मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
निर्गम
1. {निवासमंडप उभारणे आणि त्याचे पवित्रीकरण} [PS] मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
2. “पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दर्शनमंडपाचा निवासमंडप उभा कर.
3. साक्षपटाचा कोश त्यामध्ये ठेव व तू अंतरपटाने कोशाला पडदा घाल.
4. मग मेज आत आणून त्याच्यावरील सामान व्यवस्थित ठेव; नंतर दीपवृक्ष आत नेऊन त्याचे दिवे लाव.
5. साक्षपटाच्या कोशापुढे सोन्याची धूपवेदी ठेव आणि निवासमंडपाच्या दाराचा पडदा लाव.
6. दर्शनमंडपाच्या निवासमंडपाच्या दारापुढे होमवेदी ठेव.
7. दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेव व त्यामध्ये पाणी भर.
8. सभोवती अंगण कर व मग त्याच्या प्रवेशदारापाशी पडदा लाव.
9. अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडपाला व त्यातल्या सर्व वस्तूंना अभिषेक कर व त्याच्या सर्व वस्तू पवित्र कर म्हणजे तो पवित्र होईल.
10. होमवेदी व तिची सर्व उपकरणे यांना अभिषेक करून पवित्र कर म्हणजे ती परमपवित्र होईल.
11. गंगाळ व त्याच्या खालची बैठक ह्यास अभिषेक कर व त्यांना पवित्र कर.
12. अहरोन व त्याचे पुत्र ह्याना दर्शनमंडपाच्या दारापाशी नेऊन त्यांना आंघोळ घाल.
13. अहरोनाला पवित्र वस्रे घाल व त्यास तेलाने अभिषेक करून पवित्र कर, मग तो याजक या नात्याने माझी सेवा करील.
14. त्याच्या पुत्रांनाजवळ बोलावून अंगरखे घाल.
15. त्यांच्या पित्याला जसा अभिषेक करशील त्याप्रमाणेच त्यांना कर म्हणजे याजक या नात्याने ते माझी सेवा करतील; हा त्यांचा अभिषेक त्यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरच्या याजकपदाचा दर्शक होईल.”
16. मोशेने परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्वकाही तसे केले.
17. दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र निवासमंडपाची उभारणी झाली.
18. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने पवित्र निवासमंडप उभा केला; प्रथम त्याने उथळ्या बसवून घेतल्या, मग त्याने त्यांच्यावर फळ्या लावल्या. अडसर लावले व त्यांचे खांब उभे केले;
19. त्यानंतर निवासमंडपावरचा तंबू केला, मग वरच्या तंबूवर त्याने आच्छादन घातले; परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने हे सर्व केले.
20. मोशेने साक्षपट घेऊन कोशात ठेवला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले.
21. त्याने तो कोश निवासमंडपात आणला आणि योग्य ठिकाणी अंतरपट लावून साक्षपटाचा कोश झाकला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
22. मोशेने पवित्र निवासमंडपाच्या उत्तर बाजूला दर्शनमंडपामध्ये पडद्याच्या बाहेर मेज ठेवले;
23. त्याने त्याच्यावर परमेश्वरासमोर समर्पित भाकर ठेवली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
24. त्याने पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूस दर्शनमंडपामध्ये मेजासमोर दीपवृक्ष ठेवला.
25. नंतर त्याने परमेश्वरासमोर दीपवृक्षावर दिवे लावले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
26. त्याने दर्शनमंडपामध्ये अंतरपटासमोर सोन्याची वेदी ठेवली.
27. नंतर त्याने तिच्यावर सुगंधी धूप जाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.
28. त्याने पवित्र निवासमंडपाच्या दाराला पडदा लावला.
29. त्याने पवित्र निवासमंडपाच्या दर्शनमंडपाच्या दारापाशी होमवेदी ठेवली व तिच्यावर होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण केली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
30. त्याने दर्शनमंडप आणि वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेवले व धुण्यासाठी त्यामध्ये पाणी भरले.
31. मोशे, अहरोन व अहरोनाचे पुत्र त्यामध्ये आपआपले हातपाय धूत असत;
32. ते दर्शनमंडप व वेदीपाशी जाताना प्रत्येक वेळेस आपले हातपाय तेथे धूत असत; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी हे केले.
33. त्याने निवास मंडपाभोवती अंगणाची कनात उभी केली व अंगणात वेदी बसवली आणि अंगणाच्या फाटकाला पडदा लावला; या प्रकारे परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने सर्व काम संपविले. [PS]
34. {दर्शनमंडपावरील परमेश्वराची महिमा} [PS] दर्शनमंडपावर मेघाने छाया केली व पवित्र निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला.
35. दर्शनमंडपावर मेघ राहिला व परमेश्वराच्या तेजाने निवासमंडप भरून गेला म्हणून मोशेला आत जाता येईना.
36. पवित्र निवास मंडपावरील मेघ वर जाई तेव्हा इस्राएल लोक आपला पुढील प्रवास सुरू करीत;
37. परंतु तो मेघ निवासमंडपावर असेपर्यंत लोक तेथून हलत नसत; तो वर जाईपर्यंत ते तेथेच थांबत.
38. परमेश्वराचा मेघ दिवसा निवासमंडपावर राही आणि रात्री त्यामध्ये अग्नी असे त्यामुळे सर्व इस्राएल लोकांस आपल्या प्रवासात तो दिसत असे. [PE]

Notes

No Verse Added

Total 40 Chapters, Current Chapter 40 of Total Chapters 40
निर्गम 40:42
1. {निवासमंडप उभारणे आणि त्याचे पवित्रीकरण} PS मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
2. “पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दर्शनमंडपाचा निवासमंडप उभा कर.
3. साक्षपटाचा कोश त्यामध्ये ठेव तू अंतरपटाने कोशाला पडदा घाल.
4. मग मेज आत आणून त्याच्यावरील सामान व्यवस्थित ठेव; नंतर दीपवृक्ष आत नेऊन त्याचे दिवे लाव.
5. साक्षपटाच्या कोशापुढे सोन्याची धूपवेदी ठेव आणि निवासमंडपाच्या दाराचा पडदा लाव.
6. दर्शनमंडपाच्या निवासमंडपाच्या दारापुढे होमवेदी ठेव.
7. दर्शनमंडप वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेव त्यामध्ये पाणी भर.
8. सभोवती अंगण कर मग त्याच्या प्रवेशदारापाशी पडदा लाव.
9. अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडपाला त्यातल्या सर्व वस्तूंना अभिषेक कर त्याच्या सर्व वस्तू पवित्र कर म्हणजे तो पवित्र होईल.
10. होमवेदी तिची सर्व उपकरणे यांना अभिषेक करून पवित्र कर म्हणजे ती परमपवित्र होईल.
11. गंगाळ त्याच्या खालची बैठक ह्यास अभिषेक कर त्यांना पवित्र कर.
12. अहरोन त्याचे पुत्र ह्याना दर्शनमंडपाच्या दारापाशी नेऊन त्यांना आंघोळ घाल.
13. अहरोनाला पवित्र वस्रे घाल त्यास तेलाने अभिषेक करून पवित्र कर, मग तो याजक या नात्याने माझी सेवा करील.
14. त्याच्या पुत्रांनाजवळ बोलावून अंगरखे घाल.
15. त्यांच्या पित्याला जसा अभिषेक करशील त्याप्रमाणेच त्यांना कर म्हणजे याजक या नात्याने ते माझी सेवा करतील; हा त्यांचा अभिषेक त्यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरच्या याजकपदाचा दर्शक होईल.”
16. मोशेने परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्वकाही तसे केले.
17. दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र निवासमंडपाची उभारणी झाली.
18. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने पवित्र निवासमंडप उभा केला; प्रथम त्याने उथळ्या बसवून घेतल्या, मग त्याने त्यांच्यावर फळ्या लावल्या. अडसर लावले त्यांचे खांब उभे केले;
19. त्यानंतर निवासमंडपावरचा तंबू केला, मग वरच्या तंबूवर त्याने आच्छादन घातले; परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने हे सर्व केले.
20. मोशेने साक्षपट घेऊन कोशात ठेवला कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले.
21. त्याने तो कोश निवासमंडपात आणला आणि योग्य ठिकाणी अंतरपट लावून साक्षपटाचा कोश झाकला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
22. मोशेने पवित्र निवासमंडपाच्या उत्तर बाजूला दर्शनमंडपामध्ये पडद्याच्या बाहेर मेज ठेवले;
23. त्याने त्याच्यावर परमेश्वरासमोर समर्पित भाकर ठेवली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
24. त्याने पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूस दर्शनमंडपामध्ये मेजासमोर दीपवृक्ष ठेवला.
25. नंतर त्याने परमेश्वरासमोर दीपवृक्षावर दिवे लावले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
26. त्याने दर्शनमंडपामध्ये अंतरपटासमोर सोन्याची वेदी ठेवली.
27. नंतर त्याने तिच्यावर सुगंधी धूप जाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.
28. त्याने पवित्र निवासमंडपाच्या दाराला पडदा लावला.
29. त्याने पवित्र निवासमंडपाच्या दर्शनमंडपाच्या दारापाशी होमवेदी ठेवली तिच्यावर होमार्पणे अन्नार्पणे अर्पण केली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
30. त्याने दर्शनमंडप आणि वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेवले धुण्यासाठी त्यामध्ये पाणी भरले.
31. मोशे, अहरोन अहरोनाचे पुत्र त्यामध्ये आपआपले हातपाय धूत असत;
32. ते दर्शनमंडप वेदीपाशी जाताना प्रत्येक वेळेस आपले हातपाय तेथे धूत असत; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी हे केले.
33. त्याने निवास मंडपाभोवती अंगणाची कनात उभी केली अंगणात वेदी बसवली आणि अंगणाच्या फाटकाला पडदा लावला; या प्रकारे परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने सर्व काम संपविले. PS
34. {दर्शनमंडपावरील परमेश्वराची महिमा} PS दर्शनमंडपावर मेघाने छाया केली पवित्र निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला.
35. दर्शनमंडपावर मेघ राहिला परमेश्वराच्या तेजाने निवासमंडप भरून गेला म्हणून मोशेला आत जाता येईना.
36. पवित्र निवास मंडपावरील मेघ वर जाई तेव्हा इस्राएल लोक आपला पुढील प्रवास सुरू करीत;
37. परंतु तो मेघ निवासमंडपावर असेपर्यंत लोक तेथून हलत नसत; तो वर जाईपर्यंत ते तेथेच थांबत.
38. परमेश्वराचा मेघ दिवसा निवासमंडपावर राही आणि रात्री त्यामध्ये अग्नी असे त्यामुळे सर्व इस्राएल लोकांस आपल्या प्रवासात तो दिसत असे. PE
Total 40 Chapters, Current Chapter 40 of Total Chapters 40
×

Alert

×

marathi Letters Keypad References