मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
निर्गम
1. {परतफेडिविषयी नियम} [PS] एखाद्याने बैल किंवा मेंढरू चोरून ते कापले किंवा विकून टाकले तर त्याने एका बैलाबद्दल पाच बैल व एका मेंढराबद्दल चार मेंढरे द्यावीत.
2. चोर घर फोडत असता सापडला व जीव जाईपर्यंत मार बसला तर त्याच्या खुनाचा दोष कोणावर येणार नाही.
3. परंतु तो चोरी करत असता सूर्योदय झाला तर मरणाऱ्यावर खुनाचा दोष येईल. चोराने नुकसान अवश्य भरून द्यावे. त्याच्याजवळ काही नसेल तर चोरीच्या भरपाईसाठी त्याची विक्री करावी.
4. चोरलेला बैल, गाढव, मेंढरू वगैरे चोराच्या हाती जिवंत सापडले तर त्याने एकेकाबद्दल दुप्पट परत द्यावी.
5. कोणी आपले जनावर मोकळे सोडले ते दुसऱ्याच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात जाऊन चरले व खाल्ले तर आपल्या शेतातील किंवा द्राक्षमळ्यातील चांगल्यात चांगल्या पिकातून त्याने त्याचे नुकसान भरून द्यावे.
6. जर कोणी काटेकुटे जाळण्यासाठी आग पेटवली व ती भडकल्यामुळे धान्याच्या सुड्या किंवा उभे पीक जळाले तर आग पेटवणाऱ्याने नुकसान भरून दिलेच पाहिजे.
7. कोणी शेजाऱ्याकडे आपला पैसा किंवा काही वस्तू ठेवण्यासाठी दिल्या आणि जर ते सर्व त्याच्या घरातून चोरीस गेले, तर चोर सापडल्यावर त्याच्या दुप्पट किंमत चोराने भरून द्यावी.
8. परंतु जर चोर सापडला नाही, तर घरमालकाला देवासमोर घेऊन [* न्यायाधीशासमोर ] जावे म्हणजे मग त्याने स्वतः त्या वस्तुला हात लावला की नाही त्याचा न्याय होईल.
9. जर हरवलेला एखादा बैल, एखादे गाढव, मेंढरू किंवा वस्त्र यांच्यासंबंधी दोन मनुष्यात वाद उत्पन्न झाला, आणि ती माझी आहे अशी कोणी तक्रार केली तर त्या हक्क सांगणाऱ्या दोन्ही पक्षांनी देवासमोर [† न्यायाधीशासमोर] यावे; ज्याला देव दोषी ठरवील त्याने आपल्या शेजाऱ्याला तिच्याबद्दल दुप्पट बदला द्यावा.
10. एखाद्याने आपले गाढव, बैल, किंवा मेंढरू थोडे दिवस सांभाळण्याकरता आपल्या शेजाऱ्याकडे दिले, परंतु ते जर मरण पावले, किंवा जखमी झाले किंवा कोणी पाहत नसताना पकडून नेले;
11. तर त्या दोघांमध्ये परमेश्वराची शपथ व्हावी. आपण शेजाऱ्याच्या मालमत्तेला हात लावला नाही असे सांगितले तर त्या जनावराच्या मालकाने त्याच्या शपथेवर विश्वास ठेवावा; मग त्या शेजाऱ्याला जनावराची किंमत भरून द्यावी लागणार नाही.
12. त्याच्यापासून खरोखर ते चोरीस गेले असेल तर त्याची किंमत मालकाला भरून द्यावी.
13. जर ते जनावर कोणी मारून टाकले असेल तर ते पुराव्यादाखल आणून दाखवावे म्हणजे त्यास भरपाई भरून द्यावी लागणार नाही.
14. जर कोणी आपल्या शेजाऱ्याकडून त्याचे जनावर मागून घेतले मालक तेथे हजर नसताना त्या जनावराला जर इजा झाली किंवा ते मरण पावले तर त्या मालकाला त्याची किंमत अवश्य भरून द्यावी;
15. जर त्या वेळी तेथे जनावराजवळ मालक असेल तर मग भरपाई करावी लागणार नाही; किंवा ते जनावर भाड्याने घेतले असले तर त्याचे नुकसान भाड्यातच आले आहे. [PS]
16. {समाजातील जबाबदारी} [PS] आणि मागणी झाली नाही अशा कुमारिकेला फसवून जर कोणी तिला भ्रष्ट केले तर त्याने पूर्ण देज देऊन तिच्याशी लग्न केलेच पाहिजे;
17. तिच्या पित्याने त्यास ती देण्यास नकार दिला तर भ्रष्ट करणाऱ्याने तिच्या पित्याला कुमारिकेच्या रीतीप्रमाणे पैसा तोलून द्यावा.
18. कोणत्याही चेटकिणीला जिवंत ठेवू नये.
19. पशुगमन करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे.
20. परमेश्वराशिवाय दुसऱ्या दैवतांना बली करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे.
21. उपऱ्याचा छळ करू नये किंवा त्याच्यावर जुलूम करू नको. कारण मिसर देशात तुम्हीही उपरी होता.
22. विधवा किंवा अनाथ यांना तुम्ही जाचू नका
23. तुम्ही त्यांना कोणत्याही रीतीने जाचाल आणि ती मला हाक मारतील तर मी त्यांचे ओरडणे अवश्य ऐकेन;
24. व माझा राग तुम्हावर भडकेल व मी तुम्हास तलवारीने मारून टाकीन म्हणजे तुमच्या स्रिया विधवा व तुमची मुले पोरकी होतील.
25. तुझ्याजवळ राहणाऱ्या माझ्या एखाद्या गरीब मनुष्यास तुम्ही उसने पैसे दिले तर त्याबद्दल तुम्ही व्याज आकारू नये.
26. तू आपल्या शेजाऱ्याचे पांघरुण तुझ्याजवळ गहाण ठेवून घेतले तर सूर्य मावळण्याआधी तू त्याचे पांघरुण त्यास परत करावे;
27. कारण त्याचे अंग झाकायला तेवढेच असणार. ते घेतले तर तो काय पांघरूण निजेल? त्याने गाऱ्हाणे केले तर मी त्याचे ऐकेन, कारण मी करुणामय आहे.
28. तू आपल्या देवाची निंदा करू नको किंवा तुझ्या लोकांच्या राज्यकर्त्याला शाप देऊ नको.
29. आपल्या हंगामातले व आपल्या फळांच्या रसातले मला अर्पण करण्यास हयगय करू नको. तुझा प्रथम जन्मलेला पुत्र मला द्यावा;
30. तसेच प्रथम जन्मलेले बैल व मेंढरे, यांना जन्मल्यापासून सात दिवस त्यांच्या आईजवळ ठेवावे व आठव्या दिवशी ते मला द्यावेत.
31. तुम्ही माझे पवित्र लोक आहात म्हणून फाडून टाकलेल्या पशूंचे मांस तुम्ही खाऊ नये; ते कुत्र्यांना घालावे. [PE]

Notes

No Verse Added

Total 40 अध्याय, Selected धडा 22 / 40
निर्गम 22:13
परतफेडिविषयी नियम 1 एखाद्याने बैल किंवा मेंढरू चोरून ते कापले किंवा विकून टाकले तर त्याने एका बैलाबद्दल पाच बैल व एका मेंढराबद्दल चार मेंढरे द्यावीत. 2 चोर घर फोडत असता सापडला व जीव जाईपर्यंत मार बसला तर त्याच्या खुनाचा दोष कोणावर येणार नाही. 3 परंतु तो चोरी करत असता सूर्योदय झाला तर मरणाऱ्यावर खुनाचा दोष येईल. चोराने नुकसान अवश्य भरून द्यावे. त्याच्याजवळ काही नसेल तर चोरीच्या भरपाईसाठी त्याची विक्री करावी. 4 चोरलेला बैल, गाढव, मेंढरू वगैरे चोराच्या हाती जिवंत सापडले तर त्याने एकेकाबद्दल दुप्पट परत द्यावी. 5 कोणी आपले जनावर मोकळे सोडले ते दुसऱ्याच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात जाऊन चरले व खाल्ले तर आपल्या शेतातील किंवा द्राक्षमळ्यातील चांगल्यात चांगल्या पिकातून त्याने त्याचे नुकसान भरून द्यावे. 6 जर कोणी काटेकुटे जाळण्यासाठी आग पेटवली व ती भडकल्यामुळे धान्याच्या सुड्या किंवा उभे पीक जळाले तर आग पेटवणाऱ्याने नुकसान भरून दिलेच पाहिजे. 7 कोणी शेजाऱ्याकडे आपला पैसा किंवा काही वस्तू ठेवण्यासाठी दिल्या आणि जर ते सर्व त्याच्या घरातून चोरीस गेले, तर चोर सापडल्यावर त्याच्या दुप्पट किंमत चोराने भरून द्यावी. 8 परंतु जर चोर सापडला नाही, तर घरमालकाला देवासमोर घेऊन * न्यायाधीशासमोर जावे म्हणजे मग त्याने स्वतः त्या वस्तुला हात लावला की नाही त्याचा न्याय होईल. 9 जर हरवलेला एखादा बैल, एखादे गाढव, मेंढरू किंवा वस्त्र यांच्यासंबंधी दोन मनुष्यात वाद उत्पन्न झाला, आणि ती माझी आहे अशी कोणी तक्रार केली तर त्या हक्क सांगणाऱ्या दोन्ही पक्षांनी देवासमोर न्यायाधीशासमोर यावे; ज्याला देव दोषी ठरवील त्याने आपल्या शेजाऱ्याला तिच्याबद्दल दुप्पट बदला द्यावा. 10 एखाद्याने आपले गाढव, बैल, किंवा मेंढरू थोडे दिवस सांभाळण्याकरता आपल्या शेजाऱ्याकडे दिले, परंतु ते जर मरण पावले, किंवा जखमी झाले किंवा कोणी पाहत नसताना पकडून नेले; 11 तर त्या दोघांमध्ये परमेश्वराची शपथ व्हावी. आपण शेजाऱ्याच्या मालमत्तेला हात लावला नाही असे सांगितले तर त्या जनावराच्या मालकाने त्याच्या शपथेवर विश्वास ठेवावा; मग त्या शेजाऱ्याला जनावराची किंमत भरून द्यावी लागणार नाही. 12 त्याच्यापासून खरोखर ते चोरीस गेले असेल तर त्याची किंमत मालकाला भरून द्यावी. 13 जर ते जनावर कोणी मारून टाकले असेल तर ते पुराव्यादाखल आणून दाखवावे म्हणजे त्यास भरपाई भरून द्यावी लागणार नाही. 14 जर कोणी आपल्या शेजाऱ्याकडून त्याचे जनावर मागून घेतले मालक तेथे हजर नसताना त्या जनावराला जर इजा झाली किंवा ते मरण पावले तर त्या मालकाला त्याची किंमत अवश्य भरून द्यावी; 15 जर त्या वेळी तेथे जनावराजवळ मालक असेल तर मग भरपाई करावी लागणार नाही; किंवा ते जनावर भाड्याने घेतले असले तर त्याचे नुकसान भाड्यातच आले आहे. समाजातील जबाबदारी 16 आणि मागणी झाली नाही अशा कुमारिकेला फसवून जर कोणी तिला भ्रष्ट केले तर त्याने पूर्ण देज देऊन तिच्याशी लग्न केलेच पाहिजे; 17 तिच्या पित्याने त्यास ती देण्यास नकार दिला तर भ्रष्ट करणाऱ्याने तिच्या पित्याला कुमारिकेच्या रीतीप्रमाणे पैसा तोलून द्यावा. 18 कोणत्याही चेटकिणीला जिवंत ठेवू नये. 19 पशुगमन करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे. 20 परमेश्वराशिवाय दुसऱ्या दैवतांना बली करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे. 21 उपऱ्याचा छळ करू नये किंवा त्याच्यावर जुलूम करू नको. कारण मिसर देशात तुम्हीही उपरी होता. 22 विधवा किंवा अनाथ यांना तुम्ही जाचू नका 23 तुम्ही त्यांना कोणत्याही रीतीने जाचाल आणि ती मला हाक मारतील तर मी त्यांचे ओरडणे अवश्य ऐकेन; 24 व माझा राग तुम्हावर भडकेल व मी तुम्हास तलवारीने मारून टाकीन म्हणजे तुमच्या स्रिया विधवा व तुमची मुले पोरकी होतील. 25 तुझ्याजवळ राहणाऱ्या माझ्या एखाद्या गरीब मनुष्यास तुम्ही उसने पैसे दिले तर त्याबद्दल तुम्ही व्याज आकारू नये. 26 तू आपल्या शेजाऱ्याचे पांघरुण तुझ्याजवळ गहाण ठेवून घेतले तर सूर्य मावळण्याआधी तू त्याचे पांघरुण त्यास परत करावे; 27 कारण त्याचे अंग झाकायला तेवढेच असणार. ते घेतले तर तो काय पांघरूण निजेल? त्याने गाऱ्हाणे केले तर मी त्याचे ऐकेन, कारण मी करुणामय आहे. 28 तू आपल्या देवाची निंदा करू नको किंवा तुझ्या लोकांच्या राज्यकर्त्याला शाप देऊ नको. 29 आपल्या हंगामातले व आपल्या फळांच्या रसातले मला अर्पण करण्यास हयगय करू नको. तुझा प्रथम जन्मलेला पुत्र मला द्यावा; 30 तसेच प्रथम जन्मलेले बैल व मेंढरे, यांना जन्मल्यापासून सात दिवस त्यांच्या आईजवळ ठेवावे व आठव्या दिवशी ते मला द्यावेत. 31 तुम्ही माझे पवित्र लोक आहात म्हणून फाडून टाकलेल्या पशूंचे मांस तुम्ही खाऊ नये; ते कुत्र्यांना घालावे.
Total 40 अध्याय, Selected धडा 22 / 40
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References