होता, “देव जेव्हा तुम्हास मिसरमधून सोडवील तेव्हा माझ्या अस्थी मिसरमधून घेऊन जाण्याची आठवण ठेवा.” 20 मग ते सुक्कोथ नगराहून रवाना झाले व रानाजवळील एथामात त्यांनी तळ दिला. 21 त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मेघस्तंभाच्या ठायी आणि रात्री त्यांना प्रकाश देण्यासाठी अग्नीस्तंभाच्या ठायी त्यांच्यापुढे चालत असे. 22 दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्नीस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत.
Total 40 अध्याय, Selected धडा 13 / 40
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References