मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
निर्गम
1. {#1इस्त्राएल लोकांनी आणायचे दान [BR]निर्ग. 35:4-9 } [PS]परमेश्वर मोशेला म्हणाला,
2. “इस्राएल लोकांस माझ्यासाठी अर्पणे आणायला सांग. ज्या कोणाची माझ्यासाठी मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून ही अर्पणे तू माझ्यासाठी स्वीकारावी.
3. त्यांच्याकडून तू माझ्याकरिता घ्यावयाच्या वस्तूंच्या अर्पणाची यादी अशी: सोने, चांदी, पितळ;
4. निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि तलम सणाचे कापड; बकऱ्याचे केस;
5. लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी; तहशाची [* एक समुद्री प्राणी ]कातडी, बाभळीचे लाकूड;
6. दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले;
7. एफोद व ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने.”
8. मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान तयार करावे.
9. निवासमंडप कसा असावा त्याचा नमुना व त्यातील वस्तू कशा असाव्यात त्यांचा नमुना मी तुला दाखवीन. त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही तो तयार करावा. [PE]
10. {#1साक्षीचा कोश [BR]निर्ग. 37:1-9 } [PS]“बाभळीच्या लाकडाची एक पेटी तयार करावी; त्याची लांबी अडीच हात, रुंदी दीड हात व उंची दीड हात असावी.
11. तो आतून बाहेरून शुध्द सोन्याने मढवावा आणि त्याच्यावर सभोवती शुद्ध सोन्याचा काठ करावा.
12. त्याच्या चारही पायांना लावण्यासाठी सोन्याच्या चार गोल कड्या ओतून एकाबाजूला दोन व दुसऱ्या बाजूला दोन अशा लावाव्या.
13. बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व तेही सोन्याने मढवावेत
14. कोशाच्या कोपऱ्यांवरील गोल कड्यांमध्ये दांडे घालून मग तो वाहून न्यावा.
15. हे दांडे कोशाच्या कड्यातच कायम तसेच राहू द्यावेत, ते काढून घेऊ नयेत.”
16. देव म्हणाला, मी तुला साक्षपट देईन तोही त्या कोशात ठेवावा.
17. मग शुद्ध सोन्याचे एक दयासन बनवावे; त्याची लांबी अडीच हात, रूंदी दीड हात असावी;
18. मग सोन्याचे घडीव काम करून दोन करुब करून ते दयासनाच्या दोन्ही टोकांना ठेवावेत.
19. एक करुब एका बाजूला व दुसरा करुब दुसऱ्या बाजूला असे दयासनाशी एकत्र जोडून अखंड सोन्याचे घडवावेत.
20. त्या करुबांचे पंख आकाशाकडे वर पसरलेले असावेत व त्यांच्या पंखांनी दयासन झाकलेले असावे; त्याची तोंडे समोरासमोर असावीत व त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी.
21. दयासन कोशावर ठेवावे. मी तुला जो साक्षपट देईन तो तू त्या कोशात ठेवावा;
22. तेथे मी तुला भेटत जाईन. दयासनावरून त्या साक्षपटाच्या कोशावरील ठेवलेल्या दोन्ही करुबामधून मी तुझ्याशी बोलेन आणि तेथूनच मी इस्राएल लोकांसाठी माझ्या सर्व आज्ञा देईन. [PE]
23. {#1समक्षतेच्या भाकरींसाठी मेज [BR]निर्ग. 37:10-16 } [PS]बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनवावे; त्याची लांबी दोन हात, रूंदी एक हात व उंची दीड हात असावी.
24. ते शुद्ध सोन्याने मढवावे, व त्याच्या भोवती सोन्याचा काठ करावा.
25. मग चार बोटे रुंदीची एक चौकट बनवावी व सोन्याचा काठ तिच्यावर ठेवावा.
26. मग सोन्याच्या चार गोल कड्या बनवून त्या मेजाच्या चार पायांच्या कोपऱ्यांना लावाव्यात.
27. या कड्या मेजाच्या वरच्या भागा भोवती चौकटीच्या जवळ ठेवाव्यात. मेज वाहून नेण्यासाठी या कड्यांमध्ये दांडे घालावे.
28. मेज वाहून नेण्यासाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवावेत व ते सोन्याने मढवावेत.
29. मेजावरची तबके, धूपपात्रे, सुरया व पेयार्पणे ओतण्याकरता वाट्या बनव. ही शुद्ध सोन्याची असावीत.
30. माझ्यापुढे मेजावर समक्षतेची भाकर नेहमी ठेवावी. [PE]
31. {#1सोन्याचा दीपवृक्ष [BR]निर्ग. 37:17-24 } [PS]शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तयार कर, हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. त्याची बैठक व त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याच्या कळ्या व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी.
32. त्या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा असाव्यात.
33. प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलांसारख्या तीन तीन वाट्या या कळ्याफुलांसह असाव्यात.
34. या दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या कळ्या पाकळ्यासहीत असलेल्या फुलाप्रमाणे असाव्यात.
35. या दीपवृक्षावर निघणाऱ्या सहा शाखांपैकी दोन दोन शाखा, त्याच्याखाली असलेले एकएक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची असावी.
36. त्याची बोंडे व त्याच्या शाखा ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी. तो सबंध दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा एकच घडीव तुकडा असावा.
37. मग या दीपवृक्षावर सात दिवे बसवावेत म्हणजे त्या दिव्यातून दीपवृक्षाच्या समोरील भागावर प्रकाश पडेल.
38. दिवे मालवण्याचे चिमटे व त्यांच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची असावीत.
39. हा दीपवृक्ष त्याच्या सर्व उपकरणासहीत एक किक्कार[† साधारण 34 किलोग्राम ] शुद्ध सोन्याचा करावा;
40. आणि मी तुला पर्वतावर दाखवलेल्या नमुन्याप्रमाणेच या सर्व वस्तू बनविण्याकडे तू लक्ष दे. [PE]
Total 40 अध्याय, Selected धडा 25 / 40
इस्त्राएल लोकांनी आणायचे दान
निर्ग. 35:4-9

1 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “इस्राएल लोकांस माझ्यासाठी अर्पणे आणायला सांग. ज्या कोणाची माझ्यासाठी मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून ही अर्पणे तू माझ्यासाठी स्वीकारावी. 3 त्यांच्याकडून तू माझ्याकरिता घ्यावयाच्या वस्तूंच्या अर्पणाची यादी अशी: सोने, चांदी, पितळ; 4 निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि तलम सणाचे कापड; बकऱ्याचे केस; 5 लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी; तहशाची * एक समुद्री प्राणी कातडी, बाभळीचे लाकूड; 6 दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले; 7 एफोद व ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने.” 8 मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान तयार करावे. 9 निवासमंडप कसा असावा त्याचा नमुना व त्यातील वस्तू कशा असाव्यात त्यांचा नमुना मी तुला दाखवीन. त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही तो तयार करावा. साक्षीचा कोश
निर्ग. 37:1-9

10 “बाभळीच्या लाकडाची एक पेटी तयार करावी; त्याची लांबी अडीच हात, रुंदी दीड हात व उंची दीड हात असावी. 11 तो आतून बाहेरून शुध्द सोन्याने मढवावा आणि त्याच्यावर सभोवती शुद्ध सोन्याचा काठ करावा. 12 त्याच्या चारही पायांना लावण्यासाठी सोन्याच्या चार गोल कड्या ओतून एकाबाजूला दोन व दुसऱ्या बाजूला दोन अशा लावाव्या. 13 बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व तेही सोन्याने मढवावेत 14 कोशाच्या कोपऱ्यांवरील गोल कड्यांमध्ये दांडे घालून मग तो वाहून न्यावा. 15 हे दांडे कोशाच्या कड्यातच कायम तसेच राहू द्यावेत, ते काढून घेऊ नयेत.” 16 देव म्हणाला, मी तुला साक्षपट देईन तोही त्या कोशात ठेवावा. 17 मग शुद्ध सोन्याचे एक दयासन बनवावे; त्याची लांबी अडीच हात, रूंदी दीड हात असावी; 18 मग सोन्याचे घडीव काम करून दोन करुब करून ते दयासनाच्या दोन्ही टोकांना ठेवावेत. 19 एक करुब एका बाजूला व दुसरा करुब दुसऱ्या बाजूला असे दयासनाशी एकत्र जोडून अखंड सोन्याचे घडवावेत. 20 त्या करुबांचे पंख आकाशाकडे वर पसरलेले असावेत व त्यांच्या पंखांनी दयासन झाकलेले असावे; त्याची तोंडे समोरासमोर असावीत व त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी. 21 दयासन कोशावर ठेवावे. मी तुला जो साक्षपट देईन तो तू त्या कोशात ठेवावा; 22 तेथे मी तुला भेटत जाईन. दयासनावरून त्या साक्षपटाच्या कोशावरील ठेवलेल्या दोन्ही करुबामधून मी तुझ्याशी बोलेन आणि तेथूनच मी इस्राएल लोकांसाठी माझ्या सर्व आज्ञा देईन. समक्षतेच्या भाकरींसाठी मेज
निर्ग. 37:10-16

23 बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनवावे; त्याची लांबी दोन हात, रूंदी एक हात व उंची दीड हात असावी. 24 ते शुद्ध सोन्याने मढवावे, व त्याच्या भोवती सोन्याचा काठ करावा. 25 मग चार बोटे रुंदीची एक चौकट बनवावी व सोन्याचा काठ तिच्यावर ठेवावा. 26 मग सोन्याच्या चार गोल कड्या बनवून त्या मेजाच्या चार पायांच्या कोपऱ्यांना लावाव्यात. 27 या कड्या मेजाच्या वरच्या भागा भोवती चौकटीच्या जवळ ठेवाव्यात. मेज वाहून नेण्यासाठी या कड्यांमध्ये दांडे घालावे. 28 मेज वाहून नेण्यासाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवावेत व ते सोन्याने मढवावेत. 29 मेजावरची तबके, धूपपात्रे, सुरया व पेयार्पणे ओतण्याकरता वाट्या बनव. ही शुद्ध सोन्याची असावीत. 30 माझ्यापुढे मेजावर समक्षतेची भाकर नेहमी ठेवावी. सोन्याचा दीपवृक्ष
निर्ग. 37:17-24

31 शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तयार कर, हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. त्याची बैठक व त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याच्या कळ्या व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी. 32 त्या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा असाव्यात. 33 प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलांसारख्या तीन तीन वाट्या या कळ्याफुलांसह असाव्यात. 34 या दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या कळ्या पाकळ्यासहीत असलेल्या फुलाप्रमाणे असाव्यात. 35 या दीपवृक्षावर निघणाऱ्या सहा शाखांपैकी दोन दोन शाखा, त्याच्याखाली असलेले एकएक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची असावी. 36 त्याची बोंडे व त्याच्या शाखा ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी. तो सबंध दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा एकच घडीव तुकडा असावा. 37 मग या दीपवृक्षावर सात दिवे बसवावेत म्हणजे त्या दिव्यातून दीपवृक्षाच्या समोरील भागावर प्रकाश पडेल. 38 दिवे मालवण्याचे चिमटे व त्यांच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची असावीत. 39 हा दीपवृक्ष त्याच्या सर्व उपकरणासहीत एक किक्कार साधारण 34 किलोग्राम शुद्ध सोन्याचा करावा; 40 आणि मी तुला पर्वतावर दाखवलेल्या नमुन्याप्रमाणेच या सर्व वस्तू बनविण्याकडे तू लक्ष दे.
Total 40 अध्याय, Selected धडा 25 / 40
×

Alert

×

Marathi Letters Keypad References