मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
यहेज्केल
1. {#1देवाचे तेज मंदिरातून निघून जाते } [PS]मग मी पाहिले की करुबीम दुताच्या चार पंख असलेल्या जीवांच्या डोक्याच्या माथ्यावर जे घुमटाच्या आकारासारखे काही होते त्याच्यावर नीलमण्याच्या राजासनाच्या आकृतीसारखे काही माझ्या दृष्टीस पडले.
2. मग परमेश्वर देव तागाचे वस्त्र घातलेल्या पुरुषाशी बोलला आणि म्हणाला, “करुबाच्या खालील चाकाच्या मध्य भागात जा, व आपल्या दोन्ही हातात जळते करुबांच्या मधून कोलीत घे आणि ते शहरावर पसरवून टाक” मग तो पुरुष मी पाहत असताना गेला.
3. करुब घराच्या उजव्या बाजूला उभा राहिला जेव्हा तो पुरुष आत गेली, तेव्हा ढगांनी आतल्या वेशी भरुन गेल्या.
4. परमेश्वर देवाचे गौरव करुबावर उठून घराच्या उंबरठ्यावर आले, आणि वेशी परमेश्वर देवाच्या प्रकाशाने चमकू लागल्या. त्याने घर भरुन गेले आणि वेशी देवाच्या गौरवाने प्रकाशू लागल्या.
5. मग बाहेरील अंगणात करुबाच्या पंखांचा आवाज मी ऐकला, तो सर्वसामर्थी परमेश्वर देवाच्या वाणीसारखा होता. [PE]
6. [PS]मग असे झाले की, तागाचे वस्त्र घातलेल्या पुरुषाला देवाने आज्ञा केली आणि म्हणाला, “करुबांच्या मध्ये असलेल्या चाकांच्या मध्यभागी असलेला विस्तव घे” मग तो पुरुष चाकाच्या बाजूला जाऊन उभा राहीली.
7. एका करुबाने इतर करुबीमांच्यामध्ये जेथे आग आहे, तेथे आपला हात लांब केला आणि ती आग उचलून तागाचे वस्त्र घातलेल्या पुरुषाच्या हाती दिली. तो पुरुष ती आग घेवून तेथून निघून गेला.
8. मी करुबाला पाहिले तो पहा, मनुष्याच्या हातासारखे हात त्याच्या पंखांच्या खाली होते. [PE]
9. [PS]मग मी पाहिले तेव्हा पहा! करुबाच्या बाजूला चार चाके होती, एकेक चाक एकेका करुबीमाच्या शेजारी होते, आणि ती चाके वैडूर्यमण्यांसारखी दिसत होती.
10. ती चारही चाके एकसारखीच दिसत होते, एक चाक दुसऱ्यात असल्यासारखी ती चाके होती.
11. जेव्हा ते चालत ते कोणत्याही एका दिशेला चालत असत; ते चालत असतांना वळण घेत नव्हते, त्यांचे तोंड ज्या दिशेला होते त्याच दिशेने ते सरळ चालत होते. [PE]
12. [PS]त्यांची सर्व शरीरे; त्यांचे हात, पाठ, आणि त्यांचे पंखदेखील डोळ्यांनी झाकलेले होते आणि त्यांच्या सभोवतालची चाकेही डोळ्यांनी झाकलेली होती.
13. जसे मी ऐकले तो त्या चाकांना “गरगर फिरणारी चाके” असे म्हटले गेले.
14. त्यांना प्रत्येकाला चार तोंडे होती; पहिले तोंड करुबाच्या तोंडासारखे होते, दुसरे तोंड मानवाच्या तोंडासारखे होते, तिसरे तोंड सिंहाच्या तोंडासारखे, चौथे तोंड गरुडाच्या तोंडासारखे होते. [PE]
15. [PS]मग करुब प्राणी हे मी खबार नदी शेजारी पाहिले ते उभे झाले.
16. जेव्हा करुब चालत होते, चाके त्याच्या बाजूला चालत होती; आणि जेव्हा करुब उंच उडत होते, चाके पंखांसोबत पृथ्वीच्या वर घेतले जात होते, त्याची चाके हालत नव्हती तर ती स्थिर अशी त्यांच्यासोबत राहत होती.
17. जेव्हा करुब उडत होते, ते चाके बाजूला राहत होती आणि जेव्हा ते उभे राहत चाके उभे राहत होती, त्या जिवंत प्राण्यांचा आत्मा त्या चाकांत होता. [PE]
18. [PS]मग घराच्या उंबरठ्यावरुन परमेश्वर देवाचे गौरव बाहेर करुबावर जाऊन राहीले,
19. तेव्हा करुबाने त्याचे पंख उंच केले आणि माझ्या देखत ते पृथ्वीवरून उडाले, त्यांची चाकेही त्यांच्या बाजूला होती. परमेश्वर देवाच्या पूर्व प्रवेशव्दाराजवळ येऊन उभे झाले आणि मग इस्राएलाच्या देवाचे गौरव त्यांच्यावर वरुन खाली आले. [PE]
20. [PS]मी खबार नदीच्या तीरी इस्राएलाच्या देवाच्या आसनाखाली ज्याला पाहिले तो हाच जिवंत प्राणी होता. मग ते करुब आहेत असे मला कळाले
21. त्या प्रत्येकाला चार तोंडे व चार पंख होते. पंखांच्या खाली मनुष्याच्या हातासारखे हात होते
22. खबार नदी जवळ मी पाहिलेल्या दृष्टांतात होती तसेच त्यांचे चेहरे होते आणि ते प्रत्येक आपापल्या समोर सरळ चालत होते. [PE]
Total 48 अध्याय, Selected धडा 10 / 48
देवाचे तेज मंदिरातून निघून जाते 1 मग मी पाहिले की करुबीम दुताच्या चार पंख असलेल्या जीवांच्या डोक्याच्या माथ्यावर जे घुमटाच्या आकारासारखे काही होते त्याच्यावर नीलमण्याच्या राजासनाच्या आकृतीसारखे काही माझ्या दृष्टीस पडले. 2 मग परमेश्वर देव तागाचे वस्त्र घातलेल्या पुरुषाशी बोलला आणि म्हणाला, “करुबाच्या खालील चाकाच्या मध्य भागात जा, व आपल्या दोन्ही हातात जळते करुबांच्या मधून कोलीत घे आणि ते शहरावर पसरवून टाक” मग तो पुरुष मी पाहत असताना गेला. 3 करुब घराच्या उजव्या बाजूला उभा राहिला जेव्हा तो पुरुष आत गेली, तेव्हा ढगांनी आतल्या वेशी भरुन गेल्या. 4 परमेश्वर देवाचे गौरव करुबावर उठून घराच्या उंबरठ्यावर आले, आणि वेशी परमेश्वर देवाच्या प्रकाशाने चमकू लागल्या. त्याने घर भरुन गेले आणि वेशी देवाच्या गौरवाने प्रकाशू लागल्या. 5 मग बाहेरील अंगणात करुबाच्या पंखांचा आवाज मी ऐकला, तो सर्वसामर्थी परमेश्वर देवाच्या वाणीसारखा होता. 6 मग असे झाले की, तागाचे वस्त्र घातलेल्या पुरुषाला देवाने आज्ञा केली आणि म्हणाला, “करुबांच्या मध्ये असलेल्या चाकांच्या मध्यभागी असलेला विस्तव घे” मग तो पुरुष चाकाच्या बाजूला जाऊन उभा राहीली. 7 एका करुबाने इतर करुबीमांच्यामध्ये जेथे आग आहे, तेथे आपला हात लांब केला आणि ती आग उचलून तागाचे वस्त्र घातलेल्या पुरुषाच्या हाती दिली. तो पुरुष ती आग घेवून तेथून निघून गेला. 8 मी करुबाला पाहिले तो पहा, मनुष्याच्या हातासारखे हात त्याच्या पंखांच्या खाली होते. 9 मग मी पाहिले तेव्हा पहा! करुबाच्या बाजूला चार चाके होती, एकेक चाक एकेका करुबीमाच्या शेजारी होते, आणि ती चाके वैडूर्यमण्यांसारखी दिसत होती. 10 ती चारही चाके एकसारखीच दिसत होते, एक चाक दुसऱ्यात असल्यासारखी ती चाके होती. 11 जेव्हा ते चालत ते कोणत्याही एका दिशेला चालत असत; ते चालत असतांना वळण घेत नव्हते, त्यांचे तोंड ज्या दिशेला होते त्याच दिशेने ते सरळ चालत होते. 12 त्यांची सर्व शरीरे; त्यांचे हात, पाठ, आणि त्यांचे पंखदेखील डोळ्यांनी झाकलेले होते आणि त्यांच्या सभोवतालची चाकेही डोळ्यांनी झाकलेली होती. 13 जसे मी ऐकले तो त्या चाकांना “गरगर फिरणारी चाके” असे म्हटले गेले. 14 त्यांना प्रत्येकाला चार तोंडे होती; पहिले तोंड करुबाच्या तोंडासारखे होते, दुसरे तोंड मानवाच्या तोंडासारखे होते, तिसरे तोंड सिंहाच्या तोंडासारखे, चौथे तोंड गरुडाच्या तोंडासारखे होते. 15 मग करुब प्राणी हे मी खबार नदी शेजारी पाहिले ते उभे झाले. 16 जेव्हा करुब चालत होते, चाके त्याच्या बाजूला चालत होती; आणि जेव्हा करुब उंच उडत होते, चाके पंखांसोबत पृथ्वीच्या वर घेतले जात होते, त्याची चाके हालत नव्हती तर ती स्थिर अशी त्यांच्यासोबत राहत होती. 17 जेव्हा करुब उडत होते, ते चाके बाजूला राहत होती आणि जेव्हा ते उभे राहत चाके उभे राहत होती, त्या जिवंत प्राण्यांचा आत्मा त्या चाकांत होता. 18 मग घराच्या उंबरठ्यावरुन परमेश्वर देवाचे गौरव बाहेर करुबावर जाऊन राहीले, 19 तेव्हा करुबाने त्याचे पंख उंच केले आणि माझ्या देखत ते पृथ्वीवरून उडाले, त्यांची चाकेही त्यांच्या बाजूला होती. परमेश्वर देवाच्या पूर्व प्रवेशव्दाराजवळ येऊन उभे झाले आणि मग इस्राएलाच्या देवाचे गौरव त्यांच्यावर वरुन खाली आले. 20 मी खबार नदीच्या तीरी इस्राएलाच्या देवाच्या आसनाखाली ज्याला पाहिले तो हाच जिवंत प्राणी होता. मग ते करुब आहेत असे मला कळाले 21 त्या प्रत्येकाला चार तोंडे व चार पंख होते. पंखांच्या खाली मनुष्याच्या हातासारखे हात होते 22 खबार नदी जवळ मी पाहिलेल्या दृष्टांतात होती तसेच त्यांचे चेहरे होते आणि ते प्रत्येक आपापल्या समोर सरळ चालत होते.
Total 48 अध्याय, Selected धडा 10 / 48
×

Alert

×

Marathi Letters Keypad References