मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
निर्गम
1. {अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचे समर्पण} [PS] त्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी तू काय करावेस ते मी तुला सांगतो: एक गोऱ्हा व दोन निर्दोष मेंढे घ्यावेत;
2. बेखमीर भाकरी, तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या व तेल लावलेल्या बेखमीर चपात्या घ्याव्यात; या सर्व सपिठाच्या असाव्यात.
3. त्या सर्व एका टोपलीत घालून ती टोपली त्याचप्रमाणे तो गोऱ्हा व ते दोन मेंढे ह्यांच्यासहीत ती टोपली घेऊन ये.
4. अहरोन व त्याचे पुत्र यांना दर्शनमंडपाच्या दारासमोर घेऊन यावे; त्यांना आंघोळ घालावी;
5. ती वस्रे घेऊन अहरोनाला त्याचा अंगरखा व एफोदाचा झगा घाल; त्यास एफोद व ऊरपट बांधावा आणि एफोदाचा बेलबुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेला बांध;
6. त्याच्या डोक्याला मंदिल घाल. आणि मंदिलावर पवित्र मुकुट ठेव [* मंदिलावर पवित्र मुकुट ठेव ] .
7. नंतर अभिषेकाचे तेल त्याच्या डोक्यावर ओतून त्यास अभिषेक कर;
8. मग त्याच्या पुत्रांना जवळ बोलावून त्यांना अंगरखे घालावेत;
9. आणि अहरोनाला व त्याच्या पुत्रांना कमरबंद बांध व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधावेत; अशा प्रकारे या विधीने त्यांचे याजकपद कायमचे राहील, ह्याप्रमाणे अहरोन व त्याची मुले ह्यांच्यावर संस्कार करावेत
10. नंतर तो गोऱ्हा दर्शनमंडपासमोर आणावा आणि अहरोन व त्याची मुले यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत.
11. मग तेथेच परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी त्या गोऱ्ह्याचा वध करावा;
12. मग गोऱ्ह्याचे थोडे रक्त घेऊन ते आपल्या बोटांनी वेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे सगळे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
13. मग त्याच्या आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील पडदा आणि दोन्ही गुरदे व त्यांच्यावरील चरबी ही सर्व घेऊन त्याचा वेदीवर होम करावा.
14. पण गोऱ्ह्याचे मांस, कातडे व शेण ही छावणीबाहेर नेऊन आगीत जाळून टाकावी; हा पापार्पणाचा बली होय.
15. मग अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात एका मेंढ्याच्या डोक्यावर ठेवावेत;
16. आणि तो मेंढा वधावा; व त्याचे रक्त वेदीच्या चारही बाजूस टाकावे.
17. मेंढा कापल्यानंतर त्याचे तुकडे करावेत; मग त्याची आतडी व पाय धुऊन ते, त्याचे तुकडे व डोके यांच्यासह वेदीवर ठेवावेत;
18. त्यानंतर वेदीवर सबंध मेंढ्याचा होम करावा. हे परमेश्वराकरता होमार्पण होय. हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय;
19. नंतर अहरोन व त्याच्या मुलांनी दुसऱ्या मेंढ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत;
20. मग तो मेंढा वधावा व त्याच्या रक्तातून थोडे रक्त घेऊन ते अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या उजव्या कानांच्या पाळ्यांना व त्यांच्या उजव्या हातांच्या व उजव्या पायांच्या अंगठ्यांना लावावे आणि बाकीचे रक्त वेदीवर चार बाजूंना शिंपडावे.
21. नंतर वेदीवरील रक्त आणि अभिषेकाचे तेल यांतले काही घेऊन अहरोनावर व त्याच्या वस्रावर तसेच त्याच्या पुत्रावर व त्यांच्या वस्रांवरही शिंपडावे; अशाने तो व त्याची वस्र आणि त्याच्याबरोबर त्याची मुले व त्यांची वस्रे पवित्र होतील.
22. तो मेंढा संस्काराचा आहे म्हणून त्याची चरबी, आणि त्याची चरबीदार शेपूट व त्याच्या आतड्यावरील चरबी व काळजावरील पडदा, दोन्ही गुरदे व त्याच्यावरील चरबी आणि उजवी मांडी ही घे;
23. त्याचप्रमाणे परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतून एक भाकर, तेलात मळलेल्या सपिठाची एक पोळी व एक चपाती घ्यावी
24. आणि ते सर्व अहरोन व त्याच्या पुत्रांच्या हातावर ठेव व हे ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळ.
25. मग त्या सर्व वस्तू त्यांच्या हातातून घेऊन मेंढ्यासह परमेश्वरासमोर सुवासिक मधुर सुगंध म्हणून वेदीवरील होमार्पणावर त्यांचा होम करावा; ते परमेश्वरास अर्पिलेले सुवासिक हव्य होय.
26. मग अहरोनाच्या संस्कारासाठी वधिलेल्या मेंढ्यांचे ऊर घेऊन ओवाळणीचे अर्पण ते परमेश्वरासमोर ओवाळ, तो तुझा हिस्सा आहे.
27. नंतर अहरोन व त्याचे पुत्र यांच्या संस्कारासाठी वधिलेल्या मेंढ्यांचे ओवाळलेले ऊर व समर्पिलेली मांडी तू पवित्र करावी.
28. इस्राएल लोकांकडून मिळणारा अहरोनाचा व त्याच्या पुत्रांचा हा निरंतरचा हक्क आहे. कारण हे समर्पित केलेले दान आहे. हे इस्राएलाकडून त्यांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञांपैकी परमेश्वराकरता समर्पित केलेले दान होय.
29. अहरोनाची पवित्र वस्रे त्याच्यानंतर त्याच्या पुत्रपौत्रांसाठी असावी, म्हणजे या वस्रांनिशी त्यांचा अभिषेक होऊन त्यांच्यावर संस्कार व्हावा.
30. अहरोनाच्या जागी त्याचा जो पुत्र याजक होईल त्याने पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी दर्शनमंडपामध्ये जाताना ती वस्रे सात दिवस घालावीत.
31. समर्पण विधीसाठी वध केलेल्या मेंढ्याचे मांस घेऊन ते पवित्र जागी शिजवावे;
32. अहरोन व त्याच्या मुलांनी त्या मेंढ्याचे मांस आणि टोपलीतील भाकर दर्शनमंडपाच्या दारापाशी खावी;
33. त्यांचा संस्कार व पवित्रीकरण ह्यासाठी ज्या पदार्थांनी प्रायश्चित्त [† पापक्षमेसाठी ] झाले ते पदार्थ त्यांनी खावे. पण कोणी परक्याने ते खाऊ नयेत. कारण ते पदार्थ पवित्र आहेत.
34. समर्पित केलेल्या मांसातले किंवा भाकरीतले जर काही सकाळपर्यंत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे, ते खाऊ नये कारण ते पवित्र आहे;
35. मी तुला आज्ञा केली आहे त्या सर्व गोष्टीप्रमाणे अहरोन व त्याचे पुत्र यांचे कर. सात दिवसपर्यंत त्यांच्यावर संस्कार कर.
36. प्रायश्चित्तासाठी पापबली म्हणून एक गोऱ्हा या प्रत्येक दिवशी बली दे. आणि वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती पवित्र कर आणि ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक कर.
37. सातही दिवस वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती पवित्र कर म्हणजे वेदी परमपवित्र होईल, ज्याचा वेदीला स्पर्श होईल ते पवित्र होईल. गण. 28:1-8 [PE][PS]
38. {दररोज करायची होमार्पणे} [PS] वेदीवर होम करायचा तो असा: प्रतिदिनी एकएक वर्षाच्या दोन कोकरांचा नेहमी होम करावा.
39. एका कोकराचा सकाळी व दुसऱ्या कोकराचा संध्याकाळी होम करावा.
40. कुटून काढलेल्या पाव हिन [‡ साधारण 1 लिटर] तेलात एक दशमांश माप सपीठ मळून ते एका कोकराबरोबर अर्पावे आणि पाव हिन द्राक्षरसाचे पेयार्पण करावे.
41. आणि संध्याकाळी दुसरे कोकरू अर्पावे व त्याच्याबरोबरही सकाळच्याप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पण करावे; हे परमेश्वरास प्रिय असे सुवासिक हव्य होय.
42. दर्शनमंडपाच्या दारापाशी दररोज परमेश्वरासमोर तुम्ही पिढ्यानपिढ्या असेच होमार्पण करीत रहावे; या ठिकाणी मी तुमच्याशी बोलण्यासाठी तुम्हास भेटेन.
43. त्या ठिकाणी मी इस्राएल लोकांस भेटेन आणि माझ्या तेजाने मंडप पवित्र होईल.
44. “ह्याप्रमाणे मी दर्शनमंडप व वेदी पवित्र करीन आणि अहरोन व त्याच्या पुत्रांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून मी त्यांनाही पवित्र करीन.
45. मी इस्राएल लोकांमध्ये राहीन आणि त्यांचा देव होईन.
46. आणि लोकांस समजेल की मी त्यांचा देव परमेश्वर आहे; मला त्यांच्याबरोबर राहता यावे म्हणून मीच त्यांना मिसर देशातून सोडवून आणले आहे हे त्यांना कळेल; मी त्यांचा देव परमेश्वर आहे.” [PE]

Notes

No Verse Added

Total 40 अध्याय, Selected धडा 29 / 40
निर्गम 29:17
अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचे समर्पण 1 त्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी तू काय करावेस ते मी तुला सांगतो: एक गोऱ्हा व दोन निर्दोष मेंढे घ्यावेत; 2 बेखमीर भाकरी, तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या व तेल लावलेल्या बेखमीर चपात्या घ्याव्यात; या सर्व सपिठाच्या असाव्यात. 3 त्या सर्व एका टोपलीत घालून ती टोपली त्याचप्रमाणे तो गोऱ्हा व ते दोन मेंढे ह्यांच्यासहीत ती टोपली घेऊन ये. 4 अहरोन व त्याचे पुत्र यांना दर्शनमंडपाच्या दारासमोर घेऊन यावे; त्यांना आंघोळ घालावी; 5 ती वस्रे घेऊन अहरोनाला त्याचा अंगरखा व एफोदाचा झगा घाल; त्यास एफोद व ऊरपट बांधावा आणि एफोदाचा बेलबुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेला बांध; 6 त्याच्या डोक्याला मंदिल घाल. आणि मंदिलावर पवित्र मुकुट ठेव * मंदिलावर पवित्र मुकुट ठेव . 7 नंतर अभिषेकाचे तेल त्याच्या डोक्यावर ओतून त्यास अभिषेक कर; 8 मग त्याच्या पुत्रांना जवळ बोलावून त्यांना अंगरखे घालावेत; 9 आणि अहरोनाला व त्याच्या पुत्रांना कमरबंद बांध व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधावेत; अशा प्रकारे या विधीने त्यांचे याजकपद कायमचे राहील, ह्याप्रमाणे अहरोन व त्याची मुले ह्यांच्यावर संस्कार करावेत 10 नंतर तो गोऱ्हा दर्शनमंडपासमोर आणावा आणि अहरोन व त्याची मुले यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत. 11 मग तेथेच परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी त्या गोऱ्ह्याचा वध करावा; 12 मग गोऱ्ह्याचे थोडे रक्त घेऊन ते आपल्या बोटांनी वेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे सगळे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे. 13 मग त्याच्या आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील पडदा आणि दोन्ही गुरदे व त्यांच्यावरील चरबी ही सर्व घेऊन त्याचा वेदीवर होम करावा. 14 पण गोऱ्ह्याचे मांस, कातडे व शेण ही छावणीबाहेर नेऊन आगीत जाळून टाकावी; हा पापार्पणाचा बली होय. 15 मग अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात एका मेंढ्याच्या डोक्यावर ठेवावेत; 16 आणि तो मेंढा वधावा; व त्याचे रक्त वेदीच्या चारही बाजूस टाकावे. 17 मेंढा कापल्यानंतर त्याचे तुकडे करावेत; मग त्याची आतडी व पाय धुऊन ते, त्याचे तुकडे व डोके यांच्यासह वेदीवर ठेवावेत; 18 त्यानंतर वेदीवर सबंध मेंढ्याचा होम करावा. हे परमेश्वराकरता होमार्पण होय. हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय; 19 नंतर अहरोन व त्याच्या मुलांनी दुसऱ्या मेंढ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत; 20 मग तो मेंढा वधावा व त्याच्या रक्तातून थोडे रक्त घेऊन ते अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या उजव्या कानांच्या पाळ्यांना व त्यांच्या उजव्या हातांच्या व उजव्या पायांच्या अंगठ्यांना लावावे आणि बाकीचे रक्त वेदीवर चार बाजूंना शिंपडावे. 21 नंतर वेदीवरील रक्त आणि अभिषेकाचे तेल यांतले काही घेऊन अहरोनावर व त्याच्या वस्रावर तसेच त्याच्या पुत्रावर व त्यांच्या वस्रांवरही शिंपडावे; अशाने तो व त्याची वस्र आणि त्याच्याबरोबर त्याची मुले व त्यांची वस्रे पवित्र होतील. 22 तो मेंढा संस्काराचा आहे म्हणून त्याची चरबी, आणि त्याची चरबीदार शेपूट व त्याच्या आतड्यावरील चरबी व काळजावरील पडदा, दोन्ही गुरदे व त्याच्यावरील चरबी आणि उजवी मांडी ही घे; 23 त्याचप्रमाणे परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतून एक भाकर, तेलात मळलेल्या सपिठाची एक पोळी व एक चपाती घ्यावी 24 आणि ते सर्व अहरोन व त्याच्या पुत्रांच्या हातावर ठेव व हे ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळ. 25 मग त्या सर्व वस्तू त्यांच्या हातातून घेऊन मेंढ्यासह परमेश्वरासमोर सुवासिक मधुर सुगंध म्हणून वेदीवरील होमार्पणावर त्यांचा होम करावा; ते परमेश्वरास अर्पिलेले सुवासिक हव्य होय. 26 मग अहरोनाच्या संस्कारासाठी वधिलेल्या मेंढ्यांचे ऊर घेऊन ओवाळणीचे अर्पण ते परमेश्वरासमोर ओवाळ, तो तुझा हिस्सा आहे. 27 नंतर अहरोन व त्याचे पुत्र यांच्या संस्कारासाठी वधिलेल्या मेंढ्यांचे ओवाळलेले ऊर व समर्पिलेली मांडी तू पवित्र करावी. 28 इस्राएल लोकांकडून मिळणारा अहरोनाचा व त्याच्या पुत्रांचा हा निरंतरचा हक्क आहे. कारण हे समर्पित केलेले दान आहे. हे इस्राएलाकडून त्यांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञांपैकी परमेश्वराकरता समर्पित केलेले दान होय. 29 अहरोनाची पवित्र वस्रे त्याच्यानंतर त्याच्या पुत्रपौत्रांसाठी असावी, म्हणजे या वस्रांनिशी त्यांचा अभिषेक होऊन त्यांच्यावर संस्कार व्हावा. 30 अहरोनाच्या जागी त्याचा जो पुत्र याजक होईल त्याने पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी दर्शनमंडपामध्ये जाताना ती वस्रे सात दिवस घालावीत. 31 समर्पण विधीसाठी वध केलेल्या मेंढ्याचे मांस घेऊन ते पवित्र जागी शिजवावे; 32 अहरोन व त्याच्या मुलांनी त्या मेंढ्याचे मांस आणि टोपलीतील भाकर दर्शनमंडपाच्या दारापाशी खावी; 33 त्यांचा संस्कार व पवित्रीकरण ह्यासाठी ज्या पदार्थांनी प्रायश्चित्त पापक्षमेसाठी झाले ते पदार्थ त्यांनी खावे. पण कोणी परक्याने ते खाऊ नयेत. कारण ते पदार्थ पवित्र आहेत. 34 समर्पित केलेल्या मांसातले किंवा भाकरीतले जर काही सकाळपर्यंत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे, ते खाऊ नये कारण ते पवित्र आहे; 35 मी तुला आज्ञा केली आहे त्या सर्व गोष्टीप्रमाणे अहरोन व त्याचे पुत्र यांचे कर. सात दिवसपर्यंत त्यांच्यावर संस्कार कर. 36 प्रायश्चित्तासाठी पापबली म्हणून एक गोऱ्हा या प्रत्येक दिवशी बली दे. आणि वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती पवित्र कर आणि ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक कर. 37 सातही दिवस वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती पवित्र कर म्हणजे वेदी परमपवित्र होईल, ज्याचा वेदीला स्पर्श होईल ते पवित्र होईल. गण. 28:1-8 दररोज करायची होमार्पणे 38 वेदीवर होम करायचा तो असा: प्रतिदिनी एकएक वर्षाच्या दोन कोकरांचा नेहमी होम करावा. 39 एका कोकराचा सकाळी व दुसऱ्या कोकराचा संध्याकाळी होम करावा. 40 कुटून काढलेल्या पाव हिन साधारण 1 लिटर तेलात एक दशमांश माप सपीठ मळून ते एका कोकराबरोबर अर्पावे आणि पाव हिन द्राक्षरसाचे पेयार्पण करावे. 41 आणि संध्याकाळी दुसरे कोकरू अर्पावे व त्याच्याबरोबरही सकाळच्याप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पण करावे; हे परमेश्वरास प्रिय असे सुवासिक हव्य होय. 42 दर्शनमंडपाच्या दारापाशी दररोज परमेश्वरासमोर तुम्ही पिढ्यानपिढ्या असेच होमार्पण करीत रहावे; या ठिकाणी मी तुमच्याशी बोलण्यासाठी तुम्हास भेटेन. 43 त्या ठिकाणी मी इस्राएल लोकांस भेटेन आणि माझ्या तेजाने मंडप पवित्र होईल. 44 “ह्याप्रमाणे मी दर्शनमंडप व वेदी पवित्र करीन आणि अहरोन व त्याच्या पुत्रांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून मी त्यांनाही पवित्र करीन. 45 मी इस्राएल लोकांमध्ये राहीन आणि त्यांचा देव होईन. 46 आणि लोकांस समजेल की मी त्यांचा देव परमेश्वर आहे; मला त्यांच्याबरोबर राहता यावे म्हणून मीच त्यांना मिसर देशातून सोडवून आणले आहे हे त्यांना कळेल; मी त्यांचा देव परमेश्वर आहे.”
Total 40 अध्याय, Selected धडा 29 / 40
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References