मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
निर्गम
1. {#1कोशाची रचना [BR]निर्ग. 25:10-22 } [PS]बसालेलने बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवला; तो अडीच हात लांब, दीड हात रुंद व दीड हात उंच होता.
2. त्याने तो आतून बाहेरून शुद्ध सोन्याने मढवला आणि त्यासभोवती सोन्याचा कंगोरा केला.
3. त्याच्या चाऱ्ही पायांना लावण्यासाठी त्याने सोन्याच्या चार कड्या ओतून एका बाजूला दोन व दुसऱ्या बाजूला दोन अशा लावल्या.
4. त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून ते शुद्ध सोन्याने मढवले.
5. कोश उचलण्यासाठी ते दांडे त्याने त्याच्या दोन्ही बाजूंच्या कड्यांत घातले.
6. नंतर त्याने शुद्ध सोन्याचे दयासन [* झाकण ]बनविले; ते अडीच हात लांब व दीड हात रुंद होते.
7. बसालेलने सोने घडवून दोन करुब बनवले. ते दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी बनवले.
8. त्याने एक करुब एका टोकासाठी व दुसरा करुब दुसऱ्या टोकासाठी बनवला. करुब व दयासन अखंड असून ते त्याने दोन्ही टोकांना बनवले.
9. त्या करुबांचे पंख वर असे पसरले होते की त्यांनी ते दयासन झाकले होते; त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली होती. [PE]
10. {#1मेजाची रचना [BR]निर्ग. 25:23-30 } [PS]त्याने बाभळीच्या लाकडाचे मेज बनविले, ते दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात उंच होते.
11. त्याने ते शुद्ध सोन्याने मढवले व त्यासभोवती सोन्याचा कंगोरा केला;
12. आणि त्याने त्याच्यासाठी चार बोटे रुंदीची एक पाळ केली व त्या पाळीस सभोवती सोन्याचा कंगोरा केला.
13. त्याच्यासाठी सोन्याच्या चार गोल कड्या ओतून तयार केल्या व त्याच्या चाऱ्ही पायावरच्या चार कोपऱ्यांना त्या लावल्या.
14. या गोल कड्या त्या पाळीजवळ ठेवल्या, त्या मेज उचलावयाच्या दांड्यासाठी होत्या.
15. मेज उचलण्यासाठी त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढवले;
16. नंतर त्याने मेजावरची पात्रे म्हणजे तबके, धूपपात्रे, सुरया व पेयार्पणे ओतण्यासाठी कटोरे ही सर्व शुद्ध सोन्याची बनवली. [PE]
17. {#1दीपवुक्षाची रचना [BR]निर्ग. 25:31-40 } [PS]त्याने शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनविला; हा दीपवृक्ष, त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची घडवली.
18. या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा होत्या.
19. प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलासारख्या तीन तीन वाट्या, बोंडाफुलासह केल्या आणि दुसऱ्या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाही बदामाच्या फुलांसारख्या तीन तीन वाट्या बोंडाफुलासारख्या केल्या. दीपवृक्षामधून निघालेल्या सहा शाखांची रचना अशीच होती.
20. दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या बोडांफुलांसह चार वाट्या होत्या.
21. या दीपवृक्षामधून निघणाऱ्या सहा शाखांपैकी दोन दोन शाखा आणि त्यांच्याखाली असलेले प्रत्येकी एक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची होती.
22. शाखा व फुले असलेला हा संपूर्ण दीपवृक्ष शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यातून घडवलेला होता.
23. त्याने त्या दीपावृक्षाचे सात दिवे, त्याचे चिमटे व ताटल्या शुद्ध सोन्याच्या केल्या.
24. त्याने तो दीपवृक्ष व त्याचे बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार[† साधारण 34 किलोग्राम ] शुद्ध सोन्याची बनवली. [PE]
25. {#1धूपवेदीची रचना [BR]निर्ग. 30:1-5 } [PS]मग त्याने बाभळीच्या लाकडाची धूपवेदी केली; ती एक हात लांब, एक हात रुंद व दोन हात उंच अशी चौरस होती; तिची शिंगे अंगचीच होती.
26. त्याने त्या वेदीचा वरचा भाग, तिच्या चाऱ्ही बाजू व तिची शिंगे शुद्ध सोन्याने मढविली व तिला सभोवती सोन्याचा कंगोरा केला;
27. वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालण्याकरता त्याने सोन्याच्या दोन दोन गोल कड्या करून त्या कंगोऱ्यांच्या खाली तिच्या दोन्ही अंगांना लावल्या.
28. त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले. [PE]
29. {#1अभिषेकाचे तेल आणि सुगंधी द्रव्य तयार करण्याची कृती } [PS]नंतर त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांध्याच्या कृतीप्रमाणे केला. [PE]
Total 40 अध्याय, Selected धडा 37 / 40
कोशाची रचना
निर्ग. 25:10-22

1 बसालेलने बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवला; तो अडीच हात लांब, दीड हात रुंद व दीड हात उंच होता. 2 त्याने तो आतून बाहेरून शुद्ध सोन्याने मढवला आणि त्यासभोवती सोन्याचा कंगोरा केला. 3 त्याच्या चाऱ्ही पायांना लावण्यासाठी त्याने सोन्याच्या चार कड्या ओतून एका बाजूला दोन व दुसऱ्या बाजूला दोन अशा लावल्या. 4 त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून ते शुद्ध सोन्याने मढवले. 5 कोश उचलण्यासाठी ते दांडे त्याने त्याच्या दोन्ही बाजूंच्या कड्यांत घातले. 6 नंतर त्याने शुद्ध सोन्याचे दयासन * झाकण बनविले; ते अडीच हात लांब व दीड हात रुंद होते. 7 बसालेलने सोने घडवून दोन करुब बनवले. ते दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी बनवले. 8 त्याने एक करुब एका टोकासाठी व दुसरा करुब दुसऱ्या टोकासाठी बनवला. करुब व दयासन अखंड असून ते त्याने दोन्ही टोकांना बनवले. 9 त्या करुबांचे पंख वर असे पसरले होते की त्यांनी ते दयासन झाकले होते; त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली होती. मेजाची रचना
निर्ग. 25:23-30

10 त्याने बाभळीच्या लाकडाचे मेज बनविले, ते दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात उंच होते. 11 त्याने ते शुद्ध सोन्याने मढवले व त्यासभोवती सोन्याचा कंगोरा केला; 12 आणि त्याने त्याच्यासाठी चार बोटे रुंदीची एक पाळ केली व त्या पाळीस सभोवती सोन्याचा कंगोरा केला. 13 त्याच्यासाठी सोन्याच्या चार गोल कड्या ओतून तयार केल्या व त्याच्या चाऱ्ही पायावरच्या चार कोपऱ्यांना त्या लावल्या. 14 या गोल कड्या त्या पाळीजवळ ठेवल्या, त्या मेज उचलावयाच्या दांड्यासाठी होत्या. 15 मेज उचलण्यासाठी त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढवले; 16 नंतर त्याने मेजावरची पात्रे म्हणजे तबके, धूपपात्रे, सुरया व पेयार्पणे ओतण्यासाठी कटोरे ही सर्व शुद्ध सोन्याची बनवली. दीपवुक्षाची रचना
निर्ग. 25:31-40

17 त्याने शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनविला; हा दीपवृक्ष, त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची घडवली. 18 या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा होत्या. 19 प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलासारख्या तीन तीन वाट्या, बोंडाफुलासह केल्या आणि दुसऱ्या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाही बदामाच्या फुलांसारख्या तीन तीन वाट्या बोंडाफुलासारख्या केल्या. दीपवृक्षामधून निघालेल्या सहा शाखांची रचना अशीच होती. 20 दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या बोडांफुलांसह चार वाट्या होत्या. 21 या दीपवृक्षामधून निघणाऱ्या सहा शाखांपैकी दोन दोन शाखा आणि त्यांच्याखाली असलेले प्रत्येकी एक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची होती. 22 शाखा व फुले असलेला हा संपूर्ण दीपवृक्ष शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यातून घडवलेला होता. 23 त्याने त्या दीपावृक्षाचे सात दिवे, त्याचे चिमटे व ताटल्या शुद्ध सोन्याच्या केल्या. 24 त्याने तो दीपवृक्ष व त्याचे बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार साधारण 34 किलोग्राम शुद्ध सोन्याची बनवली. धूपवेदीची रचना
निर्ग. 30:1-5

25 मग त्याने बाभळीच्या लाकडाची धूपवेदी केली; ती एक हात लांब, एक हात रुंद व दोन हात उंच अशी चौरस होती; तिची शिंगे अंगचीच होती. 26 त्याने त्या वेदीचा वरचा भाग, तिच्या चाऱ्ही बाजू व तिची शिंगे शुद्ध सोन्याने मढविली व तिला सभोवती सोन्याचा कंगोरा केला; 27 वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालण्याकरता त्याने सोन्याच्या दोन दोन गोल कड्या करून त्या कंगोऱ्यांच्या खाली तिच्या दोन्ही अंगांना लावल्या. 28 त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले. अभिषेकाचे तेल आणि सुगंधी द्रव्य तयार करण्याची कृती 29 नंतर त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांध्याच्या कृतीप्रमाणे केला.
Total 40 अध्याय, Selected धडा 37 / 40
×

Alert

×

Marathi Letters Keypad References